Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 2678

टॉप 10 पैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 2.11 लाख कोटी रुपयांची घट

Stock Market Timing

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या सर्वांगीण विक्रीमुळे टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांची मार्केटकॅप 2.11 लाख कोटी रुपयांनी घटली. या काळात एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरला सर्वाधिक फटका बसला.

रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव, तेलाच्या वाढत्या किंमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री यामुळे सेन्सेक्स आठवड्यात 1,524.71 अंक किंवा 2.72 टक्क्यांनी घसरला. टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांची मार्केटकॅप एकत्रितपणे 2,11,155.03 कोटी रुपयांनी घसरली.

बँकिंग शेअर्सही घसरले
या कालावधीत HDFC बँकेची मार्केटकॅप 49,321.79 कोटी रुपयांनी घसरून 7,57,610.16 कोटी रुपयांवर आली. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची मार्केटकॅप 35,396.59 कोटी रुपयांनी घसरून 4,74,593.94 कोटी रुपयांवर आली.

SBI ची मार्केटकॅप
HDFC ची मार्केटकॅप 33,023.19 कोटी रुपयांनी घसरून 4,02,210.71 कोटी रुपये झाली आणि ICICI बँकेची मार्केटकॅप 29,343.26 कोटी रुपयांनी घसरून 4,78,070.84 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्केटकॅपमध्येही गेल्या आठवड्यात घट झाली. याउलट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची मार्केटकॅप 28,006.22 कोटी रुपयांनी वाढून 15,73,050.36 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

इन्फोसिसची मार्केटकॅप 12,470.59 कोटी रुपयांनी वाढून 7,24,913.68 कोटी रुपये आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची मार्केटकॅप 2,034.48 कोटी रुपयांनी वाढून 13,03,989.59 कोटी रुपये झाली.

पुढील आठवड्यात बाजार
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे ​​रिसर्च प्रमुख संतोष मीना म्हणाले, “भू-राजकीय अनिश्चितता अजूनही कायम आहे. याशिवाय देशांतर्गत 10 मार्च रोजी होणारे विधानसभा निवडणुकीचे निकालही महत्त्वाचे आहेत. याशिवाय 10 मार्च रोजी अमेरिकेतील चलनवाढीचा डेटा जाहीर केला जाईल, ज्यावर जागतिक बाजारांचेही निरीक्षण केले जाईल.”

विना तिकिटाच्या मेट्रो प्रवासावर फडणवीसांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढत आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपालांसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी व इतर नेत्यांनीही प्रवास केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज विना तिकीट मेट्रोतून प्रवास केला. आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केली आहे तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या,” असे फडणवीस यांनी म्हंटले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करीत एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली, याचं पहिलं तिकीट मोदींनी मोबाईलवर पेमेंट करुन काढलं.

आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केलीये तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या. अनेक अडचणी होत्या खासकरून आम्ही पण महामेट्रोचं अभिनंदन करतो. महामेट्रोने विक्रमी वेळात पुणे मेट्रोचे काम केले आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले.

NSE Scam: चित्रा रामकृष्ण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज CBI न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच NSE च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खरेतर, दिल्लीतील विशेष CBI न्यायालयाने शनिवारी NSE को-लोकेशन प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

याप्रकरणी CBI ने नुकतीच रामकृष्ण यांची चौकशी केली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यापूर्वी मुंबई आणि चेन्नई येथील चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. रामकृष्ण देखील बाजार नियामक सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहेत.

आनंद सुब्रमण्यम हे CBI च्या ताब्यात आहेत
अलीकडेच, CBI कोर्टाने NSE चे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि माजी एमडी रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना CBI कोठडीत पाठवले होते. NSE प्रकरणात CBI ने त्याला चेन्नईतून अटक केली होती. CBI ने NSE चे माजी सीईओ रवी नारायण यांची NSE ब्रोकरद्वारे ‘कोलोकेशन’ सुविधेच्या कथित गैरवापराच्या चालू चौकशीच्या संदर्भात चौकशी केली आहे.

चित्रा रामकृष्ण व्यवसायाने CA आहेत
चित्रा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहे. त्यांनी 1985 साली IDBI बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही काळ सेबीमध्येही काम केले. 1991 मध्ये NSE सुरू झाल्यापासून त्या मुख्य भूमिकेत होत्या.

2013 मध्ये NSE प्रमुख बनले होते
‘हर्षद मेहता घोटाळा’ नंतर पारदर्शक स्टॉक एक्सचेंज तयार करण्यासाठी निवडलेल्या NSE चे पहिले CEO RH पाटील यांच्या नेतृत्वाखालील 5 लोकांमध्ये चित्रा यांचा समावेश होता. 2013 मध्ये रवि नारायण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर चित्रा यांना 5 वर्षांसाठी NSE चे प्रमुख बनवण्यात आले.

सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत; अजितदादांची मोदींकडे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच राज्यपालांची तक्रार केली आहे. पुणे येथील विविध प्रकल्पांच्या उदघाटनाला मोदी आले असता अजित दादांनी आपल्या भाषणातून राज्यपालांवर निशाणा साधत मोदींकडे तक्रार केली आहे.

अजित पवार म्हणाले, अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. मला पंतप्रधान मोदींच्या लक्षात एक गोष्ट आणायची आहे. अलीकडच्या काळात महत्त्वाच्या पदावर बसलेल्या काही सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत. असे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी संकल्पनेतील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाय रचला. सत्यशोधक विचाराचा प्रसार केला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाय. कुणाही बद्दल माझ्यामनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूक करतो असे अजित पवार म्हणाले

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळविले, परिसरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असणाऱ्या गारपीर चौक येथे भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडली. घरी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुधाराणी रणजित शिंदे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुधाराणी शिंदे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्या घरी निघाल्या होत्या. गारपीर चौक येथे आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड ओलांडताना दुचाकीवरून अज्ञात दोघेजण पाठीमागून आले. त्यांनी शिंदे यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे आणि 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून धूम स्टाईल ने पोबारा केला.

अचानक घडलेल्या या प्रकारानंतर शिंदे गोंधळल्या त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले असून त्यांना शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, अतिशय मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याने खळबळ उडाली आहे.

“देशाच्या इतिहासात पुण्याचे मोठे योगदान”; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सकाळी त्यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर त्यांनी एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. “आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे,” असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. यावेळी मोदी म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे.

आधी भूमिपुजनं व्हायची, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार? म्हणून आजचं उद्घाटनं जास्त महत्त्वाचं आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल जाऊ शकतात हे आज सिद्ध झाले आहे. मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. पुण्याला ई-बस मिळाल्या आहेत. आज पुण्यात अनेक विविधतापूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट आर. के. लक्ष्मण यांना समर्पित करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळाला असल्याचे मोदी यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/379160607378834

नेमका काय आहे प्रकल्प

मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही आज मोदींच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1 हजार 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1 हजार 470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असणार आहे.

कौतुकास्पद !!! आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भंगारातून साकारली प्रदूषणविरहित गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात या विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यातून चक्क प्रदूषणविरहित चारचाकी ट्रामगाडी बनवली आहे. अर्जुनला लहानपणापासूनच ट्राम गाडीतून फिरण्याची स्वप्न पडायची. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होतं. यावेळी अर्जुनने बरेच ग्रीलचे वेस्टेज साहित्य जमवले, त्याचे वेल्डिंग करून सनी मोपेडचे इंजिन, मारुतीचे स्टेरिंग आणि सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली मात्र त्याचा तो पहिला प्रयत्न फसला.

यानंतर काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं असं त्याने आपल्या मनाशी ठरवलं, त्यासाठी त्याने मारुतीचे स्टेरिंग आणले, स्टेरिंग रॅक जोडला, मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकप्सर बसवले, सायकलच्या चाकाऐवजी सनी मोपेडची चाके बसवली, मागच्या बाजूला एक्सेल बार लावले, सेंटरमध्ये चीन वेल बसवले, मोपेडचे ड्रम वेल लावले आणि मग अशा प्रकारे तयार केलेली गाडी चालवून बघितली. मात्र त्याचा तोही प्रयत्न फसला गेला. यामध्ये एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली ती अशी की जर आपण गाडीचं वजन कमी केलं तर …. आणि आशेचा किरण दिसला, गाडी चालायला लागली मग बॉडीच्या कव्हरसाठी पत्रे लावले गेले.

त्यानंतर सहा सात महिने असेच गेले तोपर्यंत इंजिन खराब झाल होतो. यावेळी त्याला कळले की शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे. त्यासाठी मग प्रदूषण विरहित इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी तयार करण्याचं ठरवलं गेलं. त्यानंतर 48 watt ची डीपी मोटार बसवली गेली आणि बारा वॅटच्या 4 बॅटरी बसवल्या बाकीचं सेटिंग डिझाईनही मीच तयार केल्याचं अर्जुनने यावेळी सांगितले. शेवटी ट्राम गाडी तयार झालीच. ही गाडी 48 watt बॅटरीवर पंधरा किलोमीटर चालते. गाडी तयार करताना वेळोवेळी माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिल्याचंही अर्जुनने म्हंटले.

“रशिया-युक्रेन युध्दाचे जगावर दुष्परिणाम; पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई वाढेल” – जयंत पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

रशिया-युक्रेन युद्धाने पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई आणखी वाढेल. या युद्धाचे दुष्परिणाम हळूहळू जगावर पडतील. असे भाष्य राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील तिसऱ्या गाव बैठकीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात आज किमान 4 ते 5 हजार गाव बैठका होवून विविध प्रश्र्नांना गती मिळेल. विविध विषयांवर विचारमंथन होईल असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील कार्यकर्त्यांना ’एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ हा उपक्रम दिला असून या उपक्रमा अंतर्गत ते साखराळे येथे बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले,”राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारतो? आणि त्याने समर्थांना संपूर्ण राज्य गुरू दक्षिणा म्हणून दिले ही विधाने चुकीची आहेत.”

त्यांनी अलीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या लग्नावरूनही असेच विधान केले आहे. युक्रेनमधील तुंग, डिग्रज आदी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितलं.

मास्क न घालताच मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; मेट्रो प्रवासादरम्यान ची घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पध्दतीने तिकीट काढून मेट्रोने प्रवासही केला. मात्र यावेळी मोदींनी मास्क न घातल्याचे निदर्शनास आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर गरवारे मेट्रो स्थानक ते आनंदनगर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो मधील उपस्थिती विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत संवाद साधला. मात्र यावेळी चक्क मास्क च घातला नव्हता. एकीकडे पंतप्रधान मोदींनी मास्क घातला नसताना दुसरीकडे विद्यार्थ्यांनी मात्र कोरोना नियमांचे पालन करताना मास्क चा वापर केला होता.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी मास्क चा वापर हा राज्य सरकार कडून बंधनकारक करण्यात आला आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदींनीच चक्क मास्क न घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पुणे मेट्रो च्या उद्घाटना वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदि मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या एका तिकीटावर बाकी नेत्यांचा फुकट मेट्रो प्रवास ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करत त्यांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन केले त्यानंतर मोदींनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढले आणि आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या राज्यपालांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांच्यासह मान्यवरांनी फुकट प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. ग्रीन सिग्नल देत त्यांनी मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वनाझ ते गरवारे महाविद्यालयापर्यंंतचा प्रवासही केला. या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. दरम्यान प्रवास करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रथम मेट्रोचे तिकीट काढले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/379160607378834

पुण्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या मेट्रोतून सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पुणे शहरात वनाझ ते रामवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास करण्यासाठी पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये इतकी तिकीटाची रक्कम आहे. म्हणजे वनाझ ते गरवारे स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागणार आहेत. तर पिंपरी- ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वीस रुपयांचे तिकीट असेल.