सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात आ.अनिल बाबर यांच्या विरोधात विरोधक एकवटत असून माजी आ.सदाशिव पाटील व गोपीचंद पडळकर यांची मनोमिलन एक्स्प्रेस सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. पहिली चर्चा वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर यांच्यात तर दुसरी चर्चा थेट सदाशिव पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात झाली. वंचित आघाडी कॉंग्रेसबरोबर राज्यात येईल की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली असली तरी सांगली जिल्ह्यात काही मतदार संघात गोपीचंद पडळकर कॉंग्रेसबरोबर असतील असे संकेत मिळत आहेत.
प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीबाबत ‘मोठी घोषणा’
आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्याने खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेतेंडळींनी मोर्चेबांधणी वेग दिला आहे. दरम्यान रविवारी रात्री कुंडल रोड येथील विराज दूध संघावर माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांची बहुजन वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यातील झालेली गोपनीय भेट आगामी नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीवेळी माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, अमरसिंह देशुख आणि गोपीचंद पडळकर या तिन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज पाहता ती आमदार अनिल बाबर यांना पडलेल्या मतापेक्षा अधिकच आहे. किंबहुना विरोधक विखुरल्यामुळे बाबर यांचे काम सोयीचे ठरते, असे सर्वसाधारण चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ही आमदार बाबर यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना साथ दिली. गोपीचंद पडळकर हे वंचितचे उमेदवार होते तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विशाल पाटील यांना मदत केली.
कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….
लोकसभेच्या निवडणूकीत आमदार बाबर यांनी भाजपला दिलेल्या मतांपेक्षा गोपीचंद पडळकर आणि सदाशिवराव पाटील यांच्या मतांची बेरीज जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पडळकर – पाटील यांच्या सोबतीने आटपाडीच्या देशमुखांनी यायचे ठरवले तर बाबर विरोधकांची ताकद वाढतच जाणार आहे. सध्या बाबर यांनी टेंभूचे पाणी आणण्याबरोबर विकासकामांचा मोठा धडाका लावला आहे. त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. खासदार संजयकाका पाटील यांची त्यांना साथ ळिणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आमदार बाबर यांना रोखायचे असेल तर शत्रूचा शत्रू तो मित्र या धोरणानुसार सर्व विरोधकांना एकत्र यावे आणि बाबर यांच्या विरोधात एकसंघ होऊन एकच उमेदवार द्यावा, असा मतप्रवाह गेल्या काही दिवसांपासून सुरू होता.
वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !
चार दिवसांपुर्वी आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशुख, साजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर व विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅॅड. वैभव पाटील या तीन युवा नेत्यांची शनिवारी आटपाडी पंचायत समितीच्या विश्रामगृहात एक बैठक झाली होती. त्या बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच दस्तुरखुद माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रविवारी रात्री सुमारे तासभर चर्चा विराज दूध संघावर झाली. ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. दोन्ही नेत्यांच्याकडून अधिकृत माहिती दिली नसली तरी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित होवून आगामी राजकारण एकसंघ करावयाचे आणि विधानसभेला एकच उमेदवार देवून विरोधकांची मतविभागणी टाळायची अशी विद्यमान आमदार अनिल बाबर यांना रोखण्याची रणनीती आखली जात असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.
इतर महत्वाच्या बातम्या –
सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?
गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाजाची फसवणूक झाली : प्रतिक पाटील
राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?