हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार वर निशाणा साधला असून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार आहे की कलेक्शन सेंटर्स? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
तुकाराम सुपे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी ३ कोटी च्या जवळपास पैसे सापडले, राज्य सरकार आहे की कलेक्शन सेंटर्स?? प्रत्येक विभागात घोटाळे बाहेर येत आहेत. आभाळ फाटलंय… कोणाचा कोणावर वचक नाही, सगळे पैसे कमवायच्या मागे आहेत. किती पैसे खाणार वाझे चे औलाद? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
तुकाराम सुपे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी ३ कोटी च्या जवळपास पैसे सापडले, राज्य सरकार आहे की कलेक्शन सेंटर्स?? प्रत्येक विभागात घोटाळे बाहेर येत आहेत. आभाळ फाटलंय… कोणाचा कोणावर वचक नाही, सगळे पैसे कमवायच्या मागे आहेत. किती पैसे खाणार वाझे चे औलाद?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 21, 2021
दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी कुंपणानंच शेत खालल्याचं समोर आलंय. टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक झालीय. तुकाराम सुपेचं कालचं निलंबन करण्यात आलं आहे. तर, बीडमधून आणखी संजय सानप याला अटक झालीय. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.