नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्यात रंगला होता. या सगळ्या वादावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी मौन सोडलं आहे. गडकरी यांनी खडसे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले,”गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. मात्र आज त्यांना दिली जाणारी वागणूक दुःखद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं पक्षासाठी चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही,” अशा शब्दात गडकरी यांनी आपली खंत व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”