Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2066

कराडचे तलाठी सागर पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड | कराडात ऑनलाईन सातबारा उतार्‍यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी ऑफिस चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडचे तलाठी सागर पाटील यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांनी खरेदी केलेल्या सर्वे नंबर 348/3 या प्लॉटवर तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या ऑनलाइन सातबारा उतार्‍यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी तलाठी यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती.

संबंधित मागणीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी ही केली होती. त्यानंतर संबंधित विभागाचे सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ना प्रशांत ताटे, विशाल खरात या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्गामध्येच पोरींमध्ये झाली जबरदस्त फाईट, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

school girls beat each other

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका शाळेतील विद्यार्थिनी एकमेकांशी फाईट (school girls beat each other) करताना दिसत आहेत. या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत आणि या तिघी मुली शाळेच्या वर्गात फाईट करताना (school girls beat each other) दिसत आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधला आहे. या व्हिडीओमध्ये तिन्ही मुली समोरासमोर असल्याचं दिसत आहे. तिघी जणी एकमेकींचे केस ओढत जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करत (school girls beat each other) आहे. एका मुलीने तर दुसऱ्या मुलीचं डोकंच बेंचवर आपटल्याचे (school girls beat each other) या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसंच हे इतकं मोठं भांडण नक्की कोणत्या कारणावरून झालंय, हे सुद्धा अद्याप समोर आलेले नाही. हे भांडण काहींनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

हा व्हिडीओ (school girls beat each other) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेमका कोणत्या शाळेतील आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या विद्यार्थ्यांमध्ये शाळा प्रशासनाची भीती नाही का? असा सवालसुद्धा काही लोकांनी उपस्थित केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

पान मसाल्याची जाहिरात करण्यास Kartik Aaryan चा नकार, इतक्या कोटींची होती ऑफर !!!

Kartik Aaryan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बहुरंगी अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला बॉलिवूड अभिनेता Kartik Aaryan सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्या ‘भूल भुलैया 2’ ला चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. आता कार्तिकच्या चाहत्यांना त्याच्या ‘शेहजादा’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. नुकतेच Kartik Aaryan ने एक मोठे पाऊल उचलले आहे. तर हे जाणून घ्या कि, कार्तिकने नुकतेच पान मसाल्याच्या जाहिरातीची 9 कोटींची ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे.

Kartik Aaryan Top Sellers, 57% OFF | www.ipecal.edu.mx

बॉलीवूड हंगामाममधील एका बातमीनुसार, पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर येताच Kartik Aaryan ने ती करण्यास नकार दिला. एका अॅड गुरूच्या माध्यमातून या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, ही गोष्ट अगदी खरी आहे. कार्तिककडे एका अशा जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र त्याने लगेचच 9 कोटींची ही ऑफर नाकारली.

Shehzada makers deny Kartik Aaryan threatened to exit film- Cinema express

दरम्यान सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी Kartik Aaryan चे कौतुक केले आहे. याबाबत ते म्हणाले की,” पान मसाल्याची जाहिरात करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि कायद्याने सेन्सॉर बोर्डालाही तसे करण्यास मनाई आहे.” हे लक्षात घ्या कि, याआधी अक्षय कुमार देखील एका पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसून आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोलही करण्यात आले. यानंतर त्याला लोकांची माफी देखील मागावी लागली.

akshay kumar, akshay kumar post

यावेळी अक्षयने एक पोस्ट करत म्हंटले की, ‘मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची, माझ्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मात्र, मी कधीही तंबाखूचा प्रचार केला नाही आणि करणार नाही. विमल इलायची यांच्या असोसिएशन बाबत तुमच्या प्रतिक्रिया काहीही असोत, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मिळालेली फी मी एका चांगल्या कारणासाठी वापरेन.’ Kartik Aaryan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Kartik_Aaryan

हे पण वाचा :

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

सभा सुरु असताना अचानक सभेत घुसले बैल, नागरिकांची उडाली मोठी तारांबळ

bull entered in crowd and attacked on people

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आपण मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेकदा चेंगराचेंगरी झाल्याचे पहिले किंवा ऐकले असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एका सभेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क बैलाने सभेदरम्यान चांगलाच गोंधळ (bull entered in crowd and attacked on people) उडवला आहे. हि धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे.

