Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 1665

कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी : रणजित पाटील

Karad City Press Conference

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष शंभूराज रैनाक, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष काकासाहेब जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र माने, निता लोंढे, मोनिका गोरे, गुलाबराव पाटील, प्रमोद वर्णेकर, गणेश भोसले, महेश पाटील, दिलीप पाटील, रोहीत पंडित आदी उपस्थित होते. सदरचा निधी प्रामुख्याने शिवाजी हाऊसिंग सोसायटी, प्रकाशनगर, रुक्मिणी इस्टेट,  कृष्णांगण सोसायटी, पाटील नगर, राजाराम नगर व वाढीव भागातील प्रभाग दोनसाठी मंजूर झाला असून लगतच्या काही प्रभागांनाही निधी मंजूर झाला आहे.

मंजूर झालेला निधीत पुढील विकासकामांचा समावेश ः- वैशिष्टय़पूर्ण योजनेनुसार लिबर्टी मजदूर मंडळ कराड येथे इनडोअर कबड्डी स्टेडीयम विकसित करणे 1 कोटी 45 लाख, लिबर्टी मंडळाचे ग्राऊंड, बाल्कनी व जिम्नॅशियम विकसित करणे 1 कोटी 10 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील पवार नगरमधील राजाराम पार्क ते डी. जी. पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख, प्रभाग क्रमांक 2 मधील एलआयसी ऑफिस ते विरंगुळा बंगला रस्ता बीएम, बीसी करणे 40 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड 47 नं. डांबाच्या पश्चिमेस हणमंतराव कदम ते गुरुप्रसाद धाबा ते मोहन पाटील वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 95 लाख, शहरातील प्रमुख रस्त्यावर आईज कॅट बसवणे, थर्मोप्लास्टीक पेंट मारणे 50 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाशनगर रोड ते रुक्मिणी इस्टेट ते कृष्णांगण सोसायटी व पाटील नगर, राजाराम नगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सोलर एलईडी पथदिवे बसवणे 90 लाख, प्रभाग 2 मधील कॉटेज हॉस्पिटल ते प्रकाशनगर बिल्डिंग कॉर्नरपर्यंत पूर्व पश्चिम रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 45 लाख,  प्रभाग 2 मधील डॉ. महेश पाटील यांच्या घरापासून कृष्णांगण सोसायटीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 31 लाख, प्रभाग 2 मधील जीवन रेखा पतसंस्थेपासून कलबुर्गी घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 19 लाख, कामगार चौक ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 85 लाख, प्रभाग 2 मधील कृष्णांगण सोसायटी मधील वीतराग अपार्टमेंटपासून सतीश चव्हाण घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 25 लाख,  प्रभाग 2 मधील सर्वे नं. 69/1 येथील मुळे, गुरसाळे, ओसवाल, शाह बंधू येथील ओपन स्पेसमध्ये गार्डन व ओपन जिम विकसित करणे व प्रभाग 2 मधील वाढीव भाग रुक्मिणी इस्टेटमधील ओपन स्पेसमधील गार्डन विकसित करणे 10 लाख, 2 मधील डॉ. काझी ते राम मंदिर पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 25 लाख, प्रभाग 2 मधील विठामाता हायस्कूल ते पी. पी. शिंदे घर ते शिवाजी स्टेडीयम दक्षिण बाजू गेटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 2 मधील वाडीलाल घर ते झोपडपट्टीपर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाढीव भाग वाखाण रोड सुनील पवार घर ते दिलीप गुरव घर ते कलबुर्गी यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील वाखाण रोड पी. डी. पाटील पार्कमधील घनश्री घरापासून ते हॉलीवूड फोटोग्राफ यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 21 लाख, प्रभाग 2 मधील प्रकाश नगरमधील अंतर्गत रस्ते बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील रुक्मिणी इस्टेटमधील अंतर्गत रस्ते करणे बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 1 मधील दत्त मेडिकल ते मोमीन राऊंड बिल्डिंगपर्यंत रस्ता बीएम बीसी करणे 20 लाख, प्रभाग 3 मधील बुधवार पेठ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय पर्यंत रस्ता बीएम, बीसी करणे 20 लाख, प्रभाग 2 मधील खोजा घर ते चव्हाण घरावरून मिया नाना वस्तीपर्यंत रस्ता खड़ीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, प्रभाग 5 मधील गुरुवार पेठेतील आशूरखाणा ते मुस्तफा सय्यद घरापर्यंत सार्वजनिक वापराच्या ठिकाणी काँक्रीट करून लादीकरण करणे 10 लाख असा एकूण 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्याकडून 27 कोटी कराड शहरासाठी
मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी यापूर्वी येथील नियोजित धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आणखी 10 कोटी रूपये शहरातील विकासकामांसाठी मंजूर केले आहेत. तर जिल्हा नियोजन मधून अजून 9 कोटी रूपये मंजूर होणार आहेत. त्यामुळे कराड शहरासाठी एकूण 27 कोटीचा निधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मिळाला असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली.

हौशी लोक या गृप तर्फे पुणे विद्यापीठात रक्त दान शिबीराचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कलाकारांसाठी “हौशी लोक” नावाचा एक ग्रुप सुरू केला आहे.कलेसोबतच विविध सामजिक उपक्रमामध्ये हा ग्रुप सतत चर्चेत असतो. किशोर सातपुते आणि ऋषी साबळे यांनी सुरू केलेल्या अनोख्या “#लढा रक्तदानाचा” या मोहिमअंतर्गत दिनांक 7 जानेवारी रोजी पुणे विद्यापीठामध्ये रक्तदाब शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये १५१ रक्तदात्यानी आपले रक्त दिले. यामधे तरुण विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग दिसला.

या रक्तदाना निमित्त “थॅलेसेमिया” या आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली. या आजारामध्ये रुग्णाच्या शरीरात रक्त तयार होत नाही व त्यांना दर 15-20 दिवसांनी रक्त बदलावं लागतं. दरवर्षी अनेक लहान मुले केवळ योग्य वेळेत माहिती आणि रक्त उपलब्ध न झाल्यामुळे मरण पावतात.

या आजाराची माहिती तरुण मुलांना व्हावी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात भरून काढता यावा, या उद्देशाने “हौशी लोक” या ग्रुप ने आयोजित केलेल्या पहिल्याच रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.विशेष सहकार्य- महेश दादा आणि अक्षय रक्तपेढी, हडपसर .आणि डॉ प्रफुल्ल पवार सर कुलसचिव पुणे विद्यापीठ, विनोद वाघमारे यांचे लाभले.

हे पण वाचा :
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर
बँकेच्या खात्याशी संबंधित नियमांत बदल, RBI म्हंटले कि…
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या

Optical Illusion : बाथरूममध्ये ठेवला आहे हेडफोन; आहे का 10 सेकंदात शोधून दाखवायची हिम्मत

Optical Illusion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोशल मीडियावर Optical Illusion इमेजमुळे मेंदूंना चांगलीच चालना मिळत आहे. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना मेंदूचा व्यायाम होतो आणि निरीक्षण करण्याच्या कौशल्यांमध्ये अधिक वाढ होते. आजही तुमच्यासाठी एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजनचे चित्र आणले आहे. या चित्रामध्ये तुम्हाला फक्त १० सेकंदात हेडफोन शोधायचा आहे.

एका बाथरूममधील खोलीत एका ठिकाणी हेडफोन ठेवण्यात आलेला आहे. हेडफोनसोबत अनेक वस्तूही आहेत. त्यामधून हेडफोन शोधून काढायचा आहे. एका कपाटावर खाल;इ लोंबकळत दिसत असलेली काळी वायर हि काय हेडफोन नाही, त्यामुळे इतर जागी ठेवलेला हेडफोन तुम्हाला शोधावा लागणार आहे.

चित्रात खोलीत असणाऱ्या इतर वस्तूंमधून हेडफोन शोधणे इतके सोपे नाही. कारण या खोलीत अनेक वस्तू आहेत. त्यामुळे सहजासहजी हेडफोन शोधण्यात यश येणार नाही. मात्र जर तुम्हाला हेडफोन सापडलेच नाहीत तर खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही सहज हेडफोन पाहू शकता.

Optical Illusion Image

‘या’ ठिकाणी आहे हेडफोन

खोलीतील बाथरूममधील दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता की अनेक गोष्टी दिसत आहेत. मात्र, हेडफोन अशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे की, तो ओळखणे कठीण आहे. हा हेडफोन वॉशिंग मशिनप्रमाणे बनवलेल्या कपाटात ठेवलेला आहे. त्याच्या समांतर डिटर्जंटच्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. हेडफोन देखील त्याच रंगात आहे, त्यामुळे तो सहज दिसत नाही.

एकाच सीरिअल नंबरच्या दोन नोटा असतील तर… जाणून घ्या त्यासाठीचे RBI चे नियम

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे असलेल्या नोटांबाबत अनेकदा आपल्या मनात शंका येते ती खोटी तर नसेल ना… RBI कडून वेळोवेळी खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखण्यासाठीची माहिती शेअर केली जात असते. मात्र तरीही असे काही प्रश्न आहेत, जे आपल्या मनात घर करून राहतात. जसे कि, आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटांचा एकच सीरियल नंबर असेल तर. अशा स्थितीत काय करता येईल??? चला तर मग याबाबत RBI चे नियम जाणून घेऊयात…

New Rs 500, Rs 2000 notes: All you need to know - India Today

हे लक्षात घ्या कि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशभरात चलन जारी केले जाते. कायद्याच्या कलम 22 नुसार, भारतामध्ये फक्त रिझर्व्ह बँकेलाच नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे कलम 25 असे स्पष्ट सांगण्यात आले आहे की, नोटांचे डिझाईन, फॉर्म आणि सामग्री हे RBI च्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशींचा विचार केल्यानंतरच केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल.

RBI New Banknote Rs 500 and Rs 2000: The new Rs 500 and Rs 2000 bank notes  - You should know this

तर मग आता मूळ प्रश्न असा पडतो आहे की, जर कोणत्याही दोन नोटांचा सीरियल नंबर एकसारखाच असेल तर त्या वैध मानल्या जातील का??? या संदर्भात, RBI सांगते की होय, दोन किंवा जास्त नोटांवर एकसारखाच सीरियल नंबर असण्याची शक्यता आहे, मात्र एकतर त्यांचे इनसेट लेटर वेगवेगळे असतील किंवा छपाईचे वर्ष वेगवेगळे असतील किंवा त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन वेगवेगळ्या गव्हर्नरची स्वाक्षरी असेल. यामध्ये इनसेट लेटर म्हणजे नोटेच्या नंबर पॅनलवर छापलेले अक्षर आहे. त्याच प्रमाणे नोटांवर कोणतेही इनसेट लेटर नसू शकतील.

You can exchange soiled or mutilated currency notes free of cost at any  bank | Mint

इथे हे जाणून घ्या कि, ऑगस्ट 2006 पर्यंत जारी केलेल्या बँकेच्या नोटांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून नंबर दिला जात असे. यातील प्रत्येक नोटांना नंबर किंवा अक्षरे/रों ने सुरू होणारा एक सीरियल नंबर देण्यात येत होता. या नोटा 100 नगांच्या पॅकेटच्या स्वरूपात जारी केल्या जातात. समजा एखादी नोट पेमेंट करण्याच्या स्थितीत नसेल तर ती कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन बदलता येईल. तसेच ज्या बॅंकेकडे आपण नोट देत आहोत ती बँक अशा नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवतात जिथे त्या नष्ट केल्या जातात.

