नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्नांना वेग दिला आहे. त्याच अनुक्रमे नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांद्याचा पुरवठा (Red Onion) करण्यासाठी आयातदारांकडून शनिवारी निविदा मागविल्या आहेत. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालणे आणि देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता वाढविणे हा त्यामागील हेतू आहे.
आयातदार किमान 2000 टन पुरवठा करण्यासाठी बोली लागणार
NAFED ने नोव्हेंबर 2020 पर्यंत कोणत्याही देशातून 40 ते 60 मिलीमीटर लाल कांदा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या कांद्याची किंमत प्रति किलो 50 रुपयांपर्यंत असावी. निविदेनुसार आयातदार किमान 2 हजार टन पुरवठा करण्यासाठी बोली लावू शकतात. ते 500 टनाच्या अनेक लॉट मध्ये उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात.
आयातदार 4 नोव्हेंबरपर्यंत आपल्या निविदा सादर करु शकतात आणि या अंतर्गत प्राप्त निविदा त्याच दिवशी उघडल्या जातील. कांदळा बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरात आयातदारांना कांद्याचा पुरवठा करावा लागणार आहे.
NAFED ने हा निर्णय का घेतला ?
NAFED चे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस.के. सिंग म्हणाले, “आम्ही 15 हजार टन आयात करण्यात येणाऱ्या लाल कांद्याच्या पुरवठ्यासाठी निविदा काढल्या आहेत त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढण्यास मदत होईल. ”ते पुढे म्हणाले की, पुरवठ्याच्या प्रमाणात, गुणवत्ता व तारखेच्या आधारावर या बोलींचे मूल्यांकन केले जाईल. निविदादारांना ताजे, चांगले वाळलेले आणि रोग-मुक्त कांदे द्यावे लागतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.