Thursday, December 18, 2025
Home Blog Page 2675

महाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सध्या रानगव्यांचा वावर वाढला आहे. सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णा लेक जवळ आज सकाळी रानगव्यांचा मुक्त संचार पहायला मिळाला.

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जगाला क्षेत्र आहे. या याठिकाणी जगलं असल्याने मोठ्या संख्येने विविध प्राणी वास्तव्यास असतात. दरम्यान जंगल भागाने वेढलेल्या या भागात अनेक वेळा रानगव्यचे दर्शन होत असते.

या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. सध्या या ठिकाणी मोठ्या संख्येने रान गव्यांचे गाळप आढळून येत आहेत. सोमवारी काही पर्यटकांना रांगव्याच्या कळपाचे दर्शन झाले. त्या रांगव्याच्या कळपाचे फोटो आणि व्हिडीओ त्या पर्यटकांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात कॅमेराबद्ध केले. सोमवारी सकाळी सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्ता ओलांडताना हे अनेक गवे दिसून आले. सकाळी रहदारी नसल्याने हे गवे देखील निवांत रस्ता ओलांडत होते.

अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक : दोघेजण गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

गेल्या अनेक दिवसापासून कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान काल कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर वहागांव हद्दीत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी कराड तालुक्यातील वाहागावच्या हद्दीत कराड ते सातारा लेनवरून जात असलेल्या अज्ञात ट्रकने साताराकडे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील विश्वास रावसाहेब तोरसे (वय 36) व सुहानी शांताराम गायकवाड (वय 17) दोघेही रा. कारंडवाडी हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईन ऍम्ब्युलन्सने दोन्ही जखमींना सातारा येथे रुग्णालयात तात्काळ दाखल केले. तसेच हायवे हेल्पलाईन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, विक्रम सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

रवी राणा दिसला तर गोळी घाला असे आदेश; सभागृहात गदारोळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाइफेक प्रकरणी भाजप आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचे मोठे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. रवी राणा दिसला तर त्याला गोळ्या घाला असे आदेश देण्यात आलेत असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ माजला.

मी दिल्लीत असताना माझ्यावर अमरावती मध्ये गुन्हा दाखल केला. मी त्याबाबत माहिती घेतली असता पोलीस आयुक्त म्हणाले की, सरकार मधील काही प्रमुख लोकांनी गुन्हा दाखल करायला लावला. आणि रवी राणाला अटक करा असे आदेश देऊन १०० पोलीस माझ्या घरी गेले असे रवी राणा म्हणाले. तसेच यामागे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत असा आरोप करत त्यांनी एक पेनड्राईव विधानसभेत सादर केला

माझ्यावर रात्री १० वाजता गुन्हा दाखल केला. आणि मला सांगण्यात येत कि आमच्यावर एवढा दबाव आहे कि रवी राणा कुठे दिसला तर त्याला गोळी मारा असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच जर मी खोट बोलत असेल तर मला फाशी द्या असे रवी राणा यांनी म्हंटल. तुम्ही जर सूडबुद्धीने काम करणार असाल तर तुमचाही अनिल देशमुख होईल असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला.

वेध मनपा निवडणूकीचे ! औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस जम्बो कार्यकारिणी जाहीर

Youth Congress

औरंगाबाद – शहरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. याबद्दल वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने तातडीने कार्याकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या शहराध्यक्ष पदी हिशाम उस्मानी यांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली नव्हती. कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी अनेकजण प्रयत्नात होते. तर शासकीय कमिट्यांवर निवड व्हावी, यासाठी अनेक पदाधिकारी मुंबईवारीही करून आले होते. त्यातच येत्या काही महिन्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मंजुरीनंतर प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी 4 मार्च 2022 रोजी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यात 20 उपाध्यक्ष, 44 सरचिटणीस, 43 सचिव, 1कोषाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 40 सदस्य आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 2019 चे लोकसभा आणि विधानसभा उमेदवार, आघाडी संघटनांचे अध्यश्र प्रदेश पदाधिकारी हे निमंत्रित सदस्य आहेत.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वातील ग्रामीणची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या दोन महिने आधीच प्रदेशाध्यक्षांकडे काळे यांची यादी पोहोचली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही यादीही लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे.

 

तीन महिन्याच्या गर्भवती गाईला जीवदान : महाबळेश्वर येथील गाईस विहिरीतून काढले सुरक्षित

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे एका गर्भवती गाईला जीवदानाची देण्याची घटना नुकतीच घडली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी या गावातील तीन महिन्याची गर्भवती गाई विहिरीत पडली होती. तिला ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीम यांनी सुखरूप बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी येथील स्थानिक शेतकऱ्यांची तीन महिन्याची गर्भवती गाई दि. 5 मार्च 2022 रोजी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झालेल्या गाईचा संबंधित शेतकरी व ग्रामस्थांकडून शोध केला जात होता.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/4861207027330019/?sfnsn=wiwspmo

शोधा शोधीच्या दरम्यान बेपत्ता झालेली गाई परिसरातील पूजा हॉटेल असलेल्या जवळील विहिरीत आढळून आली. तीन महिन्याची गर्भवती गाई असल्याने गाईला काळजीपूर्वक महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीम यांच्यावतीने जेसीबीच्या साहायाने सुखरूप बाहेर काढले. यावेळी वाडा कुंभरोशी येथील स्थानिक ग्रामस्थानीही मदतकार्यात सहकार्य केले.

फडणवीसांच्या गाडीवर चप्पलफेक; रोहित पवार म्हणतात, चप्पल भिरकावने हे…

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे चप्पल फेकण्यात आली. पिंपरी चिंचवड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी फडणवीस आले असता ही घटना घडली. या घटनेवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हंटल आहे.

याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही असे रोहित पवार यांनी म्हंटल.

दरम्यान, या एकूण प्रकरणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, हे असे फाल्तू आणि चिल्लर लोक असतातच. स्वतः काहीही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीही करू शकले नाहीत. पुतळ्याच्या उद्घाटनाचे आणि अटलजींच्या कार्यक्रमाला विरोध होत असेल तर त्यांची बुद्धी तपासून पाहावी लागेल’ अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.

अवैध वाळू वाहतुकीला सहकार्य : माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित तर तहसिलदारांची बदली

Sand

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा – माण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक व उपसा केला जात होता. या प्रकरणी महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून देखील तो कोणतीही कारवाई न करता सोडल्या प्रकरणी आता सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चार तलाठ्यांना निलंबित तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर बदलीची कारवाई केली आहे.

यामध्ये माण तालुक्यातील वाकी गावचे तलाठी एस. एल. ढोले, खडकी गावचे तलाठी एस. व्ही. बडदे, मार्डी गावचे तलाठी वाय. बी.अभंग, वरकुटे-म्हसवडचे तलाठी जी. एस. म्हेत्रे, जांभुळणीचे तलाठी बी. एस. वाळके या पाच तलाठ्यांना निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्रीच्या वेळी माणसह खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणातअनाधिकृत वाळु वाहतूक केली जात होती. यावेळी या अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन तलाठ्यांनी पकडले. त्यावेळी ट्रॅकटर चालविणारा चालक व तलाठी यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडीओ आणि व्हीडीओ क्लीप जिल्हाधिकारी यांच्या हाती लागली. त्या क्लिपमध्ये तलाठी आणि वाळू व्यावसायिक यांच्यात काय संभाषण झाले असून वाळूची पकडलेली गाडी सोडण्यासाठी या तलाठ्यांना काय काय अमिषे देण्यात आली हे या ऑडिओ क्लिप मधून समोर आले आहे.

याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यानी संबंधित पाच तलाठी व तहसिलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच म्हसवड येथील महसुल मंडल निरिक्षक किशोर शेंडे यांचेवर हि निलंबनाची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. माणगंगा नदीतून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. मात्र, संबंधित बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून दिले. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 10 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत माण तहसिलदार यांनी प्रस्ताव माण-खटावचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांना चुकीचा अहवाल सादर –

तहसीलदार माण यांनी अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखणेकामी नेमूण दिलेल्या कामात हलगर्जीपणा, मंडल अधिकारी म्हसवड के.पी. शेंडे पथक प्रमुख यांचे समवेत या कार्यालयास चुकीचा अहवाल सादर केला. या प्रकरणी प्रशासनाची दिशाभूल करणे, गौण खनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे, गौण खनिजाची अवैध व वाहतूक करणाऱ्यांशी तडजोड करत असलेचे व्हिडोओ क्लिपवरून दिसून आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाईचे म्हसवड जनतेतून स्वागत होत आहे.

धक्कादायक! चार वर्षाच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेची मारहाण ?

औरंगाबाद – ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलाला मुख्याध्यापिकेने किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची तक्रार आईने दाखल केली आहे. शहरातील सिडको पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिडको एन-9 येथील रघुनंदन विद्यालयातील ही घटना आहे. मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांना मुलाचा धक्का लागल्यामुळे त्यांनी मुलाला रागवले आणि मारहाणही केल्याचा आरोप आईने केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैजयंती महामुनी यांचा 4 वर्षीय मुलगा सिडको एन – 9 येथील रघूनंदन विद्यालयात शिकतो. आईच्या तक्रारीनुसार, 5 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मुलगा शाळेत होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांना मुलाचा धक्का लागला. एवढ्याशा कारणावरून त्या मुलाला रागावल्या आणि मारहाणही केली. घरी आल्यावर मुलाने हा प्रकार आईला सांगितला. आईने या प्रकरणी मुख्याध्यापिकेला शाळेत जाऊन विचारलणा केली असता त्या त्यांनादेखील उद्घटपणे बोलल्या, अशी तक्रार आईने केली आहे. एवढंच नव्हे तर मुलाचा दाखला काढून घ्या, असेही बजावल्याचे आईने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर आईने मुख्याध्यापिका जोशी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

दरम्यान, मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. वर्गात मुलांची भांडणं सुरु होती, ती सोडवण्यासाठी मी गेले होते. त्यानंतर विराजने स्वतःलाच मारून घेत रडणे सुरु केले आमि घरी जाऊन मी मारले अशी तक्रार पालकांकडे केली, असं स्पष्टीकरण मुख्याध्यापिकेने दिले आहे. तसेच आजपर्यंत मी कुणालाही मारले नाही. कोणत्या मुलाला हातही लावलेला नाही. राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन ही तक्रार करण्यात आली आहे. उलट गेल्या चार वर्षआंपासून आम्हाला त्रास होत आहे. महामुनी यांनी त्यांच्या मुलाची फीसही भरलेली नाही. त्याशिवाय इतर मुलांची फीस कमी करण्यासाठी आमच्यावर वारंवार दबाव आणला जात होता, अशी तक्रार मुख्याध्यापिकेने केली आहे.

बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीसांना द्यावी- नितेश राणे

Rane Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी द्यावी असे विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे.

नितेश राणे म्हणाले, काही लोक स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून बॅनरबाजी करतात. पण माझी वयक्तिक भावना विचारली तर मला वाटत महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच हिंदुहृदयसम्राट ही पदवी द्यावी. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर हिंदुह्रदयसम्राटचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात फडणवीसांचा गादीवर झालेल्या चप्पल फेकी वरूनही राणेंनी सरकार वर टीका केली. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो  त्यांना जागोजागी चपलांचा हार घालतो मग चपला मोजायचे काम त्यांनी करावं, भाजपचे कार्यकर्ते  गप्प बसणार नाही’ असा इशारा राणेंनी दिला.

गणपतीपुळेतील समुद्रात बुडणार्‍या सातारमधील चार पर्यटकांना वाचविण्यात यश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

सध्या गणपतीपुळे या ठिकाणी फिर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक जात आहेत. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व समुद्रातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून चार पर्यटक गेले होते. समुद्रात ते गेले असता अचानक आलेल्या लाटांमुळे ते बुडाले. यावेळी त्यांना जेसकी बोट चालकांनी बुडण्यापासून वाचवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोटरेगाव तालुक्यातील नांदवडे येथील गणेश सुतार (वय 35), शमाली सूर्यवंशी (38), मृदुला सूर्यवंशी (18) व मंदी सूर्यवंशी (14) हे चौघे गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते. रविवारी देवदर्शन घेतल्यानंतर ते समुद्रात पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेले. यावेळी या चारही जणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते अचानक बुडाले. हि गोष्ट त्या ठिकाणी असलेल्या जेसकी बोट चालकांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राहत जेसकी बोट चालकांनी चार जणांना बुडताना वाचवले.

यावेळी गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली. या घटनेपूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी खोल समुद्राच्या पाण्यात गेलेल्या त्या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका, असा इशारा दिला होता.