नवी दिल्ली । दीर्घकाळापासून LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने LIC च्या IPO ला मान्यता दिली आहे. तेही फक्त 22 दिवसांत, ज्याला साधारणपणे 75 दिवस लागतात. त्यासाठी सेबीने ऑब्जर्वेशन लेटर जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वी SEBI ने इतक्या लवकर कोणत्याही IPO ला मान्यता दिलेली नव्हती. म्हणजेच रशिया-युक्रेन युद्धामुळे LIC चा IPO आता पुढे ढकलला जाणार नाही. म्हणजेच रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात प्रचंड अस्थिरता असतानाही सरकारला आपला पाच टक्के हिस्सा विकण्यासाठी IPO पुढे ढकलायचा नाही. यातून सरकारला 60,000 कोटी रुपये मिळू शकतात.
फेब्रुवारीमध्ये हा ड्राफ्ट सेबीकडे पाठवण्यात आला होता
LIC ने फेब्रुवारीमध्ये बाजार नियामकाकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. या ड्राफ्टनुसार, LIC च्या एकूण 632 कोटी शेअर्स पैकी 31,62,49,885 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव असतील तर ते 15 टक्के नॉन इंस्टिट्युशनल खरेदीदारांसाठी असतील. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के राखीव असू शकतात.
पॉलिसीधारकांना महत्त्व मिळेल
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या ड्राफ्टनुसार, कंपनीच्या पात्र कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी या इश्यू साठी आरक्षण असण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, सध्याची परिस्थिती पाहता सरकार LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
12 महिन्यांसाठी व्हॅलिड
IPO ची मान्यता SEBI च्या मंजुरीच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीसाठी व्हॅलिड आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत LIC च्या IPO बाबत मोठा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ऑटोमॅटिक रूटने थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) 20 टक्क्यांपर्यंत परवानगी देण्यात आली होती. या निर्णयानंतर LIC च्या प्रस्तावित IPO मध्ये विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.