OLA भारतात उभारणार जगातील सर्वात मोठी E-Scooter Factory, यासाठी 2,400 कोटी रुपये करणार खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ओला (OLA) नावाची ऍप-आधारित टॅक्सी सेवा कंपनी तामिळनाडूमध्ये आपली पहिली ई-स्कूटर फॅक्टरी (E-Scooter Factory) स्थापित करेल. यासंदर्भात तमिळनाडू सरकारशी करार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी कंपनी 2,400 कोटी रुपये खर्च करेल. ही फॅक्टरी तयार झाल्यानंतर सुमारे दहा हजार लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने सांगितले की, सुरुवातीला त्याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 20 लाख वाहने असेल.

इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवर कमी अवलंबून असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतानुसार हे ई-स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे OLA कडून सांगण्यात आले. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची आयातसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रावरील अवलंबन कमी होईल. तसेच यामुळे स्थानिक मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर देशातील तांत्रिक कौशल्य सुधारण्यासही मदत होईल. OLA म्हणाले की, आपल्या अद्वितीय कौशल्यामुळे, मनुष्यबळ आणि लोकसंख्याशास्त्राच्या माध्यमातून भारत ई-वाहन निर्मितीचे जागतिक केंद्र बनेल.

https://t.co/XPH1zY0Vpw?amp=1

कंपनी भारतासह अनेक देशांची मागणी पूर्ण करेल
ही फॅक्टरी भारत तसेच युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर देशांच्या मागणीची पूर्तता करेल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी काही महिन्यांत ई-स्कूटरची पहिली सिरीज देण्याची तयारी करत आहे. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत पहिली ई-स्कूटर बाजारात आणता येईल. या वर्षाच्या मेमध्ये, ओला इलेक्ट्रिकने ऍमस्टरडॅम स्थित एटेर्गो बीव्ही ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीने 2021 पर्यंत भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी वाहन आणण्याचे लक्ष्य ठेवले होते.

https://t.co/he93edjMwf?amp=1

या कंपन्या OLA च्या ई-स्कूटरशी स्पर्धा करणार आहेत
OLA ने पहिल्या वर्षात 10 लाख ई-स्कूटरची विक्री करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. ई-स्कूटर मार्केटमध्ये ओला बजाज ऑटो (Bajaj Auto), हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) समर्थित अथरएनर्जी (AtherEnergy), हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार असून त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी याआधीच भारतीय बाजारात आहेत.

https://t.co/9iO7cDOfcg?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment