वीकेंड लाॅकडाऊनला आमचं सहकार्य पण…कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत फडणवीसांनी व्यक्त केली भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नुकताच वीकेंड लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर केला. यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण सरकारच्या लाॅकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. पण सध्याचा कोरोनाचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रातच का वाढतोय हे शोधणे गरजेचे असून सरकारने लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे असं म्हणत फडणवीस यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत भीती व्यक्त केली आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच जनतेला सरकारच्या लाॅकडाऊनबाबतच्या निर्णयाला सहकार्य करण्याचं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले. राज्य सरकारकडून लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

सध्याचा कोरोनाचा स्ट्रेन महाराष्ट्रातच का वाढतो आहे? नवा स्ट्रेनचे धोके नक्की काय आहेत? या बाबत राज्य सरकारने सखोल अभ्यास करणे गरजचे आहे. महाराष्ट्रातील सध्याची कोरोना परिस्थिती भयावह असून सरकारने लोकांचे प्रबोधन करावे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लसीकरण जास्तीत- जास्त कसे करता येईल यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. वीकेंड लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे लोकांच्या  रोजगारांवर गदा येणार आहे, तेव्हा अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय तघलुकी ठरेल. सरकारने तुर्तास वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवावे असं आवाहन फडणवीस यांनी केले. सरकारने काही गोष्टी या लोकांना सांगितल्या पाहिजेत. आमच्याशी चर्चा केली पाहिजे असं मतही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील परिस्थिती भयावह आहे. सध्या आक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. कोरोना रुग्णसंख्येसोबत मृत्यू संख्याही वाढतेय. कोरोनाचं थैमान पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. अशावेळी सरकारला संपूर्ण सहकार्य करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं फडणवीस यांनी म्हटले आहे. आता नवा स्ट्रेन काय आहे? तो महाराष्ट्रातच का वाढतोय, सरकारनं हे शोधणं गरजे आहे. या स्ट्रेनची लक्षणं काय आहेत, त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे. याविषयी लोकांचं प्रबोधन करणे गरजेचे आहे. सरकार या गोष्टी लोकांना सांगण्यास कमी पडत आहे. नविन स्ट्रेनमध्ये सुरूवातीला सिम्टन्स काहीही नसतात, मात्र नंतर अचानक वाढतात असं फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात मुंबई, पुणे या शहरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र त्यासोबत राज्यातील इतर ठिकाणीही लक्ष्य दिले पाहिजे. दवाखान्यात बेडस, व्हेटिंलेटर कमी पडत आहेत, ते उपलब्ध करून दिले पाहिजेत. राज्य सरकारने सक्तीची कारवाई करून वीज ग्राहकांकडून ४ ते ५ हजार कोटी रूपये वीज बिलाच्या वसुलीतून कमविले आहेत. तेव्हा आता या परिस्थितीत वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबविली पाहिजे. काही पॅकेजस दिली पाहिजेत. जगण्यापुरती मदत केली पाहिजे असंही फडणवीस म्हणाले.

संजय राऊत अकृमन्यता लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवतात

संजय राऊत व आघाडीचे नेते आपली आकृमन्यता लपविण्यासाठी केंद्रसरकारकडे बोट दाखवतात. केंद्र सरकारने काय काय मदत केली हे मी पुरव्यासहित दाखवले आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला केली आहे. मुख्यमंत्री व आघाडीचे नेते आमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात, आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. आम्ही पाठिंबा देतोय, मात्र त्यांनी राजकारण करायचं. तेव्हा त्यांनी राजकारण बंद केले पाहिजे, उठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचे आणि स्वतः मात्र हातावर हात ठेवून बसायचं. महाराष्ट्रातील हे चालणार नाही असं म्हणत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला

You might also like