नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोव्हीडशिल्ड या दोन लसी प्रामुख्याने दिल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हीडशिल्ड ही लस सुरुवातीच्या काळात 28 दिवसांच्या अंतराने दिली जात होती. त्यानंतर हे अंतर वाढून 45 दिवस करण्यात आले. मात्र ते १८ ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू करताना हे अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे म्हणजेच साधारण ८४ दिवसांचा करण्यात आला आहे. दुसरीकडे कोवॅक्सिनच्या बाबतीत मात्र दोन्ही डोस मधील अंतर तेव्हढेच कायम ठेवण्यात आले आहे. देशातील लसींची उपलब्धता आणि व्यापक लसीकरण यांचे महत्त्व लक्षात घेता दोन डोस मध्ये अंतर कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे. ते कमी होणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती त्यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
There are going to be no changes in the interval between Covishield doses immediately. However, scientific evidence have been collected to review the decision in the coming meeting of NEGVAC: Govt sources
— ANI (@ANI) June 12, 2021
“सध्या घाबरून जाण्याची, बदलण्याची किंवा लसणीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचे निर्णय हे काळजीपूर्वक घ्यावे लागतात. आपण डोस मध्ये अंतर वाढवले होते भाग कोरोनामुळे एकच डोस घेतलेल्या व्यक्तींना असलेला धोका देखील आपण विचारात घेतला होता. पण त्याच वेळी असं केल्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकृत करणं शक्य होणार होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची प्रतिकारशक्ती वाढणार आहे. असं या बाबतीत बोलताना पवार यांनी सांगितले. covid-19 बाबत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. बी के पॉल यांनी माहिती दिली आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, आपण सार्वजनिक स्तरावर या विषयांची चर्चा नक्कीच करायला हवी पण त्यासोबतच आपण हेही लक्षात ठेवायला हवं की या संदर्भातला निर्णय मात्र तज्ञ घेऊ शकतात. त्यांच्या निर्णयाचा आपण आदर राखायला हवा असे देखील ते म्हणाले.