अजित पवारांना धर्मवीर शब्दाचा अर्थ सात जन्मात कळणार नाही; निलेश राणेंचा ट्विटद्वारे हल्लाबोल

0
403
Nilesh Rane Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक दावा केला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय सात जन्मात कळणार नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजपा नेते निलेश राणेंनी एक ट्वीट केले असून त्यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या काही जुन्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या ट्वीट्समध्ये अजित पवारांनीच छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’असा केला आहे. “धर्मवीर-धुरंदर राजकारणी, ज्यानं दुश्मनांचा उतरविला माज, ऐसे पराक्रमी अपुले राजे छत्रपती संभाजी महाराज, त्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा”, असे ट्वीट अजित पवारांनी केले असल्याचे राणेंनी म्हंटल आहे.

त्याचसोबत त्यांनी आणखी एक ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. “अजित पवार यांनी नजतेची जाहीर माफी मागावी. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत,” असे ट्विटमध्ये राणेंनी म्हंटले आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक दावा केला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,” असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.