Do you have soiled, torn Rs 10, Rs 20, Rs 50, Rs 100, Rs 200, Rs 500 or  even Rs 2,000 notes; do this, to benefit | Zee Business

त्याचप्रमाणे चलनातून काढून घेतलेल्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्ये देखील स्वीकारल्या जातात. RBI, इतर गोष्टींबरोबरच या नोटांची पडताळणी करते आणि सर्व प्रकारच्या चाचण्यांनंतर सर्व अयोग्य नोटा वेगळ्या करून त्यांना नष्ट करण्याच्या श्रेणीत टाकते.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://m.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=136

हे पण वाचा :
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर
बँकेच्या खात्याशी संबंधित नियमांत बदल, RBI म्हंटले कि…
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या

महाविद्यालये, विद्यापीठांनी एकाच वेळी दुहेरी पदवी मिळविण्याची प्रक्रिया सोप्पी करावी- UGC

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. यूजीसीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. या आदेशानंतर, विद्यापीठांना अशा अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले.

“सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना (HEIs) विद्यार्थ्यांना त्यांच्या वैधानिक संस्थांद्वारे एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची परवानगी देण्यासाठी यंत्रणा तयार करण्याची विनंती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी, या योजनेची अंमलबजावणी कृपया खात्रीपूर्वक केली जावी आणि आतापर्यंत केली गेली नसेल तर ती जलद केली जावी, ”यूजीसीने आपल्या ताज्या आदेशात म्हटले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी आल्याने UGC चे निर्देश हे आले आहेत. HEI दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी स्थलांतर प्रमाणपत्रे आणि शाळा सोडल्याचा दाखला मागत होते. कागदपत्रांअभावी एकाच वेळी दोन कार्यक्रम देण्याच्या उद्देशाला हरताळ फासत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची परवानगी देणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींचा भाग होता. यूजीसीने निर्देश जारी केले की कोणताही विद्यार्थी त्याच्या आवडीच्या आधारावर दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतो. हे दोन्ही पदवी प्रोग्राम असू शकतात किंवा विद्यार्थी एक पदवी आणि एक डिप्लोमा निवडू शकतात, असेही यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ugc.ac.in/

हे पण वाचा :
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद धोक्यात? 23 जानेवारीला नेमकं काय घडणार?
Bank FD Rates : खुशखबर !!! ‘या’ बँका FD वर देत आहेत 7% पेक्षा जास्त व्याज

 

अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारनं वसुलीचा उच्चांक गाठला; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सहा महिन्यांपूर्वी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यानंतर सरकार काय असते, याची जाणीव जनतेला व्हायला लागली. मागील अडीच वर्षांचे सरकार बंदीस्त होते. दाराआड होते. तसेच हे सरकार फेसबुक लाईव्हवर होते. मात्र, त्या सरकारमध्ये केवळ वसुली दिसत होती. अडीच वर्षाचे सरकार बंदिस्त असूनही त्यांनी वसुलीचा उच्चांक गाठला, तसे मंत्रीही वर्क फ्रॉम जेल होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, गेल्या अडीच वर्षामध्ये या सरकारमधील मंत्र्यांपासून सर्वच तुरूंगात दिसले. वर्क फ्रॉम होम आपण पाहिलं होते. पण वर्क फ्रॉम जेल हा नवीन प्रकार आपल्याला अडीच वर्षात बघायला मिळाला.

कारण तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत आणि नैतिकता नव्हती की, जेलमधल्या मंत्र्याचा ते राजीनामा घेतील. शेवटी काय झालं, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले आणि तेव्हाच त्यांचा कारभार बंद झाला, असे फडणवीस यांनी म्हंटले.

महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) जोराची धडक दिली. वराडे गावच्या हद्दीत आज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. साताराहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेनवरती अपघात झाला.

ट्रकला पाठिमागून आयशरने धडक दिल्याने चालक केबिनमध्ये आडकला होता. त्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून कराड येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयशरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी तळबीड पोलिस स्टेशन व हायवे हेल्पलाईनचे कर्मचाऱ्यांनी मदत केली.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूखची ‘इतकी’ आहे संपत्ती?; आकडा ऐकून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या बिग बजेट ‘पठाण’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून त्याने अनेक यश मिळवले. त्याचा प्रत्येक चित्रपट हा कित्तेक कोटींचा असतो. या किंगखानची नक्की किती संपत्ती आहे? याचा विचार जर आपण केला तर थक्क होऊन जाऊ. पाहूया शाहरुखची किती आहे संपत्ती…

https://www.instagram.com/p/CmBqbGQoTpB/?utm_source=ig_web_copy_link

बाजीगर, डॉन, आणि आता बिग बजेट चित्रपट ‘पठाण’ मुळे चर्चेत आलेल्या शाहरुख खान हा हजारो कोटी रुपयांचा संपत्तीचा मालक आहे. एवढंच नाही तर तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन 8 जानेवारी रोजी एक यादी जाहिर करण्यात आली. यामध्ये शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असल्याचे सांगितले आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीतील माहितीनुसार शाहरुखकडे ७७० मिलियन डॉलर म्हणजे भरतीय रुपयानुसार 66 हजार 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय शाहरुखकडे सीमारे 12 आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपयेहून अधिक आहे. अलिबागमध्येही त्याचा एक फार्महाऊस असून दुबईतही शाहरुखने घर विकत घेतले आहे.

https://www.instagram.com/tv/CaSDE-_AjQs/?utm_source=ig_web_copy_link

एका जाहिरातीसाठी एवढं घेतो मानधन?

शाहरुखला जर एक जाहिरात करायची असेल तर तो करोडोच्या घरात मानधन घेतो. शाहरुखने बायजू आणि किडजानिया या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, हुंडई, टॅग ह्यूअर, डिश टीवी, बिग बास्केट आणि बायजूस अशा बड्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये देखील शाहरूखने काम केले आहे. एका रिपोर्टनुसार तो एका जाहिरातीसाठी तब्बल 3.5 से 4 कोटी रुपये मानधन घेतो, असे सांगितले जात आहे.

shahrukh khan bmw

शारूखकडे आहेत अनेक महागड्या गाड्या

शाहरुख वापरत असलेल्या गाड्याचीही कायम चर्चा होत असते. त्याच्याकडे तब्बल १४ कोटींच्या असलेल्या गाड्यांमध्ये एकाहून एक सरस आलिशान गाड्यांचा समावेश आहे. शाहरुखकडे Bugatti Veyron, BMW 6 Series, Mitsubishi Pajero, BMW 7 Series Car, Audi A6, Land Cruiser, Rolls Royce Drop Hate Coupe अशा लक्झरी गाड्या आहेत. शिवाय ४.१ कोटी रुपयांची Rolls Royce coupe आहे. तर 4 कोटी रुपयांची Bentley Continental GT आहे. तर 2.8 कोटीची Mercedes Benz S600 आहे. तर Audi A6 ही 56 लाखांची असून 1.3 कोटींच्या BMW 7 सिरीज आहे.

Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह

Surya Nutan Solar Stove

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Surya Nutan Solar Stove : सध्याच्या सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरचे गणितच बजेट बिघडवले आहे. अशातच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात वाढच होते आहे. मात्र एक पद्धत वापरून आपल्या खर्चात कपात करता येऊ शकेल. यासाठी आपल्याला फक्त घरगुती स्वयंपाकाच्या गॅसऐवजी सोलर स्टोव्ह घ्यावा लागेल. हे जाणून घ्या कि, सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून सोलर स्टोव्ह डेव्हलप केला गेला आहे. याद्वारे आपल्याला महागड्या स्वयंपाकाच्या गॅसपासून सुटका मिळू शकेल.

Indian Oil unveils indoor solar cooking stove, Surya Nutan - BusinessToday

हे लक्षात घ्या कि, सूर्य नूतन असे नाव असलेल्या या स्टोव्हचे डिझाईन इंडियन ऑइलच्या फरीदाबाद येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये तयार करण्यात आले आहे. इंडियन ऑईलकडून त्यासाठीचे पेटंटही घेण्यात आले आहे. हा सोलर स्टोव्ह हायब्रिड मोडवर देखील काम करू शकेल. म्हणजेच यामध्ये सौरऊर्जेशिवाय विजेचे इतर स्रोतही वापरले जाऊ शकतील. Surya Nutan Solar Stove

Union Ministers witness demonstration of Indian Oil's Surya Nutan indoor  solar cooking system

या सोलर स्टोव्हमध्ये दोन युनिट्स देण्यात आले आहेत. यापैकी एक युनिट स्वयंपाकघरात तर दुसरे युनिट बाहेर उन्हात ठेवावे लागेल. ज्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी या स्टोव्हला सौरऊर्जेद्वारे चार्जिंग मिळू शकेल. सूर्या नूतन ही सौर ऊर्जेवर चालणारी एक रिचार्जेबल आणि इनडोर कुकिंग सिस्टीम आहे. जी चार्ज केल्यानंतरही वापरता येणार आहे.Surya Nutan Solar StoveSurya Nutan Solar Stove: घर ले आइए ये सरकारी स्टोव, फ्री में बनेगा खाना...  भूल जाएंगे महंगे LPG सिलेंडर - Utility AajTak

हा सोलर स्टोव्ह वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. याच्या प्रीमियम मॉडेलद्वारे चार जणांच्या कुटुंबासाठी पूर्ण जेवण (नाश्ता + दुपारचे जेवण + रात्रीचे जेवण) तयार करता येऊ शकते. यामध्ये देण्यात आलेले इन्सुलेशन डिझाइन सूर्याच्या किरणोत्सर्ग आणि उष्णतेमुळे होणारे नुकसान कमी करते. Surya Nutan Solar Stove

Union Ministers witness demonstration of Indian Oil's Surya Nutan indoor  solar cooking system

याची खास बाब अशी कि, यासाठी फक्त एकदाच पैसे खर्च करून दर महिन्याला घ्यावा लागणाऱ्या महागड्या स्वयंपाकाच्या गॅसपासून सुटका मिळेल. याच्या मदतीने प्रत्येक महिन्यासाठी येणार गॅस सिलेंडरचा खर्चही कमी होऊ शकेल. या स्टोव्हच्या बेस मॉडेलची किंमत 12,000 रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 23,000 रुपये आहे. मात्र, आगामी काळात त्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल, असे इंडियन ऑइलने म्हंटले आहे. Surya Nutan Solar Stove

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.iocl.com/NewsDetails/59326

हे पण वाचा :
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Stock Tips : नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या
TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये

जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया : खा. श्रीनिवास पाटील

Road Safety Campaign

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सध्या वाहतुकीचा वेग वाढला आहे. या वाढलेल्या वेगामुळेच अपघतांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रवास करताना सर्वांनी वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. सहसा रात्रीचा प्रवास टाळावा. अपघात टाळण्यासाठी डोळे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रवास करताना जास्ती काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग्य नियोजन करा, त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मोबाईलचा वापर टाळणे म्हणजेच अपघात टाळतो. अपघात मुक्ती ही सर्वांची सामुदायीक जाबाबदारी आहे. तसेच एखादा अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना मदत करणेही तितकेच महत्वाचे आहे. रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा असून आपला जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

सातारा सैनिक स्कूलच्या सभागृहात 34 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी ते बोलत. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सैनिक स्कूलचे लेंप्टनन कर्नल पी.डी. पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, रस्ता सुरक्षामध्ये नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देशच लोकांमध्ये जागृता निर्माण करणे हा आहे. नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीचे नियम पाळावेत. विद्यार्थ्यांनाही या अभियानामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची भावना निर्माण झाल्यावर त्यातून जबाबदार नागरिक निर्माण होतात. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वेग मर्यादा ओलांडलेल्या 10 हजार वाहनांवर कारवाई
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या अपघात नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून हेल्मेटचा वापर, वेग, ऊस वाहतूक करणारी वाहणे यांची तपासणी केली जाते. वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी सुमारे 10 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच दरमहा 60 लाख रुपयांचा दंड विभागाकडून वसुल केला जातो. खासगी बसेसवर राज्यात सर्वाधिक कारवाई सातारा विभागाकडून करण्यात आली आहे. दुचाकी स्वारांची सुरक्षा यास प्राधान्य देवून अंमलबजावणी केली जात आहे. अपघातप्रवण स्थळांची यादी तयार करण्यात आली असून त्या तालुक्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा नियमित आढावा घेतला जातो. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघात तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शास्त्रीय तपासणी करुन पुन्हा त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातात.