हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरण तसेच कामगारविरोधी धोरण याच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशभरात दोन दिवसीय संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची माहिती दिली. सध्या वीज निर्मितीसाठी कोळशाची टंचाई जाणवत आहे. अशात राज्याला अंधारात लोटणार नाही. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू, मात्र, कामावर न आल्यास आम्ही मेस्मा लावू, असा इशारा मंत्री राऊत यांनी दिला.
मंत्री नितीन राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. त्यांना विनंती करतो कि त्यांनी संप मागे घ्यावा. आम्ही कधीही चर्चेसाठी तयार आहोत. कर्मचाऱ्यांनी संप करण्यापेक्षा चरचा करावी. आम्ही चर्चेतून नक्की मार्ग काढू.
कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मितीत आर्थिक संकटात असताना यावर मात करत आम्ही पुढे जात आहोत. वीज कर्मचारी संघटनांसोबत चर्चेतून मार्ग निघेल, अस वाटत आहे. माआम्ही काही कर्मचाऱ्यावर कामावर न आल्यामुळे मेस्मा अंतर्गत कारवाई केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे कर्मचाऱयांनी कामावर यावे. मात्र, कामावर न आल्यास आम्ही मेस्मा अंतर्गत कारवाई करू, असा इशाराही यावेळी मंत्री राऊत यांनी दिला.