मुंबई प्रतिनिधी | लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील सर्व मतदार संघात रथयात्रा काढणार आहेत. विकासाची कामे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हि विकास यात्रा काढली जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची हवाच काढली होती. हेच वातावरण विधानसभेपर्यंत तसेच ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा आहे. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना आणि मदत, जलसिंचन प्रकल्प, शेततळी विहीरी आदिचे काम यामध्ये मांडले जाणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार आहे.
मुख्यमंत्री कोणाचा होणार या वादात न पडता विधानसभा निवडणुकीच्या कामाला फडणवीस सरकार लागले आहे. या दृष्टीने येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस रथयात्रा काढणार असून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत. तसेच या प्रचारावेळी ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० के पार’, अशा घोषणा दिल्या जाणार आहेत.