FASTag बाबत NHAI चा इशारा ! बाजारात मिळत आहेत बनावट फास्टॅग, याबाबत तक्रार कशी द्यावी ‘हे’ जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण आपल्या कारमध्ये फास्टॅग देखील इन्स्टॉल केले असेल किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता FASTag मध्ये देखील फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) लोकांना बनावट FASTag बाबत इशारा दिला आहे. NHAI ने म्हटले आहे की, काही फसवणूक करणार्‍यांनी बनावट फास्टॅगची विक्री ऑनलाइन केली आहे. खरं तर, या फसवणूक करणाऱ्यांनी NHAI / IHMCL सारख्या बनावट FASTag ची विक्री सुरू केली आहे. हे FASTags वास्तविक दिसत आहेत परंतु ते बनावट आहेत. अशा परिस्थितीत युझर्सनी अशी फसवणूक टाळण्याची गरज आहे.

बनावट फास्टॅगसाठी येथे तक्रार करा
NHAI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की जर आपण चुकून बनावट फास्टॅग विकत घेतले असेल तर आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करून तक्रार करू शकता. सरकारने 15 फेब्रुवारी 2021 पासून देशभरात फास्टॅग अनिवार्य केले आहे. त्यानंतर अशा वाहनांना टोल प्लाझावर दुहेरी शुल्क भरावे लागेल ज्यांच्याकडे NHAI फास्टॅग नाहीत. डिजिटल मोडच्या माध्यमातून शुल्क भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, वेळ वाचविणे तसेच इंधनाचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

येथून खरे फास्टॅग खरेदी करा
NHAI ने म्हटले आहे की, मूळ NHAI खरेदी करण्यासाठी आपण https://ihmcl.co.in/ वर जा किंवा मायफास्टॅग अ‍ॅप वापरा. NHAI ने सांगितले की ग्राहक लिस्टेड बॅंक आणि अधिकृत एजंटांकडूनच फास्टॅगची खरेदी करू शकतील. IHMCL वेबसाइटवर FASTag शी संबंधित माहिती देखील दिली गेलेली आहे.

फास्टॅगसाठी किती किंमत आहे
फास्टॅगची किंमत कोणत्याही व्यत्ययाशिवाय टोल प्लाझा ओलांडण्यासाठी आपल्या वाहनावर अवलंबून असते. याशिवाय त्याची किंमत जारी करणार्‍या बँक आणि सिक्योरिटी डिपॉजिट पॉलिसी द्वारेही याचे शुल्क निश्चित केले जाते. जर तुम्ही पेटीएमकडून कारसाठी FASTag विकत घेतले तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. त्यात 250 रुपये रिफंडबेल सिक्योरिटी डिपॉजिट आणि 150 किमान शिल्लक आहे. आपण आयसीआयसीआय बँकेतून खरेदी केल्यास तुम्हाला FASTag साठी 99.12 रुपये आणि किमान शिल्लक 200 रुपये ठेवावे लागतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फास्टॅगची किंमत 100 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय 200 रुपयांची सिक्योरिटी डिपॉजिट द्यावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment