Friday, December 19, 2025
Home Blog Page 2674

भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार : विक्रम पावसकर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आगामी मगरपालिका निवडणुकीमुळे सातारा येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. दरम्यान आज सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातारा शहरातील प्रमुख पदाधिकारी, नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार यांची महत्वाची बैठक सातारा येथे पार पडली. यावेळी भाजप मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार आणि सातारकरांच्या विकासाचा संकल्प राबवणार, असे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी म्हंटले.

यावेळी विक्रम पावसकर म्हणाले की, पक्षाची ध्येय धोरणे आंदोलने कार्यक्रम सातारा शहरांमध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले जात आहेत. येत्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील. त्याचबरोबर सातारा शहर कार्यकारिणीने जी एकोणीस मुद्द्यांची सूची तयार केली आहे त्यातील माहिती आपल्या प्रभागात फिरून उमेदवारांनी गोळा केली तर त्यांना निवडणूक अत्यंत सोपे जाईल. लवकरच सातारा शहर निवडणुकीसाठी कोअर कमिटीची घोषणा केली जाईल आणि या कमिटी मार्फत सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. पक्षाचे केलेले काम, दाखवलेली निष्ठा, आंदोलनातील कार्यक्रमातील उपस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी दिली जाईल.

सातारा येथे पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला प्रदेश कार्यकारणी सदस्य अमितजी कुलकर्णी, दत्ताजी थोरात, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते सातारकरांच्या विकासाचा संकल्प या संकल्प पेटीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्तविक करताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केले.

शिवसेना भवनात उद्या पत्रकार परिषद; संजय राऊत नेमकं काय बोलणार??

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. उद्या सायंकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून संजय राऊत उद्या नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घणाघाती टीका करत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच पुढील आठवड्यात ईडी चा मोठा घोटाळा बाहेर काढू असा इशारा त्यानी दिला होता.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर होत असून जाणूनबुजून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी गतवेळच्या पत्रकार परिषदेत मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजप वर टीकेचा भडीमार केला होता. त्यामुळे उद्या संजय राऊत नेमकं काय बोलणार अन कोणता खुलासा वगैरे करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे

बनवडीतील अभिजीत मदने यूक्रेनहून परतला मायदेशी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

युक्रेनमध्ये भारतातील विध्यार्थी अडकल्याने त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबविले. त्याच्या माध्यातून आज मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्याना मायभूमीत परत आणण्यात आले आहे. भारतात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील अभिजित मदने याचाही समावेश होता. अभिजीत मदने हा युक्रेन येथे शिक्षणासाठी होता. तोही नुकताच युक्रेनहून मायदेशी परतला आहे.

आपल्या मायभूमीत अभिजित परतल्यानंतर त्याचे येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अभिजित याने त्याला युक्रेनमध्ये अडकल्यावर आलेले अनुभव सांगितले.

यावेळी अभिजित म्हणाला की, सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. अशा अवस्थेत केंद्र सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 2017 रोजी मी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलो होतो. पाच वर्षात शिक्षण सुरळीत सुरु होते. पाच वर्ष तेथील परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल होती.

मात्र, नोव्हेंबर पासून रशियन सैनिकांनी आपले सैन्य युक्रेनमध्ये बॉर्डरवर आणण्यास सुरुवात केली. कालांतराने काही दिवसापूर्वी युक्रेमधून सांगितले गेले की येथील भयानक परिस्थिती होत चालली आहे. लोकही आपले कुटूंब सोबत घेऊन घरातील तळघरात जाऊन राहू लागले. आम्हालाही जाणवले कि आता आमचाही जीव धोक्यात आहे. आम्ही तत्काळ त्या ठिकाणाहून भारतात परतलो. आम्हाला या ठिकाणी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या ऑपरेशन गंगाची मोठी मदत झाली. मी त्याबद्दल मोदी सरकारचे विशेष आभार मानेल. त्यांच्या अशा प्रकारच्या मोहिमेमुळे आज असंख्य विध्यार्थी मायदेशी सुखरूप परतले आहेत.

यावेळी अभिजित मदने यांच्या वडील व आईनेही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनीहि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील कुरळपूर्णा फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. काल रात्री हा भीषण अपघात घडला आहे. शे. शागीर शे. हबीब, शे. तनविर शे. सत्तार आणि अलकेश पप्पू सलामे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
घटनेच्या दिवशी शे. शागीर शे. हबीब, शे. तनविर शे. सत्तार आणि अलकेश पप्पू सलामे हे तिघेजण आपल्या बाईकने परतवाडा मार्गावरुन आपल्या कुरळ पुर्णा येथील घरुन चांदूरबाजारला येत होते. यादरम्यान वैभव केळकर यांच्या शेतानजीक परतवाडा वाय पॉईंटवर मागून येणार्‍या ट्रकने यांच्या बाईकला जोरदार धडक दिली.

या अपघातात शे. सत्तार आणि अलकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शे. तनवीर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी अमरावतीला हलवण्यात आले मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूनंतर कुरळ पुर्णा या गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

विधानसभा निवडणूक निकाल 2022: सर्वात जलद अपडेटसाठी डेलीहंट पहा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या १० मार्चला जाहीर होतील. मागील महिनाभर या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. आज उत्तरप्रदेश मध्ये सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मुख्य राजकीय पक्ष आपली ताकद दाखवून देत असताना निवडणूक निकालाच्या ३ दिवस आधी नेमकी लढत कुणामध्ये आणि कशी आहे हे जाणून घेऊया.

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांना मुख्य आव्हान असलेल्या काँग्रेसमध्ये जोरदार लढाई आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत पाहायला मिळते. एक तृतीयांशपेक्षा अधिक मत मिळवणारा पक्ष याठिकाणी वरचढ ठरतो.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष समाजवादी पार्टी यांच्यात जोरदार प्रचार सुरू असून येथे रंगतदार लढत अपेक्षित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्ते, वीज, मंदिर निर्माण या कामाने लोकांची मनं जिंकली असली तरी प्रदेशातील बहुसंख्य लोक त्यांच्यावर नाराज आहेत. यादव व्यतिरिक्त ओबीसी आणि जाटव व्यतिरिक्त दलित मतांच्या जुळणीचं गणित अखिलेश यादव यांनी जुळवल्यामुळे यंदाची निवडणूक समाजवादी पक्षाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडेल असाही कयास बांधला जात आहे.

पंजाबमध्ये सर्वांच्या नजरा आम आदमी पक्षाकडे लागल्या आहेत, जो मोठी मुसंडी मारेल असा अंदाज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या राज्यात विशेष मेहनत घेत काँग्रेसवर हल्ला चढवला. मात्र त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचं काम चरणजीत सिंग चन्नी या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असून पंजाबमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल का हे पाहणं यामुळेच औत्सुक्याचं आहे.

मणिपूरमध्ये, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून JD(U) मध्ये झालेल्या पक्षांतराने तुलनेने कमी प्रसिद्ध पक्षाला स्पर्धेत आणले. आणि तिथेही हाय वोल्टेज लढाई पहायला मिळेल.

गोव्यात तृणमूल काँग्रेसने केलेल्या एंट्रीमुळे आणि ‘आप’च्या जोरदार प्रचारामुळे निवडणूक रंगतदार बनली. आहे. गोव्यात भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल, तर काँग्रेसही सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील राहील. मनोहर पर्रीकर यांच्या सुपुत्राने केलेली बंडखोरी भाजपला त्रासदायक ठरणार का हे यानिमित्ताने पाहणं रंजक ठरेल.

डेलीहंट पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे थेट कव्हरेज करत आहे. निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू.

पाच राज्यांमधील निकालांचे लाईव्ह आणि फास्ट अपडेट तेही चांगल्या सारणीच्या स्वरूपात.

आकडे, मागील निकालांशी तुलना, राज्य आणि मतदारसंघनिहाय, जागा बदलांचे अपडेट, सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया, ट्विटरवरील ट्रेंड, लाइव्ह व्हिडिओ, व्हायरल मीम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडीओ अशा गोष्टी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करू शकता. तर, विधानसभा निवडणुकीच्या सर्वात सखोल आणि रोमांचक कव्हरेजसाठी संपर्कात रहा.

लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीश इरनाक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डीस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व प्रो.कब्बडी खेळाडू गिरीश इरनाक याने उपस्थिती लावली. “गतवेळी 2017-18 साली लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेवेळी महाराष्ट्राला अकरा वर्षांनंतर अजिंक्यपद मिळाले, हा अतिशय चांगला योगायोग होता. लिबर्टी मजदूर मंडळ हे अतिशय जुने क्रीडा मंडळ आहे. या मंडळाला एक दैदिप्यमान गौरवशाली इतिहास आहे,”असे गौरवोद्गार खेळाडू गिरीश इरनाक याने काढले.

कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्यावतीने आयोजित स्पर्धेत लिबर्टी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते गिरीश इरनाक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अरुण जाधव, ज्येष्ठ संचालक अँड. मानसिंगराव पाटील, मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, रमेश जाधव, सुहास डोळ, उत्तम माने, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, राजेंद्र पवार, विनायक पवार, भास्कर पाटील, बाळासाहेब मोहिते, नंदकुमार बटाणे, विजय गरुड, राजेंद्र जाधव, सचिन पाटील यांच्यासह लिबर्टी मजदूर मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय व प्रो कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आल्यानंतर खेळाडूंमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी सदर खेळाडूंशी संवाद साधला व अनेकांनी त्यांच्या खेळाचे कौतुक केले. तसेच लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेमधील खेळाडूंची ओळख व नाणेफेक गिरीश इरनाक यांच्याकडून करण्यात आले.

उंब्रज पोलिस स्टेशनच्या गृहरक्षकाचा प्रामाणिकपणा; हरवलेला मोबाईल, कागदपत्रे केली परत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आजच्या काळातही अनेकजण आपले काम प्रामाणिक आणि तत्परतेने करत असतात. अशाच एका कार्यतत्पर कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. एका महिलेची हरवलेली पर्स व त्यातील पैसे, मोबाईल हे होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या विनायक कुंभार या कर्मचाऱ्याने शोधून परत केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवार दिं. 06 रोजी सकाळी कराड तालुक्यातील किवळ येथील सुवर्णा साळुंखे यांची कराड ते उंब्रज प्रवास करताना त्यांची पर्स गाडीतून खाली पडली. त्या जेव्हा उंब्रज येथील पाटण तिकाटणे येथे आल्या असता त्या गाडीतून उतरल्या तेव्हा त्यांना आपली पर्स पडल्याचे लक्षात आले. त्या पर्समध्ये मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे व काही रक्कम होती. त्यांनी तत्काळ उंब्रज येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना याबाबतची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनंतर अधिकारी गोरड यांनी उंब्रज येथील पाटण तिकाटाने येथे ट्रॅफिक डुटीसाठी उपस्थीत असलेल्या होमगार्ड कर्मचारी विनायक कुंभार यांना याबाबतची माहिती दिली. कर्मचारी कुंभार यांनीही लगेच शोध मोहीम राबविली. त्यांनी संबंधित महिला ज्या गाडीतून उंब्रज येथे आलया होत्या. त्या गाडी आलेल्या दिशेने शोध घेतला. त्यांना मसूर फाटा येथे एक 1 पर्स मिळून आली.

पर्स मधील सर्व ऐवज तपासून पाहत कुंभार यांनी ती पर्स सुवर्णा साळुंखे यांचीच असल्याची खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेली पर्स काही तासातच शोधून दिल्याबद्दल उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी कर्मचारी कुंभार यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे अभिनंदन केले.

विधानसभेत ओबीसी आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच सत्ताधारी आणि विरोधकांमध खडाजंगी पाहायला मिळाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नवे विधेयक सादर करू असे म्हंटल होत त्यानुसार आज सरकार कडून नवे विधेयक सादर करत ते मंजूर झाले

नवे सुधारणा विधेयक आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनात मांडलं. मध्य प्रदेश सरकारप्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभेत आणण्यात आले होते. त्यानंतर आता या विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग रचना, निवडणुकांच्या तारखा ठरवण्याचे आधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत.

साताऱ्यात जिल्हा ओबीसी अन बलुतेदार संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून सध्या राज्यभर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशात 2011 साली ओबीसींची जनगणना झालेली आहे.  जनगणना केली असताना केंद्र सरकारकडून डाटा दिला जात नसल्याने केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या विरोधात ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यभर ओबीसी राजकीय आरक्षणविरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून आज सातारा येथे संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी आंदोलन केले. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्रित येत पदाधिकाऱ्यांनी ओबीसी जनगणना झाली पाहिजे, बीसीस आरक्षण दिलेच पाहिजे, जोपर्यंत आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशा मागण्यांच्या घोषणा दिल्या.

आज सातारा जिल्हा ओबीसी संघटना व बलुतेदार संघटना यांच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसींना जे राजकीय आरक्षण देण्यात आले होते ते उचलून देण्यात आलेले होते. तात्पुरते ते आरक्षण दिलेले होते. न्यायालयाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आलेलं आहे कि ओबीसींचा जो डाटा आहे तो लवकरात लवकर जमा करावा. मात्र, दोन्ही सरकारकडून डाटा दिला जात नसल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले आहे.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/4861304127320309/?sfnsn=wiwspmo

वास्तविक परिस्थिती अशी आहे कि केंद्र सरकारकडे जो डाटा आहे तो केंद्र सरकार देत नाही. 2011 साली ओबीसींची जनगणना झालेली आहे. हि जनगणना केली असताना केंद्र सरकारकडून डाटा का दिला जात नाही? असा सवाल यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. म्हणजे ओबीसीना गाढण्यासाठी, ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी, ओबीसीना नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ओबीसीच्या राजकीय आरक्षमाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नये, अशी मागणीही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना २१ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.यापूर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, चौकशीसाठी त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवून मागितला. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.