काय घडले नेमके ?
गुजरातच्या मंगरोल याठिकाणी आम आदमी पार्टीची सभा सुरू होती. या सभेसाठी माईक लावण्यात आला होता. सभेमध्ये माईक असणं यात काही विशेष किंवा नवीन नाही. मात्र, त्याठिकाणी असलेल्या बैलांना कदाचित हे अजिबातच आवडलं नाही. यानंतर हा बैल चिडला (bull entered in crowd and attacked on people) आणि मग पुढे जे काही झालं ते तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, बैलगाडीमध्ये बसून काही लोक चाललेले आहेत. याचवेळी तिथे आम आदमी पार्टीची सभा सुरू आहे. सभेतील माईकचा आवाज ऐकून हे बैल भडकले (bull entered in crowd and attacked on people) अन् मग सभेतील लोकांची मोठी तारांबळ उडाली. बैलांचं हे रौद्ररूप पाहून सभेसाठी आलेले लोक सैरावैरा धावू लागले. या भडकलेल्या बैलांनी (bull entered in crowd and attacked on people) सभेसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या आपल्या शिंगांनी धडक देत आणि पायाने तुडवत तोडून टाकल्या. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आशिया चषक सुरु आहे. अशातच भारताने पाकिस्तानला नमविल्याने या चषकाची रंगत वाढली आहे. यंदाच्या आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलसोबतच डिस्ने + हॉटस्टारवर देखील पाहता येईल. अशा परिस्थितीत, अनेक युझर्स स्वस्त प्लॅनच्या शोधात आहेत… तर आपण Disney + Hotstar चे बेनिफिट्स देणाऱ्या Jio च्या काही प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत.

โผล่ ราคา Disney+ Hotstar เหมาไตรมาส ราคาสบายกระเป๋า

Jio कडून ग्राहकांसाठी अशा काही प्लॅन्सची ऑफर दिली जाते, ज्यामध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये दिले जात आहे. जरी Jio कडे अनेक प्लॅन असले तरीही आज आपण 600 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत…

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

Jio चा 333 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये यूझर्सना अनलिमिटेड कॉलिंगसोबतच डेली 100SMS आणि डेली 1.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. या प्लॅनची खास गोष्ट अशी कि, यामध्ये यूझर्सना Disney + Hotstar चे मोबाईल फ्री सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी दिले जाते.

Jio चा 419 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा दिला जातो, त्यानुसार यामध्ये एकूण 84 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. याशिवाय त्यामध्ये डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. यासोबतच खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये यूझर्सना 149 रुपये किंमत असलेल्या Disney + Hotstar चे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी दिले जाते.

Reliance Jio All 1.5GB/Day Prepaid Plans - Is It Worth For Budget Users

Jio चा 583 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये डेली 1.5 जीबी डेटा दिला जातो. हा प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसेच यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. याव्यतिरिक्त, 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन देखील मिळते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=Cricket%20Plans&categoryId=Q3JpY2tldCBQbGFucw==

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

प्रियकराने लग्नाला नकार देताच तरुणीचा धावत्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न, Video आला समोर

Byculla Railway Station

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील भायखळा स्थानकावर (Byculla Railway Station) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रियकराने नकार देताच 22 वर्षीय तरुणीने रविवारी दुपारी ट्रेनसमोर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धावत्या लोकलसमोर हि तरुणी लोकलच्या दिशेने तोंड करुन उभी होती. लोकल चालकाच्या प्रसंगावनधानामुळे या तरुणीचा जीव थोडक्यात बचावला आहे. एका प्रवाशाने या घटनेचा थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

कुठे घडली घटना?
रविवारी दुपारी भायखळा रेल्वे स्थानकात (Byculla Railway Station) ही घटना घडली. ही तरुणी दादर या ठिकाणी राहत असल्याचे समजत आहे. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं. विशेष म्हणजे ज्या भायखळा रेल्वे स्थानकात (Byculla Railway Station) ही घटना घडली, त्याच रेल्वे स्थानकावर या तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिला होता. हि तरुणी जेव्हा आत्महत्या करत होती त्याचवेळी त्या ठिकाणी तिचा प्रियकरसुद्धा होता.

व्हिडीओमध्ये एक आरपीएफ जवान तरुणीच्या दिशेने धावत गेल्याचे दिसत आहे. या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं नसतं, तर अनर्थ घडला असता. थोडक्यात ही तरुणी वाचली असल्यानं भायखळा स्थानकातील (Byculla Railway Station) प्रवाशांचाही जीव भांड्यात पडला. यानंतर आरपीएफ निरीक्षक उपेंद्र डागर यांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला अखेर ताब्यात घेतले आणि त्यांचे समुपदेशन केलं. नंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । post office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या भचत योजना चालविल्या जातात. ज्यामध्ये देशातील लाखो लोकांकडून गुंतवणूक केली जाते. हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच याद्वारे चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळेच post office च्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. जर आपल्यालाही जोखीम नसलेल्या एखाद्या सरकारी योजनेत दीर्घकाळासाठी पैसे गुंतवायचे असतील तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना एक चांगला पर्याय ठरू शकेल.

हे लक्षात घ्या कि, post office च्या किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करून आपल्याला चांगला रिटर्न देखील मिळतो. ही भारत सरकारची डबल मनी योजना आहे ज्यामध्ये वार्षिक 6.9 टक्के व्याज दर मिळतो. तसेच तो 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होतो. भारतातील बहुतेक पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना उपलब्ध आहे.

Get Your Investment Doubled In Kisan Vikas Patra Scheme Know Full Detail - Kisan Vikas Patra: निवेश को दोगुना करने की गांरटी देती है पोस्ट ऑफिस की यह स्कीम, जानिए क्या है

किसान विकास पत्र योजना म्हणजे काय ???

भारत सरकारकडून दिली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही एक बचत योजना आहे. या योजनेमध्ये जास्त व्याजदरांसहित मॅच्युरिटीवर भरपूर रिटर्न मिळतो. जोखीम नसलेली भारत सरकारची ही चांगली गुंतवणूक योजना आहे. जी आपल्या नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यास प्रोत्साहित करते. post office

My relative sends me money every month. How income tax is calculated? | Mint

कोणाला गुंतवणूक करता येईल ???

18 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही नागरिकाला किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये, किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये जस्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. किसान विकास पत्रामध्ये, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कोणत्याही प्रौढाच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. तसेच अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षे होताच त्याच्या नावावर खाते केले जाते. एवढेच नाही तर 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या तीन लोकांना जॉईंट अकाउंट उघडता येईल. post office

Invest in THIS scheme offered by Post Office to double your money

रिटर्नवर द्यावा लागेल टॅक्स

जर कोणी ही योजना एका वर्षाच्या आत बंद केली तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याजाचा लाभ मिळणार नाही. post office ची ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणाऱ्या रिटर्नवर टॅक्स द्यावा लागेल. मात्र, या योजनेत TDS कापला जात नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/saving-schemes/kisan-vikas-patra/

हे पण वाचा :

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

accident : खड्ड्यामुळे तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू, CCTV फुटेज आले समोर

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिवा आगासन रोडवर रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. गणेश पाले असे या रस्ते अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके ???

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, दोन बाईक, एक रिक्षा आणि एक व्यक्ती पायी चालताना दिसत आहे. तर समोरच्या बाजूने एक टँकर येताना दिसत आहे. एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतो. पण एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जातो. यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो. भलामोठा टँकर शरीरावरुन गेल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू (accident) झाला आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

या अपघातानंतर (accident) पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे.

हे पण वाचा :

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

India vs Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India vs Pakistan : रवींद्र जडेजाची संयमी आणि हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने आशिया कपमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय नोंदवला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने भारताला 148 धावांचे आव्हान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या दोघांवरही या सामन्यातील दबाव दिसून आला. कारण ICC च्या एका नव्या नियमाचा फटका भारत आणि पाकिस्तानच्या संघांना बसला लागला. हे लक्षात घ्या कि, भारत आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत 20 षटके टाकता आलेली नाहीत. ज्याचा परिणाम सामन्याच्या निकालावरही झाला. India vs Pakistan

Asia Cup 2022: India penalised for slow over rate against Pakistan in Dubai - Sports News

ICC च्या नव्या नियमाविषयी जाणून घ्या

ICC च्या नवीन नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करावा लागतो. मात्र जर एखादा संघ ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे राहत असेल तर उर्वरित षटकांमध्ये त्यांच्या एका क्षेत्ररक्षकाला 30 यार्डच्या सर्कलच्या आत उभे राहावे लागेल. ज्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा फटका बसतो आहे. नियमांनुसार पॉवरप्ले (पहिली 6 षटके) नंतर 30 यार्ड सर्कलबाहेर 5 क्षेत्ररक्षक उभे करता येतात. मात्र आताच्या नवीन नियमांनंतर फक्त 4 क्षेत्ररक्षकच सर्कलबाहेर उभे राहू शकणार आहेत. हे लक्षात घ्या कि,16 ​​जानेवारी 2022 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. India vs Pakistan

Let us also keep a secret': Rohit on who would open with him in India vs Pakistan clash | Cricket News

रोहित शर्माही नव्या नियमाच्या जाळ्यात अडकला

या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा पाकिस्तानचा संघ संघर्ष करत होता. यावेळी पाकिस्तानने 17 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात फक्त 114 धावा करता आलेल्या होत्या. अशा वेळी पाकिस्तन 135 धावाही करणार नाही असे वाटत होते. मात्र शेवटच्या षटकांमधील स्लो ओव्हर रेटमुळे रोहितला 30 यार्डच्या आत क्षेत्ररक्षक आणावा लागला. यानंतर पाकिस्तानच्या शेपटाने शेवटच्या 17 चेंडूत 33 धावा केल्या. India vs Pakistan

India vs Pakistan: Head to Head Records of IND vs PAK In Asia Cup History

बाबर आझमलाही बसला मोठा फटका

पाकिस्तानच्या संघाला निर्धारित वेळेत फक्त 17 षटकेच टाकता आली. यानंतर बाबर आझमला शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 यार्डच्या आत क्षेत्ररक्षक आणावा लागला. इथूनच सामना भारताच्या बाजूने झुकला. यावेळी शेवटच्या 18 चेंडूत भारताला 32 धावांची गरज होती. यानंतर जेव्हा नसीम शाह 18 वे षटक टाकायला आला तेव्हा हार्दिक-जडेजाने त्याच्या या षटकात 11 धावा जोडल्या. India vs Pakistan

IND Vs PAK, Asia Cup Cricket 2022: Hardik Pandya Aces Nervy Chase To Help India Beat Pakistan - Highlights

यानंतर भारताला 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. अशा वेळी बाबरने 19व्या षटकात पाकिस्तानचा सर्वात अनुभवी गोलंदाज हारिस रौफकडे चेंडू सोपवला. याच षटकात पंड्याने रौफला तीन चौकार ठोकत 14 धावा काढल्या. यानंतरच्या अखेरच्या षटकात ऑफस्पिनर मोहम्मद नवाजला षटकार ठोकत पांड्याने जबरदस्त भारताला विजय मिळवून दिला. India vs Pakistan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table-pdf-point-table-ranking-winning-prediction/

हे पण वाचा :

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

गोकूळची 60 वी वार्षिक सभा गोंधळात : महाडिक गटाने घेतली समांतर सभा

कोल्हापूर | गोकुळमधील सत्तातरांनंतर आज पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. विरोधकांनी बसण्यासाठी खुर्च्या नाहीत म्हणत सभेतून बाहेर पडत समांतर सभा घेत घोषणाबाजी केली. तर विरोधकांना सभा होवू द्यायची नव्हती, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. गोकूळची 60 वी सर्वसाधारण सभा अखेर गोंधळात वादळी ठरली.

या सभेला माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील उपस्थित आहेत. विरोधी सभासद येण्याआधी सभागृह कसे भरले, असा सवाल संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे. तसेच प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय सभा सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा महाडिक यांनी घेतल्याने सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. विरोधी गटाचे सभासद येण्यापूर्वीच हॉल भरल्याने त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागले. शौमिका महाडिक ठरावधारकांसह हॉलमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी सभासदांनी प्रश्न कसे विचारायचे? त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. विरोधी सभासद येण्याआधीच सभागृह कसे भरले? असा सवाल महाडिक यांनी उपस्थीत केला. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणावेळी शाैमिका महाडिक यांनी गोंधळातच अनेक प्रश्न विचारले. परंतु ऐकू येत नसल्याने सभागृहाबाहेर येत समांतर सभा घेतली. तर विरोधकांना सभा होवू द्यायची नव्हती, असे म्हणत महाडिक गटाला हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला.

गोकूळच्या सभेला 125 पोलिसांचा बंदोबस्त ः- गोकुळच्या सैनिक दरबार हॉलमध्ये सुरू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभास्थळासह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सभेसाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 5 पोलिस निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 71 पोलिस अंमलदार, 22 महिला पोलिस, वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे 15 पोलिस, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.