व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

NPCI ला UPI द्वारे 1000 अब्ज किंमतीचे व्यवहार अपेक्षित, UPI म्हणजे काय ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात डिजिटल पेमेंटचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याच वेळी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) वार्षिक आधारावर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे एक हजार अब्ज डॉलर्सचे व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्ट 2021 (GFF 2021) दरम्यान, NPCI चे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे म्हणाले की,”देशात डिजिटल माध्यमातून पेमेंटच्या क्षेत्रात बरीच प्रगती होत आहे. गेल्या वर्षी डिजिटल पेमेंटची एकूण संख्या सुमारे 55 अब्जांवर पोहोचली.” ते म्हणाले की,” डिजिटल माध्यमातून पेमेंटची संख्या यावेळी 70 अब्जांपर्यंत पोहोचू शकते. मागील वर्षीही UPI प्लॅटफॉर्मवरून सुमारे 22 अब्ज व्यवहार झाले होते आणि या वर्षी ही संख्या 40-45 अब्ज असू शकते.”

असबे म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, UPI चे मूल्य वार्षिक आधारावर एक हजार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असेल. आम्ही डिजिटल पेमेंट इकोसिस्टमवर सुमारे 300 मिलियन मंथली ऍक्टिव्ह युझर्स पहात आहोत, त्यापैकी 200 मिलियन UPI प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह आहेत.” NPCI प्रमुख म्हणाले की,”डिजिटल पेमेंट स्वीकारणारे व्यापारी मोठ्या संख्येने आहेत आणि यामध्ये लहान व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांची संख्या पाच कोटींपेक्षा जास्त आहे.”

UPI म्हणजे काय ?
UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे, जी मोबाईल अ‍ॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. UPI द्वारे, तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अ‍ॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अ‍ॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.