हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सलियाबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. “विनाश काले विपरीत बुद्धि,” असे ट्विट क्रिया या प्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.
दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी या प्रकरणी त्यांच्याबाबत केलेल्या तक्रारीबाबत “विनाश काले विपरीत बुद्धि !!!,” अशा शब्दात ट्विट केले आहे.
विनाश काले विपरीत बुद्धि !!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 27, 2022
दरम्यान या प्रकरणी रुपाली चाकणकरांकडून थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.
मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.