Sunday, June 4, 2023

1 जानेवारीपासून ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महागणार, सरकारने लावला 5% GST

नवी दिल्ली । Zomato आणि Swiggy सारख्या ऑनलाइन अ‍ॅप-आधारित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर आता 5 टक्के GST भरावा लागेल. GST कौन्सिलच्या 45 व्या बैठकीत फूड डिलिव्हरी कंपन्यांना टॅक्सच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की,”या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना त्यांच्याकडून पुरवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सर्व्हिसेसवर GST भरावा लागेल.”

हा टॅक्स ऑर्डरच्या डिलिव्हरीच्या ठिकाणी आकारला जाईल. त्याच वेळी, कार्बोनेटेड फ्रुट ड्रिंक्स आणि ज्युसेसवर 28 टक्के + 12 टक्के GST लागू होईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून होणार आहे.

ग्राहक नाराज
या वृत्तानंतर सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या निर्णयावर नाराज झाले आहेत. या नव्या GST नियमानुसार आता डिलिव्हरीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील अशी भीती ग्राहकांना आहे. मात्र, लवकरच हे स्पष्ट करण्यात आले की, या निर्णयाचा अंतिम ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही कारण कोणताही नवीन टॅक्स आकारला गेला नाही. मात्र, अनेक वस्तूंच्या टॅक्स रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ग्राहकांवर परिणाम होणार नाही
ग्राहकांकडून कोणताही अतिरिक्त टॅक्स आकारला जाणार नाही आणि कोणताही नवीन टॅक्स जाहीर केलेला नाही. याआधी हा टॅक्स रेस्टॉरंटकडून भरायचा होता, आता हा टॅक्स रेस्टॉरंटऐवजी एग्रीगेटर भरणार आहेत.

समजा तुम्ही अ‍ॅपवरून जेवण ऑर्डर केले आहे. सध्या रेस्टॉरंट तुमच्याकडून पैसे घेऊन या ऑर्डरवर टॅक्स भरत आहे. मात्र अनेक रेस्टॉरंट अथॉरिटीला टॅक्स भरत नसल्याचे आम्हाला आढळून आले. अशा परिस्थितीत, आता आम्ही असे केले आहे की फूड एग्रीगेटर ग्राहकांकडून टॅक्स घेतील आणि ते रेस्टॉरंटला नाही तर अथॉरिटीला देईल. अशा प्रकारे कोणताही नवीन टॅक्स लावला जात नाही. त्याच वेळी, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्स Swaggy आणि Zomato वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर अतिरिक्त टॅक्स लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रेस्टॉरंट व्यवसायावर जो टॅक्स आकारला जातो तोच टॅक्स हे अ‍ॅप्स लावतील.

हे खाद्यपदार्थ महागणार आहेत
खाद्यपदार्थांमध्ये कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स महागले आहेत. यामुळे 28% GST आणि 12% कॉम्पेनसेशन सेस लागू होईल. यापूर्वी त्यावर केवळ 28% GST आकारला जात होता. याशिवाय आईस्क्रीम खाणेही महागणार आहे. त्यावर 18% टॅक्स आकारला जाईल. गोड सुपारी आणि कोटेड वेलचीही आता महागणार आहे. पूर्वी 5% जीएसटी लागायचा, जो आता 18% झाला आहे.