Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1666

दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Eating dates with milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या काळात, बदललेली जीवनशैली, कामाचा ताण, जेवणाच्या वेळी या कारणांमुळे शारीरिक कमजोरी आणि तणावाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत शरीराला संपूर्ण पोषण देण्यासाठी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दूध. (Milk) दूध हे एक सुपरफूड आहे, त्याचे सेवन केल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. दुधात कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आणि प्रथिने इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात. त्यातच जर तुम्ही दूध आणि खजूर (Dates) एकत्र करून खाल्ले तर तुमच्या शरीराला त्याचे जबरदस्त फायदे होऊ शकतात.

खजूरमध्ये फायबर, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे ए, सी, ई, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे आणि लोह यांसारखी खनिजे असतात. खजूर दुधात मिसळून खाल्ल्यास त्याचे जबरदस्त फायदे होतात. दुधात खजूर टाकून प्यायल्याने शरीराला ताकद तर मिळतेच याशिवाय अनेक आजारही दूर होतात. यासाठी 3-4 खजूर दुधात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर प्या. चला जाणून घेऊया यामुळे शरीराला कोणकोणते फायदे होतात.

Eating dates with milk
Eating dates with milk

1) रक्ताची कमतरता दूर होते –

दूध आणि खजूर एकत्र सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. याशिवाय रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि खजूराचे सेवन करावे.

2) हाडे मजबूत होतात-

दुधामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. त्याच दुधात जर खजूर मिक्स केलं तर त्याचे दुप्पट फायदे होतात. दूध आणि खजूर एकत्र घेतल्याने शरीराला कॅल्शियम मिळतं आणि त्यामुळे हाडे मजबूत होतात. यासोबतच सांधेदुखी आणि अशक्तपणासुद्धा दूर होतो.

Eating dates with milk

3) त्वचा चमकदार होते-

त्वचा चमकदार होण्यासाठी दूध आणि खजूर एकत्र सेवन करणे खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेची चमक वाढते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी खूप उपयुक्त असते.

Eating dates with milk

4) पोटाची समस्या दूर होते-

पोटाची समस्या असेल तर दूध आणि खजूर एकत्र करून खा. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण खूप चांगले असते आणि ते दुधात भिजवल्यानंतर घेतल्याने पचनाची समस्या दूर होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील Bank of Baroda ने मंगळवारी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Bank of Baroda ने MCLR मध्ये 30 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे हे नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू होतील. BOB ने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

Bank of Baroda sees loan growth of 7-10 pc in FY22 - The Economic Times

आपल्या नियामक फाइलिंगमध्ये Bank of Baroda कडून ही माहिती देण्यात आली आहे. बँकेने सांगितले की, आता ओव्हरनाईट MCLR दर 35 बेस पॉइंट्स म्हणजेच 7.85 टक्क्यांनी वाढवला आहे, तर एक महिन्याचा कालावधी 20 बेस पॉइंट्सने म्हणजेच 8.15 टक्क्यांनी वाढवला आहे. 

Bank of Baroda - Increase in Brand Value - Passionate In Marketing

इतर कालावधीचे दर जाणून घ्या

आता Bank of Baroda कडून तीन महिन्यांचा MCLR 8.05 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे. याबाबत BoB ने सांगितले की, सहा महिन्यांचा MCLR 8.15 टक्क्यांवरून 8.35 टक्के तर एका वर्षाच्या कालावधीसाठी 8.20 टक्क्यांवरून 8.50 टक्के झाला आहे. MCLR वाढल्याने कॉर्पोरेट कर्जदारांवर परिणाम होईल.

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank of Baroda

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/hi-in/media/press-releases/bank-of-baroda-reduces-mclr-by-15-bps-deposit-rates-across-tenures

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे

जलेबी बाईनंतर आता जलेबी बाबाचा प्रताप!; चहा पाजून केले 120 हून अधिक महिलांवर अत्याचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

सध्या हरियाणाच्या जलेबी बाबाची चांगलीच चर्चा होत असून त्याने महिलांना तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार केला आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना येथून पोलिसांनी या जलेबी बाबाला अटक केली होती. या बाबाने एक नाही दोन नाही तर तब्बल 120 अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार केला. हे कृत्य करण्यासाठी तो एक विशिष्ट अशी पद्धत वापरायच्या. तो त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना तसेच मुलींना नशिली चहा द्यायचा. तो चहा पिल्यानंतर त्या बेशुद्ध होत असे. आणि त्यानंतर सुरु व्हायचा या बाबाचा अघोरी कार्यक्रम. त्यानांतर तो त्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि त्यांना ब्लॅकमेलही करायचा.

या बाबाच्या कृत्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाबाच्या अड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बाबाकडे 120 महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले. त्यानंतर हरियाणातील फतेहाबादमध्ये आपल्या भोंदुगीरीने महिलांना गंडवणाऱ्या या 63 वर्षांच्या जलेबी बाबाला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अमरपुरी उर्फ ​​जलेबी बाबा याला 5 जानेवारीला दोषी ठरवून 10 जानेवारी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे.

