मुंबई | राज्याच्या शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात भाजपाचे 9 आणि शिंदे गटाचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारमध्ये एकाही अपक्षाचा तसेच एकाही महिलेचा सहभाग नाही. त्यामुळे आता मंत्रिमडळ विस्तारावर टीका होवू लागली असून अपक्षांच्यात नाराजीचा सूर निघू लागला आहे.
महाविकास आघाडीचे सरकारमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी व 12 खासदारांनी बंडखोरी केली. यात महिला आमदार व खासदारांचा समावेश आहे. तर अपक्ष 11 जणांनीही शिंदे गटासोबत भाजपाला जवळ केले. त्यामुळे शिंदे- फडणवीस या नव्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेवून नवे युतीचे सरकार दिले. मात्र, तब्बल 38 दिवसांनी मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी पार पडला.
या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न दिल्याने राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, आणि अपक्षाशिवाय सरकार पूर्ण होवू शकत नाही, असे म्हणत सरकारला इशारा दिला आहे. याचबरोबर विधान परिषदेवरील एकाला आमदाराला या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.