नोकरी गेल्यानंतर ‘या’ सरकारी योजनेंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी गमावलेल्या कामगारांना हा लाभ देण्यात येईल.

31 डिसेंबर 2020 नंतर या योजनेतील नियमांमधील शिथिलता रद्द केली जाईल. आता 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत ग्राहकांना केवळ मूळ निकषाच्या आधारे लाभ मिळतील. या काळात बेरोजगारीचा फायदा 50 टक्के ऐवजी 25 टक्के होईल. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील त्याच कर्मचार्‍यांना घेता येईल ज्यांनी ESIC द्वारे विमा उतरवलेला आहे आणि ज्यांनी दोन वर्षाहून अधिक काळ काम केलेले आहे. यासाठी आधार आणि बँक अकाऊंटच्या डेटा बेसशी जोडलेला असणे महत्वाचे आहे.

चला तर मग ‘या’ योजनेबद्दल जाणून घेऊयात …

या योजनेचा लाभ घेणारा विमाधारक हा बेरोजगार असावा आणि त्या दरम्यान त्यांना बेरोजगारीच्या फायद्यांचा दावा करावा लागेल ..

विमाधारकासाठी अट अशी असेल की तो बेरोजगारीपूर्वी किमान 2 वर्षे नोकरीस हवा.

यासंदर्भातील योगदान मालकाकडून दिले गेलेले असले पाहिजे किंवा देणे असले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, पेन्शन प्रोग्राम किंवा ऐच्छिक सेवानिवृत्तीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विमाधारकाचे आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील त्यांच्या डेटाबेसशी जोडला जाणे आवश्यक आहे.

बेरोजगार व्यक्ती स्वत: हून दावा करु शकतो.

नोकरी गेल्यानंतर 30 दिवस ते 90 दिवसांच्या दरम्यान क्लेम करावा लागेल.

क्लेम ऑनलाईन सबमिट करावा लागतो, त्यानंतर क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात भरली जाईल. क्लेम वेरिफाय केल्याच्या 15 दिवसांच्या आत हे पेमेंट दिले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. 

You might also like