…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
150
Nitesh Rane Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही, अशी टीका राणे मुख्यमंत्र्यावर केली आहे.

Nitesh Rane Letter

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून एक व्हिडिओही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेला आहे आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.

तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणे आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जात असल्याचा उल्लेख आपल्या व्हिडिओत व मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात राणेंनी केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here