हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल.
विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू करण्याच्या विचारात आहेत ज्यामध्ये तीन प्रवाशांच्या पंक्तीमध्ये फक्त एकच प्रवासी बसवला जाईल आणि दुसर्या प्रवाशाला मागील सीटवर बसवले जाईल जेणेकरून सोशल डिस्टंसिंग कायम राहील. जर अशी व्यवस्था आत केली असेल तर १८० प्रवासाच्या जागांवर फक्त ६० च प्रवासी प्रवास करू शकतील. अशा परिस्थितीत एअरलाइन्सचा होणार तोटा कमी करण्यासाठी ते १.५ किंवा ३ पट अधिक शुल्क आकारू शकतात. ही माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
प्रवाश्यांमधील अंतर १.५ मीटर असेल असा एक फ्लाइट रेझोल्यूशन प्लॅन डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) तयार करत आहे, जो लॉकडाऊननंतर सरकारने काम सुरू करण्याच्या घोषणेनंतर अंमलात आणला जाईल. असा विश्वास आहे की विमानतळावरील प्रवाश्यांसाठी नियामक १.५ मीटर अंतरावर पॉईंट्स बनवेल. हे पॉईंट्स प्रवेशद्वारातून सुरू होतील आणि इमिग्रेशनपासून ते बोर्डिंग गेटपर्यंत जातील.
भारतीय विमान कंपन्यांची हालत खराब
यापूर्वी एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरांशी याविषयी बोलले गेले आहे. पहिल्या काही आठवड्यांत प्रवास खूपच कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि अन्य विमानतळांवर १.५ मीटर अंतर करण्यात कोणतीही अडचण होणार नाही. भारतीय विमान कंपन्या खराब कामगिरी करत आहेत. फक्त इंडिगो एक अशी आहे की ज्यांच्याकडे थोडे राखीव पैसे आहेत. कोविड -१९ या साथीच्या आजारानंतर कोणत्या विमान कंपन्या टिकून राहणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.