नवी दिल्ली । केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी महत्त्वाचा आहे, वास्तविक आगामी 25 वर्षे भारतासाठी महत्त्वाची आहेत असे विधान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्याला (2047) 100 वर्षे पूर्ण होण्यासाठी दूरदृष्टी ठेवली नाही तर गेल्या 70 वर्षांत जे घडले असेच पुढेही घडेल. अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी आम्ही अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
सीतारामन म्हणाल्या की,”जर लोकं आणि अर्थव्यवस्थेला या संकटातून वाचवायचे असेल तर विकास हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळेच वाढीचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर 2021 चा अर्थसंकल्पही विकासाभिमुख होता.” सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले की,”भांडवली खर्चाच्या अंतर्गत पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनवर काम केले जात आहे.” सरकार PM गति शक्ती प्रकल्पावर 23,000 कोटी रुपये खर्च करत आहे.
PM गति शक्ती योजनेअंतर्गत देशात 25 हजार किलोमीटरचे महामार्ग तयार केले जाणार आहेत. सरकारचे सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प गती शक्ती योजनेत एकत्रित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील. पंतप्रधान गती शक्तीमुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. याच्या मदतीने 100 वर्षांसाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस राजवटीला काळोख तर भाजपच्या राजवटीला अमृत काल असे नाव दिले होते. त्या म्हणाल्या की,” 2008 मधील आर्थिक संकटापेक्षा कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानाला भाजप सरकार चांगल्या प्रकारे सामोरे गेले आहे. गेल्या 70 वर्षांपैकी 65 वर्षे ते सत्तेत होते आणि त्यांचे लक्ष केवळ कुटुंब निर्माण करणे, त्यांना मदत करणे आणि त्याचा फायदा करून देणे यावर होते असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला