उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक मोठा नेता राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत? हालचालींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक महत्वाची बैठक सुरु आहे.

या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत. या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचं काय म्हणणं आहे, याबाबत या बैठकीत खलबतं सुरु आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत सामील होणार उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा हा मोठा नेता दुसरा तिसरा कोणी नसून एकनाथ खडसे असल्याची सर्वाधिक चर्चा आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.