कणकवली प्रतिनिधी | आज तळ कोकणातील कणकवली शहरात फिल्मी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे. आमदार नितेश राणे यांनी महामार्गाच्या रस्तांची झालेली दुरवस्था बघून येथील महामार्ग उपभियांता प्रकाश शेडकर यांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रताप केला आहे. महामार्गाची झालीली दुरवस्थेला येथील अधिकारीच जबाबदार आहेत असे राणेंना वाटते म्हणून त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना समज देण्याचा प्रकार केला आहे.
तर स्वाभिमानी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडकर यांना कणकवलीच्या प्रांत कार्यालयासमोर गाठून श्रीमुखात लगावण्याचा महाप्रसाद दिला आहे. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसमवेत कणकवली मधील पटवर्धन चौक ते गुढनदी पुला पर्यंत पायी जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. हि पाहणी करत असताना आणि समस्याग्रस्थ नागरिकांशी संवाद साधत असतानाच महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडकर तेथे आले. त्यांच्याशी बोलताना नितेश राणे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रकाश शेडकर यांच्या अंगावर जात शिवीगाळ केली. त्याच प्रमाणे शेडकर यांच्या अंगावर चिखल देखील फेकला.
दरम्यान नितेश राणे यांनी हे अनोखे आंदोलन केल्या नंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले कि आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी भांडतो. लोकांना होत असलेल्या त्रासाचा पारा किती चढू शकतो हे आज सर्वानी बघितले हे. त्याच प्रमाणे लोकांच्या समस्यासाठी लढत लढत आम्हाला जेल मध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे.