UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ अनारक्षित वर्गतीलच उमेदवार अर्ज करू शकतील असं म्हटलं गेले आहे. हॅलो महाराष्ट्रने या मेसेज मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊ काय आहे या मेसेज मागील सत्य.

यूपीएससी मार्फत लॅटरल भरतीवर मोठ्या प्रमाणात चर्चा केली गेली. नुकतीच या यूपीएससी परीक्षेच्या मार्फत या भरतीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सह सचिव आणि डायरेक्टर पदाच्या 30 जागा आहेत. यावरती एक मेसेज व्हायरल झाला. यामध्ये या जागेसाठी केवळ अनारक्षित जनरल वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतील असे म्हटले आहे. याची माहिती घेतली असता ही खोटी माहिती असल्याचे निदर्शनास आले.

PIB या वेबसाइटने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हायरल मेसेजमधील माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. केद्र सरकरचे लॅटरल भरती प्रक्रियेवर बाजू मांडताना म्हटले होते की, बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी त्यांना नेमून दिलेले काम करण्यास सफल होऊ शकत नाहीत. त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेषज्ञ असेल तर त्याला लॅटरल भरतीच्या माध्यमातून त्या कार्याला पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.