नवी दिल्ली । तुम्ही जर होम लोनवर जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जी वाचून तुम्ही तुमचा EMI 5,000 रुपयांनी कमी करू शकाल. बहुतांश बँका 8 ते 9 टक्के लोन देत होत्या मात्र आता बहुतांश बँका 7 टक्के दराने लोन देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे होम लोन ट्रान्सफर करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा पर्याय निवडून तुमचा फक्त EMI च कमी होणार नाही तर परतफेडीचा कालावधीही वाढवता येऊ शकेल.
EMI 5000 रुपयांपर्यंत कमी होईल
जर तुम्हाला तुमच्या होम लोनचा EMI 5000 रुपयांनी कमी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही नियोजन करावे लागेल. स्वस्त व्याजदरात बँक लोन ट्रान्सफर केल्याने तुमच्या EMI वर मोठा फरक पडेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये होमलोन घेतले असेल, तर त्या बँकेच्या होमलोनवरील व्याजदर 9.25 टक्के होता. आता तुम्ही होमलोन नवीन बँकेत शिफ्ट केल्यास ते 7 टक्के दराने घेऊ शकता, तर तुमचा मंथली EMI आपोआप कमी होईल.
संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या:-
वर्ष 2016
कर्जाची रक्कम 30 लाख
व्याज दर 9.25%
कर्जाचा कालावधी 20 वर्षे
EMI 27,476
आता समजा 2022 मध्ये तुम्ही तुमचे होम लोन नवीन बँकेत शिफ्ट केले. त्यामुळे तुमच्या थकीत कर्जात 24 लाख रुपयांची बचत होईल. म्हणजेच, जर तुम्ही तुमचे होम लोन अशा प्रकारे शिफ्ट केले तर तुमचा EMI दरमहा सुमारे 5000 रुपयांनी कमी होऊ शकतो.
नवीन बँक EMI कॅल्क्युलेशन
वर्ष 2022
कर्जाची रक्कम 25 लाख
व्याज दर 6.90%
कर्जाचा कालावधी 14 वर्षे
EMI 22,000 (अंदाजे)
सुविधेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला होमलोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल, तर यासाठी KYC डॉक्युमेंट्स जसे की, आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ आवश्यक असेल. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची आर्थिक स्टेटमेंट आणि पाच वर्षांच्या व्यवसायातील सातत्य डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. पगारदार अर्जदारांनी चालू वेतन स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.