नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गाच्या टोल पॉईंट्सवर वाहनांना न थांबता पुढे जाण्याकरिता एनएचएआय (NHAI) ने फास्टॅग सिस्टीम लागू केली आणि फास्टॅगची लागू करण्याची डेडलाइन 15/16 रोजी मध्यरात्री संपली आहे. म्हणजेच फास्टॅगशिवाय फ्रेट किंवा प्रवासी 4 चाकी वाहनांना एनएचएआयचा टोल पास करण्यासाठी दुप्पट टोल दंड म्हणून भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी आणि विनाथांबा टोल पॉईंटमधून जाण्याच्या उद्देशाने लोकं त्यांच्या वाहनांमध्ये फास्टॅग लावत आहेत. गेल्या दोन दिवसांत विक्रमी अडीच लाख फास्टॅगची विक्री झाली आहे.
1 मार्च 2021 पर्यंत फ्री फास्टॅग मोहीम
ड्रायव्हर्स किंवा मालकांमध्ये फास्टॅगचा प्रसार वाढविण्यासाठी NHAI फ्री फास्टॅग देतील. राज्यातील टोल प्लाझासह देशातील 770 टोल प्लाझामध्ये फ्री फास्टॅगमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या फास्टॅगची किंमत 100 रुपये आहे. सध्या, फास्टॅग पेनेट्रेशन 87 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 2 दिवसात ही व्याप्ती 7 टक्क्यांपर्यंत वाढली. 100 टोल प्लाझा 90 टक्के फास्टॅग पेनेट्रेशन मिळवण्यात यशस्वी झाले.
फास्टॅगच्या माध्यमातून दररोज 95 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन
फास्टॅग सिस्टमची लोकप्रियता आणि प्रसार सतत वाढत आहे. याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दररोज 60 लाख फास्टॅग ट्रांजेक्शन होत आहेत. इतकेच नाही तर फास्टॅगच्या माध्यमातून टोल प्लाझामध्ये दररोज 95 कोटी रुपयांचे टोल वसुली केली जात आहे. 15/16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक केले आहे. NHAI/IHMCL आणि अनेक बँकांनी 40 हजाराहून अधिक ठिकाणी आणि प्लॅटफॉर्मवर फास्टॅगची विक्री करण्याची सुविधा दिली आहे.
फास्टॅग युझर्सच्या सोयीसाठी ही व्यवस्था केली आहे
टोल प्लाझावर जाण्यापूर्वी, फास्टॅग युझर्सना My FASTag App या मोबाइल अॅपमध्ये बॅलन्स स्टेट्सची माहिती मिळू शकेल. वाहनांमधील फास्टॅगमध्ये किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती कलर कोडद्वारे सहजपणे शोधता येते. एक्टिव (सक्रिय) फास्टॅगसाठी ग्रीन कलर कोड म्हणजे पुरेशी रक्कम उपलब्ध आहे. ऑरेंज कलर कोडचा अर्थ असा आहे की,वॉलेटमध्ये अपुरी रक्कम आहे. रेड कलर कोडचा अर्थ असा आहे की, फास्टॅगला ब्लॅक लिस्ट केले गेले आहे. जेव्हा फास्टॅग वॉलेटमध्ये कमी रक्कम असते तेव्हा युझर्स इन्स्टंट रिचार्ज सुविधेद्वारे सहजपणे रिचार्ज करू शकतात किंवा टोल प्लाझामध्ये विक्रीच्या ठिकाणी देखील ते रिचार्ज केले जाऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.