Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2065

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

overdraft facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । overdraft facility : आर्थिक संकटाच्या काळात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. त्याअशावेळी आपण सहजपणे पैसे मिळतील आणि व्याज देखील कमी द्यावे लागेल असे पर्याय शोधतो. यासाठीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पर्सनल लोन. मात्र हे लक्षात असू द्यात कि, पर्सनल लोनसाठी कोणतीही गॅरेंटी लागत नाही. मात्र त्यावर जास्त व्याजदर द्यावा लागतो. आज आपण बँकिंगच्या एका अशा पर्यायाबाबत जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपली पैशांची गरज सहजपणे पूर्ण होऊ शकेल. या सुविधेचे नाव आहे बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा (overdraft facility).

Overdraft Facility Syndication | Advantages of Bank Overdraft

खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. बहुतेक बँकांकडून करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि FD वर ही सुविधा दिली जाते. मात्र काही बँका शेअर्स, बाँड्स आणि इन्शुरन्स पॉलिसींसारख्या मालमत्तेवर देखील overdraft facility देखील देतात. या सुविधेअंतर्गत, आपल्याला बँकेतून हवे तितके पैसे घेता येतात आणि नंतर परत करता येतात.

ओव्हरड्राफ्टची सुविधा कशी मिळवावी ???

जर आपण बँकेत FD केली नसेल तर सर्वांत आधी बँकेमध्ये कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावी लागेल. त्यानंतर बँकेकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल. आजकाल अनेक बँकाकडून त्यांच्या ग्राहकांना आधीच overdraft facility दिली जाते. सॅलरी असलेल्या लोकांना सहजपणे ओव्हरड्राफ्ट मिळतो.

Overdraft Facility: Smart things to know about it

किती पैसे घेता येतील ???

overdraft facility अंतर्गत किती पैसे मिळतील हे बँकेकडून ठरवले जाते. तसेच या सुविधेसाठी बँकेत तारण म्हणून काय ठेवले आहे यावर देखील मर्यादा अवलंबून असते. तसेच सॅलरी आणि एफडीच्या बाबतीत बँकाकडून जास्त मर्यादा ठेवली जाते. उदाहरणार्थ, जर बँकेत आपण 2 लाख रुपयांची एफडी केली असेल तर बँकेकडून ओव्हरड्राफ्टसाठी 1.60 लाख रुपयांची (80%) मर्यादा दिली जाऊ शकेल. शेअर्स आणि डिबेंचर्सच्या बाबतीत ही मर्यादा 40 ते 70 टक्के असू शकेल.

व्याज दर किती असेल ???

आपल्याला किती व्याज दर मिळेल, हे आपण ज्या मालमत्तेवर overdraft facility देण्यात आली आहे त्यावर अवलंबून असेल. मात्र आपण बँकेतून ज्या कालावधीसाठी पैसे घेतो त्यानुसार व्याज द्यावे लागेल. याचाच अर्थ असा की जर आपण 25 डिसेंबरला पैसे घेतले आणि 25 जानेवारीला त्याची परतफेड केली तर फक्त एक महिन्याचेच व्याज द्यावे लागेल. मात्र जर ही सुविधा FD वर घेतली असेल, तर व्याजदर FD वरील व्याजापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त राहील. त्याच बरोबर शेअर्ससह इतर मालमत्तेच्या बाबतीत व्याज दर थोडा जास्त असू शकेल.

Bank overdraft Facility: Good news! You will be able to withdraw money from the bank, Even if your account is empty, know details - Business League

ओव्हरड्राफ्ट घेण्याचा फायदा काय आहे ???

क्रेडिट कार्ड किंवा इतर पर्सनल लोनच्या पेक्षा हे खूपच स्वस्त असेल. यामध्ये तुलनेने कमी व्याज द्यावे लागेल. याचा दुसरा फायदा असा की, overdraft facility मध्ये आपण ज्या कालावधीसाठी पैसे घेतो तेवढ्याच कालावधीसाठी व्याज द्यावे लागेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/save/od-facility-in-current-account

हे पण वाचा :

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!

