पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव डॉ. अदनानली सरकार असे आहे. डॉ. सरकार तरुणांना इसिसमध्ये जाण्यासाठी प्रेरित करत होता. “मी तुम्हाला इसिसमध्ये पाठवेल. तसेच याबाबतची सर्व माहिती तुम्हाला पुरेल” असे सांगून डॉ. सरकार तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यासाठी प्रेरित करत होता. याची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी ताबडतोब डॉ. सरकारला अटक केली आहे. यापूर्वी एनआयएने सरकारला चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर एनआयएच्या हाती सरकारविरुद्ध अनेक पुरावे लागले. त्यामुळे अदनानली सरकारला एनआयएने कोंढवा येथून अटक केली.

डॉ. सरकार कोंढवामधील परमार पवन हाऊसिंग सोसायटीत राहत होता. एनआयएने त्यांच्यावर , एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप लावले आहेत. सध्या डॉ. सरकार एनआयएच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी अंतर्गत एनआयएच्या हाती आणखीन पुरावे लागतील असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील कोंढवा येथून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचा जयपूर बॉम्बस्फोट हल्लाशी संबंध होता. यातील एक दहशतवादी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र पुण्यासारख्या शहरात दहशतवादी आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.