उत्तर कोरियामध्ये आपल्या नेत्याच्या मृत्यूवर रडणे आहे बंधनकारक, असे न केल्यास होते शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इतर देशांपासून अलिप्त झाल्यानंतरही उत्तर कोरिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. याचे कारण आहे त्यांचा हुकूमशाह किम जोंग. तसे, किमच्या आधीही किमच्या कुटुंबाने या देशाच्या सत्तेवर वर्चस्व गाजवले आहे. किम जोंग इल यांनी किमच्या आजोबानंतर सत्ता काबीज केली. असे म्हणतात की, त्यांच्या निधनानंतर लोकांना शोकसभेत उघडपणे रडण्याचे आदेश मिळाले होते. लोक जोरजोराने ओरडत, किंचाळत रडले आणि जे व्यवस्थित रडले नाहीत, ते दुसर्‍या दिवशी गायब झाले. त्यावेळी माध्यमांमध्येही यावर बरीच चर्चा झाली होती.

काय होती संपूर्ण घटना
उत्तर कोरियाचे दुसरे ज्येष्ठ नेते किम जोंग इल यांच्या संदर्भात उत्तर कोरियाच्या सरकारी वाहिनीने म्हटले आहे की, राजधानी प्योंगयांगच्या बाहेरील भागात शाही ट्रेनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. देशातील लोकांना या मृत्यूची बातमी 17 डिसेंबर 2011 रोजी टीव्हीद्वारे कळली. त्यांच्या मृत्यूच्या घोषणेनंतर, देशात अधिकृत शोक जाहीर करण्यात आला, ध्वज अर्धवट खाली केले आणि तसेच कोणत्याही प्रकारचे उत्सव किंवा करमणुकीवर बंदी घालण्यात आली होती. इथ पर्यंत ठीक होते, परंतु या 10 दिवसांच्या राष्ट्रीय शोकात लोकांना आपल्या दुःखाचे प्रदर्शनही करावे लागले.

अंत्यसंस्कारापूर्वी किम जोंग इल यांचा मृतदेह दर्शनासाठी ठेवण्यात आला. त्या काळात, प्योंगयांग मधील लोकानीं तेथे येणे अनिवार्य होते. तसेच त्यांना मोठं मोठ्याने रडावे देखील लागले. लवकरच या रडणार्‍या लोकांची छायाचित्रे व्हायरल झाली. लोक रडत होते छातीवर मारून घेत होते, डोके जमिनीवर आपटत होते आणि काही लोकं तर पुन्हा पुन्हा खाली पडत देखील होते. हे सगळं खरं होते का ? याबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये बर्‍याच विवादास्पद रिपोर्ट्स आल्या.

डेली मेलच्या वृत्तानुसार, आपल्या राज्यकर्त्याच्या मृत्यूनंतर नवीन राजा किम जोंग-उनने आपल्या वडिलांसाठी बऱ्याच शोक सभा ठेवल्या. हा एक प्रकारचा organised mourning events होता ज्यामध्ये लोकांना जोरजोराने रडून हे सिद्ध करायचे होते की आपल्या राजावर त्यांचे खूप प्रेम आहे. किम कुटुंबावरच्या त्याच्या निष्ठेचा हादेखील एक पुरावा होता. तरुण, मुले, वृद्ध, महिला आणि पुरुष यांनी रडणे अनिवार्य होते. या शोकसभा 10 दिवस चालल्या. या वेळी कोण योग्यप्रकारे रडत नाही याची नोंद घेतली गेली आणि किमच्या कुटुंबावर कोणाची निष्ठा नाही याकडे पाहिले गेले.

या 10 दिवसानंतर क्रिटिसिझम सेशन झाले, त्यामध्ये किम स्वतः उपस्थित होता. यावेळी जे योग्य प्रकारे रडले नाहीत त्यांना 6 महिन्यांसाठी त्वरित कडक तुरुंगात ठेवले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. एका रात्रीतून अशा अनेक अपराध्यांना घरातून पकडण्यात आले. असे हजारो लोक होते. अनेकांची संपूर्ण कुटुंबे ही कित्येक महिने या कामगार छावणीत राहिले. एकीकडे हे काम चालू होते तर दुसरीकडे, 10 दिवसानंतर, किम जोंग उन याच्यासाठी प्रसिद्धी देखील केली जात होती. सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत मीडिया त्यांच्या नवीन नेत्याचे कौतुक करत असत. वयाच्या 69 व्या वर्षी जोंग इलच्या निधनानंतर हा mourning period तीन वर्षे चालला, जो 17 डिसेंबर 2014 रोजी संपला. या दरम्यान दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक शोकसभेच्या सभांना जात असत आणि रडत असत.

एवढेच नव्हे तर मृत शासकांचे मृतदेहही या देशात सांभाळून ठेवलेले आहेत. कोरियाच्या पहिल्या आणि दुसऱ्या राज्यकर्त्यांचे मृतदेह, म्हणजे किमचे आजोबा आणि वडील यांचे मृतदेह हे राजधानीच्या कुमसुसन मेमोरियल पॅलेसमध्ये आहेत. येथे किम जोंगच्या आजोबा आणि वडिलांचे मृतदेह हे एका काचेच्या ताबूत ठेवण्यात आलेले आहेत. मृतदेहांच्या डोक्याच्या खाली कोरियन-शैलीतील उशा असतात, ज्यावर उत्तर कोरियाचा ध्वज बनविला जातो. येथे राज्यकर्त्यांच्या शक्तीचे बरेच पुरावे ठेवलेले आहेत, जसे की त्यांची पदके, अभ्यासाची प्रमाणपट्रे इ. हे जगातील सर्वात मोठे स्मारक मानले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment