हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तस भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली आहे.
मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारण सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे असा आरोप राणेंनी केला आहे.
MLA @NiteshNRane attacks Aaditya Thackeray accuses him, his party and people close to him for driving away Marathi Manoos and Mumbaikars out of Mumbai. Asks @dev_fadnavis to act against erring developers, who have stalled projects & not paying rent to tenants. pic.twitter.com/pqcA0A0n81
— Singh Varun (@singhvarun) September 23, 2022
पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एस.आर.ए. मधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणुक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षाचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे.
एका बाजूला कोडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेली आणि दुसऱ्याबाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. राहत आहेत ते मूळ घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेये. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वतः दरात विकण्यास बाध्य होतात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्यावतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती नितेश राणे यांनी फडणवीसांना केली.