हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी नाइट ड्यूट अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली. मागील आठवड्यात 13 जुलै रोजी विभागाने हे निर्देश जारी केले असून 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.
आतापर्यंत ग्रेड वेतनच्या आधारे भत्ता देण्यात आला होता
याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने सध्याच्या यंत्रणेत विशेष ग्रेड वेतनाच्या आधारे सर्व कर्मचार्यांना दिले जाणारे नाइट ड्यूटी अलाउंस रद्द केलेला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यापूर्वी नाइट ड्यूटी अलाउंस हा केंद्रीय कर्मचार्यांना केवळ त्यांच्या ग्रेड वेतनच्या आधारे देण्यात आला.
1. ज्या प्रकरणांमध्ये नाइट वेटेज (Night Weightage) च्या आधारावर कामकाजाची वेळ मोजली गेली असेल, त्या प्रकरणात नुकसान भरपाई दिली जाणार नाही. रात्रीच्या ड्युटी दरम्यान, दर तासासाठी 10 मिनिटे वेटेज दिले जाईल.
2. सरकारच्या म्हणण्यानुसार फक्त सकाळी १० ते सकाळी 6 या वेळेत होणाऱ्या कामांनाच नाइट ड्यूटी असे मानले जाईल.
3. नाइट ड्यूटी अलाउंसची मर्यादा त्यांच्या बेसिक पेच्या आधारावर निश्चित केली गेली आहे. कर्मचारी विभाग म्हणाले, ‘नाईट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पे मर्यादा दरमहा 43,600 रुपये निश्चित करण्यात आली आहे.’
4. हा अलांउस दर तासाला देण्यात येईल जो BP+DA/200 च्या बरोबरीचा असेल.BP म्हणजे बेसिक वेतन आणि DA म्हणजे महागाई भत्ता. सातव्या वेतन आयोगाच्या आधारे या दोघांना कॅल्क्युलेट केले जाईल. हे सूत्र सर्व मंत्रालये आणि विभागातील कर्मचार्यांना लागू होईल.
5. केंद्र सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिक पे आणि नाइट ड्यूटीच्या आधारे नाइट ड्यूटी अलाउंसची रक्कम देईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.