हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड हे भारतात राहणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. आता पूर्वीपेक्षा आधार कार्डचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कधीकधी आधार शिवाय काम थांबते. आधार कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र (आयडी) आणि अॅड्रेस प्रूफ सारखी कागदपत्रे आवश्यक असतात. परंतु आता कोणत्याही कागदपत्राशिवाय आधार कार्डदेखील बनवता येईल. आधार सेंटरवर तुम्ही इंट्रोड्यूसर्सची मदत घेऊ शकता. कागदपत्रांशिवाय आधार कार्ड कसे बनवता येते ते जाणून घेऊयात …
इंट्रोड्यूसर्सची मदत घेऊ शकता
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने कोणत्याही डॉक्यूमेंट्सविना आधार तयार करण्याची सुविधा दिली आहे. इंट्रोड्यूसर ही एक अशी व्यक्ती आहे जी रजिस्ट्रारद्वारे अधिकृतपणे PoI किंवा PoA नसलेल्या रहिवाशांना सत्यापित करण्यासाठी अधिकृत केली जाते. मात्र इंट्रोड्यूसर्स कडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे आणि तो अर्जदारा बरोबर नोंदणी केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे.
वैधता 3 महिने आहे
इंट्रोड्यूसर्ससाठी अर्जदाराची ओळख आणि पत्ता कन्फर्म करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना एनरोलमेंट फॉर्मवर सही करावी लागेल. UIDAI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, इंट्रोड्यूसर्स साठी अर्जदाराच्या नावे सर्टिफिकेट द्यावे लागेल. याची वैधता 3 महिन्यांची असेल.
HoF द्वारे देखील आधार तयार केले जाऊ शकते
आपल्याकडे जर ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रूफ नसेल तरीही आपण आधार कार्डसाठी अर्ज करू शकता, यासाठी आपले नाव रेशनकार्डसारख्या कोणत्याही कौटुंबिक डॉक्यूमेंट्स असावे. अशा परिस्थितीत, कुटुंब प्रमुखाचे आधार हे PoI आणि PoA डॉक्युमेंट्सद्वारे बनलेले असावे. यानंतर, कुटुंबातील प्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा इंट्रोड्यूसर्स होऊ शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.