लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले ; फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात विधी मंडळात अध्यक्षांपुढे सत्ताधारी व विरोधी भाजप आमदारांमध्ये धक्कबुक्की तसेच शिवीगाळ होऊन एकच गोंधळ उडाल्याचे घटना घडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावरून पुणे येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आम्ही सरकारला उघड्यावर पाडले. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम केल्यामुळेच आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले, असा आरोप फडणवीसांनी केला.

पुणे येथे आज भाजपनेते व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिवेशनात भाजप आमदारांच्या निलंबना मागचे कारण सांगितले. तसेच ते यावेळी म्हणाले कि, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर या आमच्या पक्षातील आमदारांचा समावेश आहे.

जोपर्यंत ओबीसीला राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाची लढाई लढतच राहणार आहोत. मला आश्चर्य वाटत कि अधिवेशन आले कि डेल्टा येतो, कोरोना येतो. लोकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतकरी, ओबीसी. मराठा आरक्षण, एमपीएससी याचे प्रश्न आम्ही मांडतच राहणार आहोत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.