हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NIA कडून सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापा टाकत कारवाईचे धाडसत्र राबविले जात आहे. दरम्यान NIA ने नुकताच मुंबईत एक छापा टाकला असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधीत असलेल्या मुंबईतील दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. छोटा शकील याच्यासोबत व्यवहार केल्याच्या प्रकरणात एनआयएने दोघांना अटक केली असून आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर अशी त्यांची नावे आहेत.
याबाबात अधिक माहिती अशी की, NIA च्या अधिकाऱ्यांना आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर हे दोघेही मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर NIA ने ओशिवरा परिसरात छापा टाकण्याचा निर्णय घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकत दोघांना अटक केली. दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि अटक करण्यात आलेल्या या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते.
यापूर्वी एनआयएने मुंबई आणि उपनगरात एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली होती. 9 मे रोजी करण्यात आलेल्या या छापेमारी दरम्यान 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले.
Interpol has issued Red Corner Notice against Chhota Shakeel who operates an international criminal syndicate from Pakistan. He's involved in extortions, narcotics smuggling & violent terrorist activities
NIA had conducted raids at as many as 29 locations in Maharashtra on May 9
— ANI (@ANI) May 13, 2022
एनआयएचे पथक गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 13 जणांची चौकशी करत होते. त्यानंतर आता छोटा शकीलच्या दोन हस्तकांना अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयएकडून आज कोर्टात हजर केले जाणारा असून हे दोन्ही आरोपी दाऊद इब्राहिमच्या डी गँगसाठी टेर फंडींगसाठी मुंबईतून पैसे जमा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे.