“उद्धव ठाकरेंना पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीये..” नितेश राणेंची जहरी टीका

Uddhav Thakare Nitesh Rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांची एकमेकांवर टीका टिपणी सुरूच आहे. सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळया भागात सभा घेताना दिसत आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरे भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे. आता त्यांच्या टीकांवर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर, “उद्धव ठाकरे पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीये” अशा बोचऱ्या शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले आहे की, “वर्षानुवर्ष आमच्या मनामध्ये जो संशय होता तो वाढत चालला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होत चालला आहे. खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला मुंबईतील कुठल्या कचऱ्याचून उचलून ठाकरे आडनाव दिलय. त्याच्यामधील गुण, विचार पाहता आता त्यांच रक्त, डीएनए तपासण्याची वेळ आली आहे. कुठल्याही अँगलने बाळासाहेबांच रक्त याच्यामध्ये आहे.”

पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीये

तसेच, “उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलतात. हातवारे करुन दुसऱ्याच्या शरीराच विश्लेषण करतात. स्वत:च्या शरीराचा थांगपता नाही. पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीये, अशा व्यक्तीने दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलाव? त्यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावं. तू तुझं विश्लेषण सुरु कर. आम्ही आमचं विश्लेषण करतो. नाही तुझं, थोबाड बंद करुन कायमच घरी बसवलं, तर मी माझा नाव बदलून टाकेन” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

इतकेच नव्हे तर, “उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना ऐकल्यानंतर अशी व्यक्ती कधीच ठाकरे यांच्या घरात जन्माला येऊ शकत नाही यावर शिक्कामोर्तब होत चाललय. राम मंदिराच्या निर्माणासाठी हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकेर आयुष्यात अनेक संकटांना सामोर गेले. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. राम मंदिर अयोध्येत बनावं यासाठी कडवट भूमिका घेतली. त्या बाळासाहेबांचा मुलगा सांगतो की, तिथे जाणाऱ्या भक्तांच्या ट्रेनमध्ये आग लागेल, दंगली भडकतील. अशी वक्तव्य करत असेल, तर खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? हे विचारण्याची वेळ आलीय” असं नितेश राणेंनी म्हणल आहे.