जलेबी बाबा अमरपुरीत ‘बिल्लू’ नावाने प्रसिद्ध

महिलांवर अत्याचा करणाऱ्या या जलेबी बाबावर फतेहाबादच्या टोहाना शहर पोलिसांनी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. हा बाबा अमरपुरीत बिल्लू या नावाने पर्सिथ होता. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या पीडितांचे असे सुमारे 120 व्हिडिओ तपासादरम्यान समोर आले.

सहा मुलाचा बाप कसा झाला जलेबी बाबा?

महालावर अत्याचार करणारा जलेबी बाबा हा 23 वर्षांपूर्वी पंजाबच्या मानसा शहरातून तोहानाला आला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. चार मुली आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सुरुवातीला तो 13 वर्षे त्यांनी जिलेबीचा स्टॉल चालवला. यादरम्यान त्यांची भेट एका तांत्रिकाशी झाली ज्याने त्यांना तांत्रिक साधनेची सुरुवात केली. यानंतर तो टोहना येथून काही वर्षे गायब झाला. यानंतर तो परत गावात आला आणि मंदिराशेजारी घर बांधले. नंतर त्याने भोंदुगिरीचा धंदा थाटला आणि बघता बघता तो जलेबी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला.

इथं महिला अनं पुरुष फक्त अंडरवेअरवर पडतात घराबाहेर; पॅन्ट न घालण्याचं कारण काय पहा..

No Trousers Tube Ride

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या वेशभूषा असलेली माणसं पाहिली असतील, पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये पँटन घातलेले स्त्री- पुरुष बघितले आहेत का ? ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी लंडन मध्ये असं अनेक वर्षांपासून घडलं आहे. याबाबतचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इथल्या महिला अनं पुरुष मंडळीही पॅन्ट न घालता फक्त अंडरवेअरवर का बाहेर फिरतात यामागचे नेमकं कारण आज आपण जाणून घेऊया.

खरं तर लंडनमधील मेट्रो मार्गावरून जाणारे लोक जाणूनबुजून 9 जानेवारी रोजी पॅन्ट न घालता फक्त अंडरवेअरवर बाहेर पडतात. याचे कारण म्हणजे या लोकांनी सुरु केलेलं No Trousers Tube Ride ही परंपरा… सुमारे २० वर्षांपूर्वी न्यूयॉर्क मध्ये या परंपरेला सुरुवात झाली. फक्त मज्जा आणि करमणूक म्हणून सुरुवातील No Trousers Tube Ride सुरु केलं होत. त्यावेळी अवघ्या 7 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हे 7 जण 7 मेट्रो स्टॉपवर चढले आणि असं नाटक केलं कि जस कि एकमेकांना कधी बघितलंच नाही. त्यांनतर जगभरातील लंडन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह जगभरातील 60 हुन अधिक शहरात हा ट्रेंड सुरु झाला.

यामध्ये भाग घेण्यासाठी फक्त 2 गोष्टी कराव्या लागतात. 1 म्हणजे पॅन्ट न घालायची समंती आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हेंट मध्ये भाग घेत असताना तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसायला नकोत. जस कि तुम्ही पॅन्ट घातलेली नाही ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे असं समजूनच तुमचं वर्तन असावं. कोरोनाच्या मधल्या 2 वर्षाच्या काळात यामध्ये खंड पडला होता. परंतु यावर्षी लंडन मधील स्टिफ अपर लिप सोसायटीने या इव्हेंटचे आयोजन केलं असून यंदा या ट्रॅडीशन ची 12 वि वेळ आहे. नो ट्राउजर डेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद धोक्यात? 23 जानेवारीला नेमकं काय घडणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षप्रमुखपद धोक्यात आले आहे. दरम्यान 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आता आयोग व न्यायालय नक्की कुणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 जानेवारी 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड 5 वर्षांसाठी करण्यात येते. ही मुदत 23 जानेवारी 2023 ला संपत आहे.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट

काल निवडणूक आयोगासोमार पार पडलेल्या सुनावणीवेळी संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली. मात्र, निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय देण्यात आला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर चिन्हांबाबत सुनावणी घेण्याचे आयोगाच्यावतीने सांगण्यात आले.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाला बदल, पहा आजचे ताजे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज, (11 जानेवारी रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.06 टक्के वाढीने ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही 0.24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्या-चांदीचे दर 0.31 टक्क्यांनी घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

आज, फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 09:25 पर्यंत 33 रुपयांनी वाढून 55,745 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,819 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीचा दर 166 रुपयांनी वाढून 68,529 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज चांदीचा भाव 68,501 रुपयांवर उघडला. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज जिथे सोने ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे, तिथेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज 0.32 टक्क्यांनी वाढून $1,876.74 प्रति औंस तर चांदीचा दर 0.05 टक्क्यांनी घसरून 23.65 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold prices today rise for 3rd day in a row, near 3-month high, silver rates rise | Mint

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,300 रुपये
पुणे – 51,300 रुपये
नागपूर – 51,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 55,960 रुपये
पुणे – 55,960 रुपये
नागपूर – 55,960 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 122; silver gains Rs 340 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट

सातारा गारठला : महाबळेश्वरच्या वेण्णालेकचे तापमान 4 अंशावर

Mahabaleshwar Temperature

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 4 अंश पर्यंत खाली गेला आहे.