 

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : 2022 या आर्थिक वर्षांत शेअर बाजारात खूपचा अस्थिरता होती. या काळात बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. 2022 मध्ये BSE सेन्सेक्समध्ये आतापर्यंत फक्त 2.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टीदेखील फक्त 2.34 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या कालावधीतही काही कंपन्यानाच्या शेअर्सनी आपल्या गुतंवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. Pondy Oxides and Chemicals या कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. 2022 मध्ये या शेअर्सने आतापर्यंत सुमारे 105 टक्के इतका रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Pondy Oxides and Chemicals Ltd posts Rs. 14.12 crores PAT in Q3 FY2022 | EquityBulls

30 ऑगस्ट रोजीही या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. आज हे या शेअर्स 8.25 टक्क्यांनी वाढून 937.70 रुपयांवर बंद झाले. इंट्राडे मध्ये एकदा हे शेअर्स 950 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये तर या शेअर्समध्ये 27.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीने आता गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील जाहीर केले आहेत. हे जाणून घ्या कि, या केमिकल कंपनीकडून आता 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले जातील. Multibagger Stock

इन 5 शेयरों ने निवेशकों को बनाया करोड़पति, 1 लाख बन गए ₹1करोड़ से भी अधिक, क्या आपके पास है? चेक करें लिस्ट - multibagger stock 2021 these five stocks that turned

वर्षभरात 123.44% रिटर्न

कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या बोनस शेअर्सची एक्स-डेट 28 सप्टेंबर 2022 आहे. तर बोनस जारी करण्याची रेकॉर्ड डेट 29 सप्टेंबर 2022 आहे. कंपनीने याआधी देखील 15 जानेवारी 2007 रोजी 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. हे लक्षात असू द्यात कि, गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 40 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 68.29 टक्के तर गेल्या एका वर्षात 123.44% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Multibagger Stock 2021 United Spirits Share Price Reach 886 Rupees Become Crorepati In 20 Years | Multibagger Stock: मल्टीबैगर शेयर ने बना दिया करोड़पति, ₹886 का हो गया ये ₹8.86 वाला स्टॉक, अभी भी ...

गुंतवणूकदारांना केले मालामाल

BSE वर 27 मार्च 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.50 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीच्या शेअर्सनी 950 रुपयांचा उच्चांक गाठला. जर एखाद्याने मार्च 2009 रोजी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 43.93 लाख रुपये झाली असती. तसेच जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी पॉन्डी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 2,23,866 रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, जर 2022 मध्ये एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही गुंतवणूक 209,599 रुपये झाली असती. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pocl.com/

हे पण वाचा :

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!

 

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या जातात. बँकेकडून त्याबाबतची माहिती थेट SMS द्वारे दिली जाते. हे लक्षात घ्या कि, सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एसबीआय कडून वर्धापन दिनानिमित्त 6 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात ​​आहे, असा दावा करण्यात आला आहे. अनेक युझर्सनी या व्हायरल मेसेजबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

SBI internet banking services to remain unavailable today during this time period.Details here | Mint

SBI ने दिला सावधगिरीचा इशारा

आता एसबीआय ने देखील लोकांना या व्हायरल मेसेज बाबत सावध करण्यासाठी ट्विट केले आहे. तसेच अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहावे आणि सबसिडी, फ्री ऑफर, फ्री गिफ्ट यासारखे मेसेज आल्यास त्याला रिप्लाय देण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, असे बँकेने म्हटले आहे. सायबर गुन्हेगारांकडून अशा प्रकारच्या ऑफर्स देऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील बँकेने म्हटले आहे.

State Bank of India (SBI) - State Bank of India raises $300 million from Formosa bonds - Telegraph India

अशा प्रकारे केली जाते फसवणूक

एसबीआय ने म्हंटले कि, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियावर सध्या एक मेसेज प्रसारित केला जात आहे, ज्यामध्ये 67 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात एसबीआय कडून 6 हजार रुपये जिंकण्याची संधी, असे म्हटले जात आहे. मात्र यासाठी ग्राहकांना चार सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर रुपये जिंकल्याच्या शुभेच्छा पाठविल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 6 हजार रुपये मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही वैयक्तिक माहिती मागितली जाते. जेव्हा ग्राहकाकडून लोभापोटी आपली माहिती गुंडांना दिली जाते तेव्हा त्याचे खाते रिकामे केले जाते.

हे लक्षात घ्या कि, याआधी SBI च्या ग्राहकांना त्यांचे पॅन अपडेट करण्यास सांगून फसवणूक केली जात होती, ज्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून एक बनावट लिंक देखील बनवण्यात आली होती. मात्र, याबाबत सरकारने स्पष्टीकरण देताना असा कोणताही मेसेज बँकेकडून पाठवला जात नसल्याचे सांगत ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. जर कोणाला असा मेसेज आला तर [email protected] वर तक्रार करू शकता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/

हे पण वाचा :

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

मुख्यमंत्री थांबलेले महाबळेश्वर मधील `ते` हाॅटेल अनाधिकृत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खासगी दौऱ्यावर महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाबळेश्वरच्या हॉटेल ब्राईट लँड या हाॅटेलमध्ये वास्तव्य केलेलं होते. आता हे हॉटेल बेकायदेशीर बांधण्यात आलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन या हाॅटेलवर कारवाई करणार की दबावात अधिकृत करणार असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

महाबळेश्वर हे इको सेन्सिटिव्ह झोन असून या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांना परवानगी नसताना देखील हे हॉटेल बांधण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे काम थांबवण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर फौजदारीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना या हॉटेलमध्ये आणून प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे. या प्रमाणे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी, अन्यथा ठोस आंदोलन करण्याचा इशारा मोहिते यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, तातडीने अनाधिकृत बांधकामांवर कारवाई नको ः-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी अनाधिकृत अतिक्रमण करून हाॅटेल तसेच अन्य काही वास्तूचे बांधकाम करण्यात आले असल्याचे सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते, सरकार गोरगरिबांचे आहे, कोणावर अन्याय करणार नाही. त्यांची रोजीरोटी बंद होणार नाही, तसेच तातडीने अतिक्रमणावर कारवाईही केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेल ब्राईट लँड येथे थांबल्यानंतरच म्हटले होते. त्यामुळे अनाधिकृत बांधकामांना अभय देण्याचा विषय या हाॅटेलपासूनच सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो.

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

Corporate FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Corporate FD : सध्याच्या काळात व्याजदरात वाढ होत असल्याने जास्त रिटर्न मिळविण्यासाठी ग्राहक आता फिक्स्ड डिपॉझिट्सकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र, याची निवड करताना गुंतवणूकदारांनी फक्त ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी.

हे जाणून घ्या कि, बँकांप्रमाणेच, NBFC आणि काही कंपन्यांनासुद्धा ठराविक कालावधीसाठी व्याजदराने लोकांकडून डिपॉझिट्स गोळा करण्याची परवानगी आहे. ज्याला कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट्स असे म्हंटले जाते. बँकांप्रमाणेच यामध्ये देखील गॅरेंटर्ड रिटर्न दिला जातो. त्याचबरोबर कॉर्पोरेट एफडीवर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. मात्र अशा प्रकारची एफडी घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. Corporate FD

Corporate FD - Know Company Fixed Deposits Features And Benefits

Corporate FD चे क्रेडिट रेटिंग

Corporate FD घेण्याआधी त्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग तपासणे महत्त्वाचे ठरेल. ज्या कंपन्यांचे रेटिंग चांगले आहे त्या कमी व्याजदर देतील मात्र इथे पैसे जास्त सुरक्षित राहतील. तसेच दुसरीकडे, ज्या कंपन्यांचे रेटिंग कमी आहे त्या जास्त रिटर्न देतील. ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडी जास्त सुरक्षित असतील मात्र कमी रिटर्न देतील. मात्र लोकांनी जास्त सुरक्षित असलेल्या एफडीमध्येच गुंतवणूक करावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

Planning to invest money in Fixed Deposits? THESE things you must know before opening FD

शॉर्ट टर्म एफडीची निवड करा

सध्या RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जात आहे. ज्यामुळे व्याजदरातही सातत्याने वाढ केली जाणार आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्मवाल्या एफडीवर लक्ष केंद्रित करणे चांगले ठरेल. जेणेकरुन ते लवकर मॅच्युर होतील आणि जास्त रिटर्न मिळण्यासाठी तीच रक्कम पुन्हा एकदा नफ्यासह FD मध्ये गुंतवता येईल. Corporate FD

3 secure corporate deposits giving 8 to 8.50% inflation-beating returns in 2022 | Mint

FD वरील टॅक्स

हे लक्षात घ्या कि, FD वरील व्याजाला इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्यावर टॅक्स द्यावा लागतो. उदाहरणार्थ कॉर्पोरेट FD मधून एका वर्षात 5,000 रुपये जास्त रिटर्न मिळाल्यास, 10 टक्के TDS लावला जाईल. Corporate FD

Will FD Interest Rates Increase In India?

डिपॉझिटमध्ये विविधता आणा

आपण वेगवेगळ्या बँका आणि कॉर्पोरेट्समधील वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे पैसे जास्त सुरक्षित राहतील. तसेच 180 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD मध्ये गुंतवणूक करता येऊ शकेल. त्याच वेळी, जर काही दिवसात पैशांची गरज असेल तर 15 दिवस किंवा 45 दिवसांच्या FD चा पर्याय देखील आहे. Corporate FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit/top-performing-company-fds.html

हे पण वाचा :

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित महिला संवाद मेळावा उदंड प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णादेवी पाटील, जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, जि.प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, सौ. प्रियांका ठावरे, भाजपा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. सारिका गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ना. सोम प्रकाश पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत शक्तिशाली नेते आहेत. त्यांनी महिलांसाठी अनेक योजना राबवून देशातील महिलांना आत्मनिर्भर बनविले आहे. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणावे. मोदीजींच्या नेतृत्वात सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ नक्कीच फुलेल अशी खात्री माझ्या दोन दिवसांच्या लोकसभा प्रवासात मला मिळाली आहे.

देशातील माता-भगिनींच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि त्यांना सशक्त बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना आणल्या असल्याचे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, की महिलांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम उज्वला योजनेने केले आहे. मोदींनी देशातील ९ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. देशात मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आज अनेक माताभगिनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहेत. भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी मोदींचे अनेक प्रयत्न सुरु असून, या प्रयत्नांना बळ मिळवून देण्यासाठी २०२४ ला भाजपाच्या उमेदवाराला सातारा लोकसभेतून निवडून देऊया, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

डॉ. सुरभी भोसले म्हणाल्या, माझा राजकीय प्रवास भाजपामधून सुरू झाला याचा मला खूप आनंद वाटतो. लोकसभेची निवडणूक अद्याप लांब असली तरी आपण आत्तापासून तयारीला लागलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निश्चित निवडून येईल, याची मला खात्री आहे.

यावेळी सौ. श्यामबाला घोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी ना. सोम प्रकाश यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर व नर्सेसचा कोविड योद्धा म्हणून प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मलकापूरच्या नगरसेविका नूरजहाँ मुल्ला, सौ. निर्मला काशीद, स्वाती पिसाळ, सीमा गावित, कृष्णा बँकेच्या संचालिका सौ. सारिका पवार, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, दुशेरेच्या सरपंच सौ. सुमन जाधव, जुळेवाडीच्या सरपंच श्रीमती सुरेखा पुजारी, सौ. मनिषा पांडे, सौ. सीमा घार्गे, सुनंदा शेळके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. संगीता देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सारिका गावडे यांनी आभार मानले.

अतुलबाबांसारखा सक्षम भाऊ विधानसभेत पाठवा : आ. जयकुमार गोरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस मोफत उपलब्ध करुन दिली. तसेच डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार दिले. त्यामुळे २०२४ ला लोकसभेला कमळाला आणि विधानसभेला अतुलबाबांना मत द्यायचा निर्धार तुम्ही सर्व महिलांनी केला असून, त्यांचा विजय निश्चित आहे हे इथे जमलेल्या प्रचंड गर्दीवरुन दिसून येत आहे, असे उद्‌गार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात काढले. अतुलबाबांसारखा सक्षम भाऊ विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.

पुन्हा मनसे- भाजपाच्या युतीची चर्चा? : चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर भेटीला

मुंबई | मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आज पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मराठी मतांची बेरीज जुळणी करण्यासाठी युती केली जावू शकते, असे राजकीय जाणकारांच्यातून बोलले जात आहे.

राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ या बंगल्यावर आज ही भेट झाली. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भेटीला नक्कीच काहीतरी राजकीय अर्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जवळपास एक तासभर चर्चा केली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौरा करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची रणनीती लक्षात घेता, मनसे-भाजपची ही जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : काही प्रसंगी अनेकदा आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत, आपली पैशांची गरज भागवण्यास पर्सनल लोन मदत करते. विशेषत: सणासुदीच्या काळात आपला खर्च भागवण्यासाठी लोकांना पैशांची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी बँकाकडून कर्ज घेतले जाते. मात्र प्रत्येक बँकेमध्ये यासाठी वेगवेगळा व्याजदर असेल.

9 benefits of using a Personal Loan to repay debt | IDFC FIRST Bank

हे लक्षात घ्या कि, Personal Loan शी संबंधित असे अनेक नियम असतात, ज्याबाबतची माहिती फारच कमी लोकांकडे असते. अशा परिस्थितीत, त्याच्याशी संबंधित काही खास पैलूंबाबत जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल. आज आपण असेच काही नियम आणि कोणत्या बँकेमध्ये किती दराने कर्ज मिळेल याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात…

From wellness to travel, take loan for any purpose

अशा प्रकारे घेता येईल कर्ज

इथे हे लक्षात घ्या कि, Personal Loan मिळवण्यासाठी आपल्याला कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची किंवा गॅरेंटीची गरज नसते. यामध्ये काही गोष्टी आणि कर्ज फेडण्याची आपली क्षमता पाहूनच बँकेकडून कर्ज दिले जाते. मात्र पर्सनल लोनसाठी काही महत्वाची कागदपत्रे आणि पात्रता आवश्यक असतील. तसेच चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर आपण एखाद्या संस्थेत किमान एक वर्ष काम करत असाल तरी देखील आपल्याला सहजपणे पर्सनल लोन मिळू शकेल. तसेच सलग 2 वर्षे व्यवसाय केल्यानंतर Personal Loan मिळू शकेल.

Looking to get a personal loan? Here are the things to keep in mind | Personal Finance News | Zee News

चला तर मग कोणत्या बँकांकडून किती व्याज दराने कर्ज मिळेल ते जाणून घेउयात…

बँक व्याज दर                                                        (वार्षिक)
स्टेट बँक ऑफ इंडिया                                        9.60% – 15.65%
बँक ऑफ इंडिया                                               10.35% – 12.35%
बँक ऑफ बडोदा                                               10.50% – 12.50%
HDFC बँक                                                      10.5% – 21.00%
कोटक महिंद्रा बँक                                            10.25% आणि त्याहून जास्त
येस बँक                                                         10.99% – 16.99%
एक्सिस बँक                                                   12% – 21%
इंडसइंड बँक                                                   10.49% – 31.50%
HSBC बँक                                                     9.50% – 15.25%
सिटी बँक                                                       9.99% – 16.49%
कर्नाटक बँक                                                   12% – 17%
फेडरल बँक                                                     10.49% – 17.99%
IDFC फर्स्ट बँक                                               10.49% पासून सुरू
टाटा कॅपिटल                                                   10.99% पासून सुरू
होम क्रेडिट कॅश लोन                                         19% – 49%
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक                          11.49% – 16.49%
आदित्य बिर्ला कॅपिटल                                       14%-26%
IIFL                                                                 24% पासून सुरू

Follow these steps to repay your personal loan quickly

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता भासेल

बँकेकडून Personal Loan घेण्यासाठी तुम्हाला जॉब डिटेल्स, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. कागदपत्रे ऑनलाइन सबमिट केल्यानंतर किंवा अपलोड केल्यानंतर ते व्हेरिफाय केले जाईल. व्हेरिफिकेशननंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. जर कागदपत्रे बरोबर नसतील आणि ते व्हेरिफाय केलेले नसतील तर कर्ज मिळू शकणार नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

मुंबईत मेट्रो 3 च्या पहिल्या भुयारी ट्रेनची चाचणी : मुख्यमंत्र्याच्या हस्ते हिरवा झेंडा

मुंबई | मुंबईची नव्याने जी लाइफलाइन तयार होत आहे. त्या मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरित्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली, ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे फडणवीस म्हणाले.

मेट्रो प्रकल्प 2023 च्या मार्चपर्यंत पूर्ण धावू शकला असता. परंतु काही वादविवाद झाल्याने डिसेंबर पर्यंत अर्धा धावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता तर पुढील चार वर्षे मेट्रो धावली नसती. मेट्रोच्या कार शेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा जास्त राजकीय झाला. कोर्टाने कार शेड तयार करण्यासाठी परवानगी दिली. पर्यावरणाला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी मेट्रो 3 आहे.

शिंदे- फडणवीस यांच्या शपथविधीला आज दोन महिने पूर्ण ः-  आमच्या दोघांचा शपथविधीला दोन महिने आज पूर्ण झाले. स्थगिती उठवून दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्प सुरू झाले. यात राजकीय प्रदूषण जास्त झाले. आता मेट्रो हा वाहतुकींवर रामबाण उपाय देणारा हा प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होऊ लागले आहेत. आज मंगळवारी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 44 रुपयांनी वाढून 51,282 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सोन्याची किंमत सध्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.09 टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना आज चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. MCX वर, चांदीच्या फ्युचर्सची किंमत 274 रुपयांनी घसरून 54,055 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदी सध्या त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.50 टक्के वर आहे. Gold Price Today

आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीची किंमत कमी झाली आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 0.24 टक्क्यांनी घसरून $1,735.6 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस देखील 0.41 टक्क्यांनी घसरून 18.72 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,570 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,540 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,570 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,250 रुपये
पुणे – 47,280 रुपये
नागपूर – 47,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,540 रुपये
पुणे – 51,570 रुपये
नागपूर – 51,570 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4718.00 Rs 4733.00 0.317 %⌃
8 GRAM Rs 37744 Rs 37864 0.317 %⌃
10 GRAM Rs 47180 Rs 47330 0.317 %⌃
100 GRAM Rs 471800 Rs 473300 0.317 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5146.00 Rs 5163.00 0.329 %⌃
8 GRAM Rs 41168 Rs 41304 0.329 %⌃
10 GRAM Rs 51460 Rs 51630 0.329 %⌃
100 GRAM Rs 514600 Rs 516300 0.329 %⌃

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर