हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही लोकांना अनेक प्रकारच्या बचत स्कीम ऑफर करते आहे, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम (एसबीआय) ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) सारखीच स्कीम आहे, मात्र यामध्ये आपल्याला पैसे जमा करण्याची परवानगी मिळते. याचा अर्थ असा की आपण एकाच वेळी सगळ्या महिन्याचे इन्स्टॉलमेन्ट भरू शकता. या स्कीम मध्ये इन्स्टॉलमेन्ट अमाउंट ही फिक्स केलेली नाही आहे. म्हणजेच ग्राहक आपल्या नुसार इन्स्टॉलेशनची अमाउंट वाढवू किंवा कमी करू शकतात. चला तर मग या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.
आपण किती गुंतवणूक करू शकता
एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट खाते उघडल्यानंतर आपण दरमहा 5000, 10,000 रुपये जमा करू शकता, दर वर्षी आपण 50,000 पर्यंत जमा करू शकता. या महिन्यात आपण कधीही पैसे जमा करू शकता. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम साठीचा किमान कालावधी हा 5 वर्षे आणि जास्तीत जास्त कालावधी हा 7 वर्षे आहे. त्यावर दिले गेलेले व्याज फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजाप्रमाणेच असते. जर आपण वेळेपूर्वीच आपले खाते बंद केले तर आपल्याला त्यात काही दंड भरावा लागू शकतो. इंस्टॉलमेंटसाठीची मिनिमम अमाउंट 500 रुपये आहे.
खाते कसे उघडावे?
यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नाही. आपण नेट बँकिंग वापरत असल्यास आपण ते ऑनलाइनही उघडू शकता. भारतातील कोणताही नागरिक ते खाते उघडू शकतो. ही स्कीम अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. हे अकाउंट सिंगल किंवा जॉईंट मध्येही उघडले जाऊ शकते. नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही, तुम्ही खाते उघडतानाच नॉमिनी रजिस्टर करू शकता.
एसबीआयच्या या फ्लेक्सी डिपॉझिट स्कीममध्ये प्रीमॅच्युअर क्लोजरची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र, पाच लाखांपर्यंतच्या डिपॉझिटच्या सर्व टेन्योर च्या बाबतीत, व्याज दर 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात येईल. त्याचबरोबर पाच लाखांपेक्षा जास्त डिपॉझिटसाठी व्याजदरात 1 टक्क्यांनी कपात केली जाईल.
तुम्हाला मिळतील हे फायदे
प्रिसिंपल डिपॉझिटच्या 90% पर्यंत लोन / ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याज दर हा लागू दरापेक्षा 0.50 टक्के अधिक असेल. हे खाते उघडल्यानंतर 7 दिवस पूर्ण होण्या आधीच बंद केल्यास, व्याज दर शून्य होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.