Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1689

Satara Bajarbhav : सातारा बाजारसमिती तेजीत; कोणत्या शेतमालाला काय भाव पहा

Satara Bajarbhav-2
शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.  
कारली क्विंटल 8 2000 2500 2250
दुधी भोपळा क्विंटल 3 1500 2000 1750
वांगी क्विंटल 16 2000 2500 2250
कोबी —- क्विंटल 27 500 600 550
ढोवळी मिरची क्विंटल 14 2000 3000 2500
गाजर क्विंटल 30 1500 2000 1750
काकडी क्विंटल 21 1000 1500 1250
फ्लॉवर क्विंटल 23 1000 1500 1250
लसूण क्विंटल 28 500 3000 1750
आले क्विंटल 6 3000 4000 3500
मिरची (हिरवी) क्विंटल 27 3000 4000 3500
मटार क्विंटल 112 2000 2500 2250
भेडी क्विंटल 4 3000 4000 3500
कांदा क्विंटल 87 1500 2000 1750
पावटा (भाजी) क्विंटल 9 3000 4000 3500
शेवगा क्विंटल 5 7000 8000 7500
टोमॅटो क्विंटल 70 500 700 600

8 वर्षांच्या जुळ्या भावांनी सुरू केले 2 Start-Up; 5 लाखांचा निधीही मिळाला

Anay Ramakrishnan and Abeer Ramakrishnan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षात 2 जुळ्या भावांनी स्टार्ट अप (Start-Up) उपक्रम सुरु केल्याची अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अनय रामकृष्णन (Anay Ramakrishnan) आणि अबीर रामकृष्णन (Abeer Ramakrishnan) अशी या दोन्ही भावांची नावं असून या दोघांच्या नावावर दोन स्टार्टअप आहेत. “एक ट्रॅक्शन स्टेजमध्ये आहे आणि दुसरा अजूनही विचारात आहे. यातील पहिला स्टार्टअप ना नफा ना तोटा या तत्वावर आहे आणि दुसरी एक सखोल टेक स्टार्ट-अप आहे.

गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या पहिल्या उपक्रमासाठी निधीचा पहिला लॉट म्हणून 5 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अनय रामकृष्णन आणि अबीर रामकृष्णन हे नवीन युगातील व्यवसायातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक असू शकतात. त्यांचे वडील आर रामकृष्णन एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि आई प्रिती रामकृष्णन आयटी प्रोफेशनल असून त्यांच्याकडे व्यवस्थापन आणि खर्चाची पदवी आहे.

त्यांचा not-for-profit हा उपक्रम वंचित मुलांसाठी काम करतो. ते देणगीदारांकडून कपडे, खेळणी आणि पुस्तके यासारख्या वस्तू गोळा करतात, जे गरीब मुलांना दिले जातात. चॅरिटी त्याच्या कृतींमुळे कमी झालेल्या कार्बन फूट प्रिंटचीही गणना करते. या वस्तू, उदाहरणार्थ कपड्यांसारख्या, अन्यथा टाकल्या गेल्या असत्या, पण आता त्या चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा वापरल्या जात आहेत. या वेळी यापैकी एकाने कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटरच्या आधारे ही समस्या कमी करण्यासाठी खेळणी, काही कपडे किंवा पुस्तकं पुन्हा वापरणं किती गरजेचं आहे, हे दाखवलं.

Sharingmitra.org या चॅरिटी स्टार्ट-अपसाठी 2.40 लाख किलो कार्बन फूटप्रिंट मिटवले गेले, असे दोन्ही भावांकडून सांगण्यात येते. गेल्या उन्हाळ्यात, आम्ही अमरावती येथे एका शिबिरात गेलो होतो आणि झोपडपट्टीतील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि त्यांची परिस्थिती पाहून आमचे मन हलले. आम्ही परत आलो आणि इंटरनेटवर संशोधन केले की भारतात 10 कोटी आणि जगभरात 150 कोटी मुले आहेत अशी माहिती अबीर रामकृष्णन यांनी दिली.

त्यांनतर या दोन्ही भावांनी ओपन कोड प्लॅटफॉर्म वापरून वेबसाइट तयार केली. त्यांच्या मॉडेल अंतर्गत, देणगीदारांकडून घेतलेल्या वस्तू गरीब मुलांना पाठवल्या जातात. त्यापैकी बहुतेक कपडे किंवा खेळण्यांसारख्या गोष्टी आहेत. शक्यतो पालिका शाळेतील मुलांना फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दान केलेल्या वस्तूंच्या वितरणासाठी Zomato किंवा Swiggy सारख्या कंपन्यांना गुंतवून ठेवण्याची त्यांची योजना आहे. सध्या, आम्ही लोकलवर काम करत असून देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही नागपूरपुरते मर्यादित आहेत, परंतु आम्ही इतर शहरांमध्येही विस्तार करण्याची योजना आखत आहोत असे त्यांनी सांगितलं.

त्यांनतर आपल्या दुसऱ्या उपक्रमाबाबत सांगताना अनयने म्हंटल कि, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांना अमर करण्याची योजना आखत आहोत. व्हर्च्युअल होलोग्राम तयार करण्याची योजना आहे जी तुमच्या डिव्हाइसमधून पॉप आउट होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने होलोग्राम इंटरनेटवर सर्च करून बोलू शकतात आणि आवाजाला प्रतिसाद देऊ शकतात. “आपल्याला अॅपद्वारे महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइनस्टाईन सारखी व्यक्तिमत्त्वे मिळू शकतात. तुमच्या प्रियजनांना जिवंत करण्यासाठी, प्रीमियम सेवेचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे असे ते म्हणतात. पुढील 15 महिन्यांत प्रॉडक्ट बनवण्याच्या आशेने, ते पुन्हा एकदा निधीसाठी प्रयत्न करतील. या पैशाचा उपयोग कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी केला जाईल.

दर प्रती युनिट (रु.)
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/01/2023
कारली लोकल क्विंटल 12 1000 2000 2000
दुधी भोपळा लोकल क्विंटल 9 800 1000 1000
वांगी लोकल क्विंटल 39 1200 1400 1400
कोबी लोकल क्विंटल 27 300 500 500
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 51 2000 2500 2500
गवार लोकल क्विंटल 6 3500 4500 4500
काकडी लोकल क्विंटल 33 1000 1200 1200
फ्लॉवर लोकल क्विंटल 24 1000 1300 1300
घेवडा लोकल क्विंटल 6 2000 3000 3000
आले लोकल क्विंटल 18 3500 4000 4000
मिरची (हिरवी) लोकल क्विंटल 36 2000 3000 3000
मटार लोकल क्विंटल 18 2000 2800 2800
भेडी लोकल क्विंटल 9 3000 4000 4000
कांदा हालवा क्विंटल 99 1000 2000 2000
पावटा (भाजी) हायब्रीड क्विंटल 12 2000 2700 2700
दोडका (शिराळी) लोकल क्विंटल 15 2000 3000 3000
शेवगा हायब्रीड क्विंटल 3 7000 8000 8000
पडवळ लोकल क्विंटल 3 1500 2000 2000
टोमॅटो वैशाली क्विंटल 123 800 1000 1000
हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : कराड उत्पन्न बाजार समिती (Karad Bajarbhav) हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाची बाजारसमिती समजली जाते. कराड तालुक्यासह कोकणातील व्यपारी वर्गासाठी कराड शहर जवळचे असल्याने येथे पालेभाजी व फळभाजिो यांची मोठी आवक – जावक होते. आज पासून आम्ही हॅलो महाराष्ट्र न्युज पोर्टलवर कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव यावर अपडेट देणार आहोत. आज कराड कृषी उत्पन्न बाजारसमितीत टाॅमेटोची सर्वाधिक आवक पाहयला मिळाली. टाॅमेटोची 123 क्विंटल आवक झाली असून टाॅमेटोला कमीत कमी 800 ते जास्तित जास्त 1000 रुपये भाव मिळाला. यानंतर कांद्याची 99 क्विंटल आवक झाली असून कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला. (Karad Bajarbhav) यासोबत इतर भाजीपाला व फळभाजी यांचीही मोठी आवक झाली असून याबाबतचा तपशील आम्ही खाली चार्टमध्ये दिला आहे.
 
शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा.
 
इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता.
 
तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.
बाजार समिती: कराड
दर प्रती युनिट (रु.)
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/01/2023
कारली लोकल क्विंटल 12 1000 2000 2000
दुधी भोपळा लोकल क्विंटल 9 800 1000 1000
वांगी लोकल क्विंटल 39 1200 1400 1400
कोबी लोकल क्विंटल 27 300 500 500
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 51 2000 2500 2500
गवार लोकल क्विंटल 6 3500 4500 4500
काकडी लोकल क्विंटल 33 1000 1200 1200
फ्लॉवर लोकल क्विंटल 24 1000 1300 1300
घेवडा लोकल क्विंटल 6 2000 3000 3000
आले लोकल क्विंटल 18 3500 4000 4000
मिरची (हिरवी) लोकल क्विंटल 36 2000 3000 3000
मटार लोकल क्विंटल 18 2000 2800 2800
भेडी लोकल क्विंटल 9 3000 4000 4000
कांदा हालवा क्विंटल 99 1000 2000 2000
पावटा (भाजी) हायब्रीड क्विंटल 12 2000 2700 2700
दोडका (शिराळी) लोकल क्विंटल 15 2000 3000 3000
शेवगा हायब्रीड क्विंटल 3 7000 8000 8000
पडवळ लोकल क्विंटल 3 1500 2000 2000
टोमॅटो वैशाली क्विंटल 123 800 1000 1000

याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

Delhi driver bus road drink tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि तो थेट चहाच्या टपरीत घुसला.

चहा हे असे पेय आहे कि त्याची तल्लफ प्रत्येकाला होते. चहा पिण्यासाठी ही लोकं काहीही करू शकतात. सध्या सोशल मीडियावर या बस ड्रायव्हरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो एक चहाप्रेमी आहे. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या मधोमध बस थांबवून चहा घेण्यासाठी जाताना दिसत आहे. बस रस्त्यावर अचानक थांबल्यामुळे मागून येणारी वाहने थांबतात आणि त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बस चालकाच्या या कृतीमुळे रस्त्यावर अडकलेले लोक सतत हॉर्न वाजवताना दिसत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.

कराड विमानतळावर फ्लाईंग अकॅडमी : तीन विमाने दाखल

Flying Academy at Karad Airport

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
येथील विमानतळावर दमानिया एअरवेजच्या वतीने येत्या महिनाभरात फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार आहे. त्याची सध्या तयारी सुरू असून प्रशिक्षणासाठीची तीन विमाने देखील कराड विमानतळावर दाखल झाली आहेत. आणखी दोन विमाने लवकरच येणार असल्याचे खात्रीपूर्वक समजते. मुंबई, पुणे, बारामती, धुळेनंतर ही सुविधा कराडमध्ये उपलब्ध होत आहे.

कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. दमानिया एअरवेजने महाराष्ट्र शासनाशी करार करून फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. फेब्रुवारी 2019 मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे प्रशिक्षणासाठी कराड विमानतळ सज्ज झाले आहे.

प्रशिक्षणासाठी एकूण पाच विमाने या अकॅडमीत असणार आहेत. यातील सेन्सा 172 ही दोन विमाने तर सेन्सा 152 हे एक विमान येथील विमानतळावर दाखल झाले आहे. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. आणखी एक सहा आसनी विमान व पाईपर विमान दाखल होणार आहे. ही विमाने ठेवण्यासाठी व मेन्टेनन्ससाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगरची निर्मिती करण्यात आली आहे. याचठिकाणी टेक्निकल स्टाफ काम करणार आहे.

एकावेळी 50 विद्यार्थी घेणार प्रशिक्षण
या अकॅडमीचे बेस इनचार्ज म्हणून पंकज पाटील हे काम पाहात आहेत. एका वर्षात स्थानिकांसह देशभरातील सुमारे 50 विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतील. त्यांचा कालावधी 2 वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई, पुण्यानंतर आता कराडात सोय
पुणे, बारामती नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह दक्षिण महाराष्ट्रात फ्लाईंग स्कूल नव्हते. मात्र आता कराड विमानतळावर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीसह स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळणार आहे.

‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर 

Vice of Media organization

सातारा | महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी व तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही 50 ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाकाळात 136 पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या 136 पत्रकारांच्या 150 पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. पत्रकारांची हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.

सातारा जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे ः- जिल्हा कार्याध्यक्ष ः संतोष नलवडे (सातारा), जिल्हा कार्याध्यक्ष ः संदिप पवार (कोरेगाव), जिल्हा उपाध्यक्ष ः सुनिल परीट (कराड), जिल्हा उपाध्यक्ष ः नानासाहेब मुळीक (फलटण), जिल्हा उपाध्यक्ष ः राजेश पाटील (ढेबेवाडी), जिल्हा उपाध्यक्ष ः रमेश पल्लोड (महाबळेश्वर), जिल्हा सरचिटणीस ः सकलेन मुलाणी (कराड), जिल्हा सहसरचिटणीस ः अभिजीत खुरासणे (महाबळेश्वर), खजिनदार/ कोषाध्यक्ष : विनोद खाडे (खटाव), जिल्हा कार्यवाहक ः संदिप कुंभार (मायणी), जिल्हा कार्यवाहक ः संजय दस्तुरे (महाबळेश्वर), जिल्हा संघटक ः चंद्रशेखर जाधव (वडूज), जिल्हा संघटक ः प्रशांत डावरे (लोणंद), जिल्हा प्रवक्ता – मोहन बोरकर (लोणंद), जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – युवराज मस्के (कराड), जिल्हा सदस्य – अक्षय पाटील (कराड)

सातारा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष निवडी पुढीलप्रमाणे ः-
सातारा – संजय कारंडे, सातारा शहराध्यक्ष – शुभम बोडके, कराड- अमोल टकले, पाटण- योगेश हिरवे, खंडाळा- राहीद सय्यद, फलटण- विनायकराव शिंदे, खटाव- राजीव पिसाळ,
कोरेगाव – तेजस लेंभे, महाबळेश्वर – अजित जाधव, जावली – संदिप गाढवे

मुख्यमंत्री शिंदेसोबत पत्रकार परिषद घेत कवाडेंचं आघाडीबाबत मोठं विधान; म्हणाले की,

Jogendra Kawade Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बहुजन विकास आघाडी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्याशी आघाडी करण्याबाबत विधाने केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. स्वतः जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत पत्रकार परिषद घेत आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जोगेंद्र कवाडे याची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रा. कवाडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे.

थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल. आम्ही युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार असून शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्या असल्याचे कवाडे यांनी सांगितले.

आमचा संघर्षही साधासुधा नव्हता ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की, आम्हीही लाठ्या- काठ्या खाल्ल्या. त्या खाऊनच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. आम्हीही साधासुधा संघर्ष केला नाही. कवाडेंच्यासोबत आमचे पूर्वीपासून चांगलेच संबंध होते.

छ. संभाजी महाराजांबद्दलच्या विधानाबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले की..

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र आज खुद्द अजित पवारांनीच माध्यमांसमोर येऊन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आज. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराजांना न्याय देणं आहे असं म्हणत ते आपल्या विधानावर ठाम राहिले आहेत. तसेच भाजपला माझा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना ठणकावलं आहे.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं. स्वराज्यमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. आणि त्यांचे रक्षण संभाजी महाराजांनी केलं त्यामुळे स्वराज्यरक्षक म्हणणंच त्यांना न्याय देणारे आहे. त्यामुळे मी असा कोणता गुन्हा केलाय का? कि मी महाराजांबद्दल कोणते अपशब्द वापरलेत? असा उलट सवाल अजित पवारांनी भाजपला केला. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही निधी दिला. मी कधीच महापुरुषांबाबत चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेते पद दिले नाही, माझ्या पक्षाने मला ते पद दिले आहे. असं अजित पवारांनी म्हंटल.

बेताल वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान  राज्यपालांनी केला. या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनीही शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं जावईशोध लावला. गोपीचंद पडळकर यांनीही अफझलखानाने शिवरायांचा कोथळा काढला असं विधान केलं होत अशा प्रकारची वक्तव्ये भाजपचे मंत्री आमदार करत आहेत, त्याबाबत बोलायला हे तयार नाहीत असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर पलटवार केला.

…अन् पत्याच्या पानाप्रमाणे कोसळली भाजप नेत्याच्या हॉटेलची इमारत; अवघ्या काही सेकंदात झालं उद्ध्वस्त

Hotel Of BJP Leader Demolished

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा भूकंप झाला कि पत्याप्रमाणे इमारती कोसळताना आपण पाहिल्या असतील. पण एका भाजप नेत्यावर कारवाई करत त्याचे अनधिकृत हॉटेल पानाच्या पत्याप्रमाणे पाडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात भाजपा नेत्याच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून त्याचे हॉटेल पाडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इंदूरमधील विशेष पथकाने मंगळवारी संध्याकाळी 60 डायनाईटचा वापर करत भाजपाचे निलंबित नेते मिश्री चंद गुप्ता हॉटेल उद्ध्वस्त केले. यानंतर काही सेकंदातच हॉटेल जमीनदोस्त झाले. जिल्हाधिकारी दीपक आर्या, उपमहानिरीक्षक तरुण नायक आणि इतर वरिष्ठ अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

ज्या भाजप नेत्याच्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली ते अद्यापही बेपत्ता आहेत.
22 डिसेंबरला कोरेगावमधील रहिवासी जगदीश यादव यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. भाजपा नेते मिश्री चंद गुप्ता आणि कुटुंबावर याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिश्री चंद गुप्ता अद्यापही बेपत्ता आहेत.