नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हंटल आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची वाढती प्रकरणे आणि कोविडचा नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तामिळनाडू सरकारने राज्यात 6 जानेवारीपासून अनेक निर्बंध लादले आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा 50 टक्के क्षमतेने धावेल, असे या नियमात म्हंटल आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत रेल्वेनेही कडक नियम जारी केले आहेत. रेल्वेने निवेदनात म्हटले आहे की,” प्रवाशांना प्रवासाचे तिकीट किंवा मासिक सीझन तिकीट (MST) देताना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच तिकिटे दिली जातील.
रेल्वे प्रवास महागणार-
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे आता खासगी शाळांच्या धर्तीवर स्टेशन डेव्हलपमेंट चार्ज (SDF) आकारण्याची तयारी करत आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही फक्त ट्रेनच्या प्रवासासाठीच भाडे द्यायचो, मात्र आता तुम्हाला स्टेशनवर येण्यासाठी आणि तिथल्या सुविधा वापरण्यासाठीही शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हे शुल्क वेगवेगळ्या वर्गातील प्रवाशांसाठी वेगवेगळे असेल. यापासून लोकल ट्रेन आणि सीझन तिकीट वेगळे ठेवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली रेल्वे हे शुल्क वसूल करणार आहे. ज्या स्थानकाची डेव्हलपमेंट होणार आहे, त्यासाठीही ही कारवाई केली जाणार आहे.
किती शुल्क आकारले जाईल ?
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढण्यासाठी 10 ते 50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही एसी क्लासने प्रवास करत असाल तर हे शुल्क 50 रुपये असेल. स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि अनारक्षित वर्गासाठी 10 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वेगळे भरावे लागणार नाही, मात्र ज्याप्रमाणे शाळेच्या फीमध्ये डेव्हलपमेंट चार्जचा समावेश केला जातो, त्याचप्रमाणे हा शुल्क रेल्वेच्या तिकिटात समाविष्ट केला जाईल.