औरंगाबाद – जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून 12 दिवस होवून गेल्यानंतर केवळ 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 मुलांपैकी केवळ 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 2 लाख 64 हजार 521 बालके असून मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ 40 हजार 184 बालकांचे लसीकरण झाले आहे. अद्याप 2 लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. या बालकांचे दोन्ही मात्रांचे लसीकरण फेब्रुवारीपर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परंतु त्या तुलनेत लसीकरणाने अजूनही वेग घेतलेला दिसत नाही. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सर्व किशोरवयीन मुलामुलींचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दहावी- बारावी परीक्षेच्या अनुषंगाने मंडळाने तातडीने विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु काही शाळा आणि महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे आव्हान कायम आहे.
जिल्ह्यातील इयत्तानिहाय विद्यार्थी –
नववी – 76,272
दहावी – 74,314
अकरावी – 57,155
बारावी – 56,770
तालुकानिहाय लसीकरण –
औरंगाबाद – 5208
गंगापूर – 1560
कन्नड – 8250
खुलताबाद – 0
पैठण – 6072
फुलंब्री – 3357
सिल्लोड – 3001
सोयगाव – 893
युआरसी-1 – 4986
युआरसी-2 – 4158