बनावट धनादेश प्रकरण : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या पुतण्यांवर चार महिने उलटले तरी कारवाई नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचा पुतण्यांच्या कंपनी विरोधात पुण्यात दाखल झालेल्या बनावट धनादेश प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर साशंकता निर्माण झाली आहे. चार महिन्यांत पोलीसांनी नेमका काय केला तपास? आजही पोलीसांनी आरोपींना अटक का केलेली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक उत्कर्ष मिलिंद पाटील व अव्दैत मिलिंद पाटील यांनी कंपनीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात मनरेगा योजनेच्या बोगस धनादेशाव्दारे 92.99 कोटी रूपये काढण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सलगर यांची बदली झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत या प्रकरणाकडे का दूर्लक्ष केले, तसेच यातील संबंधितांना ताब्यात का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पुण्यातील HDFC बनावट धनादेश प्रकरणात उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हडपसर येथील प्रताप अण्णाराव पाटील (36) आणि दत्तात्रय कारमपुरी व आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल झाली होती .उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही उत्कर्ष मिलिंद पाटील व अद्वैत मिलिंद यांचे नावे असुन संबंधित प्रकरण हे पुणे पोलीसांच्या कडून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी साताऱ्यातील बड्या राजकीय नेत्यांनी देखील फोनाफोनी करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सलगर यांच्यावर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली.

 

परंतु काही दिवसांत सलगर यांची बदली झाल्याने या प्रकरणी तदनंतर सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तसेच पोलिस उपआयुक्त पोर्णीमा गायकवाड यांच्या कडे हे प्रकरण आले. परंतु यांनी देखील चार महिन्यांत काय कारवाई केली ? हे विचारले असता याप्रकरणी बोलण्यास नकार दिला तर पोलीस आयुक्तांच्या कार्यालया ने देखील सारवासारव केली. ऑक्टोबर 2021 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुठल्याही आरोपींना अटक का केली नाही? खरं तर शासनाच्या नावाचा 92 कोटीचा चेक तयार कसा केला गेला? हे रॅकेट पुणे पोलीस उघडकीस आणणार का आणि कारवाई करणार का ?

वरीष्ठ पोलिस निरीक्षक ते पोलिस आयुक्त यांच्यावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा नव्हे तर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सलगर यांच्यावर टाकत असल्याची स्टेशन डायरीत नोंद असल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पुणे पोलीसांवर या प्रकरणात कारवाई करू नये म्हणून तो फोन करणारा पीए कोणत्या मंत्र्यांचा आहे? यामुळे या प्रकरणात कारवाई होणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment