“देशाच्या इतिहासात पुण्याचे मोठे योगदान”; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सकाळी त्यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर त्यांनी एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. “आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे,” असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. यावेळी मोदी म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे.

आधी भूमिपुजनं व्हायची, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार? म्हणून आजचं उद्घाटनं जास्त महत्त्वाचं आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल जाऊ शकतात हे आज सिद्ध झाले आहे. मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. पुण्याला ई-बस मिळाल्या आहेत. आज पुण्यात अनेक विविधतापूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट आर. के. लक्ष्मण यांना समर्पित करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळाला असल्याचे मोदी यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले.

नेमका काय आहे प्रकल्प

मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही आज मोदींच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1 हजार 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1 हजार 470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असणार आहे.