वेण्णालेक परिसरात आज पहाटे वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाले होते. तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल.

महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. सध्या वेण्णालेक परिसरामध्ये होणारे हिमकण पाहण्यासाठी व गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी वळत आहेत. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वर पर्यटनास आलेले पर्यटक या कडाक्याच्या थंडीमुळे ”मिनी काश्मीर” ला काश्मीरच्या थंडीचा ”फील” अनुभवयाला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शोल्स, मफलर, कानटोपी अश्या गरम वस्त्रे परिधान गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. हॉटेल्समध्‍ये पर्यटकांसाठी ”बॉनफायर” ची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे तर शहरालगतच्या अनेक ढाब्यांवर शेकोटीचा आधार अनेकजण घेत आहेत.

ED छापेमारीनंतर हसन मुश्रिफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, विशिष्ट जाती- धर्माच्या…

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने (ED) छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. विशिष्ट समाजावर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी हसन मुश्रीफ यांनी केला.

मुश्रीफ म्हणाले की, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरून मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

आज सकाळपासून माझ्या घरावर, नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापे टाकल्याचे समजले. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. मी काही कामानिमित्त बाहेर आहे. परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांनी आपण सहकार्य करावं. कायदा- सुव्यवस्था अडचणीत येईल असं कोणतेही कृत्य करू नका असं आवाहन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दिले.

यापूर्वी देखील अशाप्रकारचे छापे पडले होते. त्यावेळी सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. तरीही आज पुन्हा का छापा टाकला हे आपल्याला माहित नाही. कोणत्या हेतून ही कारवाई केली हेही कळत नाही. याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करेन मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतात राखावी असंही मुश्रीफ म्हणाले.

4 दिवसांपूर्वी कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केले होते. गलिच्छ राजकारणाचा हा प्रकार असून अशा प्रकारच्या कारवाईचा निषेधच झाला पाहिजे. आधी नवाब मालिकांवर कारवाई झाली, आता माझ्यावर होणार आहे आणि किरीट सोमय्या म्हणतात आता अस्लम शेख यांचाही नंबर आहे. म्हणजे विशिष्ट जाती- धर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचे काम सुरु आहे का अशी शंकाही हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली.

निवृत्त तहसिलदाराला तोतया पोलिसांनी लुटले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी निवृत्त तहसीलदारांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने पळविले. गोडोली परिसरातील हॉटेल समुद्रसमोर ही घटना घडली. याबाबत शंकरराव तुकाराम मुसळे (वय- 82, रा. साईकृपा गिरिचिंतन कॉलनी, विलासपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शंकरराव मुसळे हे सायंकाळी रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी गोडोलीतील हॉटेल समुद्रसमोरील रस्त्यावर आल्यानंतर त्यासमोर दोन युवक आले. त्यातील एकाने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस आहे. येथे चोऱ्या होत आहेत. तुमचे दागिने काढून द्या,’ असे त्यांना सांगितले.

दुसऱ्या तरुणाने हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व अंगठ्या काढून घेतल्या. हे दागिने रुमालात बांधून देतो, असे म्हणून त्या तरुणाने रुमाल व टिश्शूपेपरमध्ये गुंडाळून त्यांच्या हातात दिला. त्यानंतर दोघेही चोरटे तेथून दुचाकीवरून पसार झाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मुसळे यांनी रुमाल उघडून पाहिला असता. त्यामध्ये दगड आढळून आले. फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी हा प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर याबाबत फिर्याद दिली.

मुश्रीफांनंतर कोणाचा नंबर? सोमय्यांनी घेतलं ‘या’ काँग्रेस नेत्याचं नाव

hasan mushriff kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढील कारवाई काँग्रेसचे आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर होणार असा दावा केला आहे. आता अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे असा इशाराच त्यांनी दिला.

टीव्ही९ मराठी या वाहिनीशी बोलताना सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात १५८ कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे तर आम्ही याआधी दिले होतेच. उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उद्धव ठाकरे यांची तर एवढी मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणं एवढंच या सरकारचं काम होतं. हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं. त्याची चौकशी सुरू झाली आहे. हिसाब तर घेऊनच राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे असा थेट इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

दरम्यान, सोमय्यांनी अस्लम शेख यांचं नाव घेतलं असलं तरी त्यांचा नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार? तसेच कोणत्या तपास यंत्रणेकडून त्यांची चौकशी होणार याबाबत किरीट सोमय्यांनी काहीही सांगितलं नाही. त्यामुळे याविषयीचं कुतुहूल निर्माण झालं आहे.