Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2686

IOC च्या भागीदारीत कोटक महिंद्रा बँकेने लाँच केले को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड

Kotak Mahindra Bank

नवी दिल्ली । देशभरात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वांनाच हैराण केले आहे, मात्र तुम्हाला काही लिटर पेट्रोल आणि डिझेल फ्री मध्ये दिले गेले किंवा तुम्हाला कॅशबॅक दिला गेला तर तुम्ही काय म्हणाल? होय, हे खरे आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना तुम्ही फ्युएल क्रेडिट कार्ड्स द्वारे तुमचे पैसे वाचवू शकता. बाजारात अनेक फ्युएल क्रेडिट कार्ड्स उपलब्ध आहेत. यामध्ये, खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शुक्रवारी इंडियन ऑइल कोटक को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली.

या टाय-अपमुळे, ग्राहकांना एक चांगला रिवॉर्ड प्रोग्रॅम बघायला मिळेल. यामध्ये ग्राहकांना इंधनाचा वापर आणि गैर-इंधन आणि वारंवार खर्च करणार्‍या श्रेणींवर, जसे की जेवण आणि किराणा सामानावर चांगले रिवॉर्ड मिळतील.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक (रिटेल ट्रान्सफॉर्मेशन) संदीप मक्कर म्हणाले, “आम्ही कोटक महिंद्रा बँकेसोबतच्या सहकार्याबद्दल खूप उत्सुक आहोत. इंडियन ऑइलचा आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देऊन इंधन भरण्याचा अनुभव बदलण्यावर ठाम विश्वास आहे.”

मक्कर म्हणाले की,”ही पार्टनरशिप इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ब्रँडची पोहोच आणखी मजबूत करण्यास आणि ग्राहकांशी जोडण्यास मदत करेल. इंडियन ऑइलच्या 33,000 हून अधिक इंधन केंद्रांपैकी 98 टक्क्यांहून जास्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेट पेमेंट स्वीकारतात.”

नवरा-बायकोने केले एकत्र मद्यपान, यानंतर मद्यधुंद पत्नीने केले ‘हे’ कृत्य

jaipur crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली आहे. संबंधित दाम्प्त्याने आधी एकत्र मद्यपान केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर हा वाद वाढल्याने आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली. बाडमेरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आरोपी पत्नीने गळा आवळून आपल्या पतीची हत्या केली आहे. मृत तरुणाच्या आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे

काय आहे प्रकरण?
मृत व्यक्तीचे नाव अनिल कुमार आहे. आपली सुन मंजूने आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार कुंती यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला.

दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन
संबंधित पती-पत्नी दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही दोघं मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादातून आरोपी मंजूने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिने आपल्या पतीची बेल्टने गळा आवळून हत्या केली. यानंतर मृत अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मंजुची चौकशी केली. तेव्हा तिने आपणच हत्या केली असल्याचे कबुल केले.

आता अशाप्रकारे कमी करा होम लोनवरील EMI, संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या

home

नवी दिल्ली ।  तुम्ही जर होम लोनवर जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जी वाचून तुम्ही तुमचा EMI 5,000 रुपयांनी कमी करू शकाल. बहुतांश बँका 8 ते 9 टक्के लोन देत होत्या मात्र आता बहुतांश बँका 7 टक्के दराने लोन देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे होम लोन ट्रान्सफर करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा पर्याय निवडून तुमचा फक्त EMI च कमी होणार नाही तर परतफेडीचा कालावधीही वाढवता येऊ शकेल.

EMI 5000 रुपयांपर्यंत कमी होईल
जर तुम्हाला तुमच्या होम लोनचा EMI 5000 रुपयांनी कमी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही नियोजन करावे लागेल. स्वस्त व्याजदरात बँक लोन ट्रान्सफर केल्याने तुमच्या EMI वर मोठा फरक पडेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये होमलोन घेतले असेल, तर त्या बँकेच्या होमलोनवरील व्याजदर 9.25 टक्के होता. आता तुम्ही होमलोन नवीन बँकेत शिफ्ट केल्यास ते 7 टक्के दराने घेऊ शकता, तर तुमचा मंथली EMI आपोआप कमी होईल.

संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या:-
वर्ष                     2016
कर्जाची रक्कम      30 लाख
व्याज दर                9.25%
कर्जाचा कालावधी   20 वर्षे
EMI                       27,476

आता समजा 2022 मध्ये तुम्ही तुमचे होम लोन नवीन बँकेत शिफ्ट केले. त्यामुळे तुमच्या थकीत कर्जात 24 लाख रुपयांची बचत होईल. म्हणजेच, जर तुम्ही तुमचे होम लोन अशा प्रकारे शिफ्ट केले तर तुमचा EMI दरमहा सुमारे 5000 रुपयांनी कमी होऊ शकतो.

नवीन बँक EMI कॅल्क्युलेशन
वर्ष                           2022
कर्जाची रक्कम             25 लाख
व्याज दर                      6.90%
कर्जाचा कालावधी         14 वर्षे
EMI                            22,000 (अंदाजे)

सुविधेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला होमलोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल, तर यासाठी KYC डॉक्युमेंट्स जसे की, आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ आवश्यक असेल. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची आर्थिक स्टेटमेंट आणि पाच वर्षांच्या व्यवसायातील सातत्य डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. पगारदार अर्जदारांनी चालू वेतन स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.

राज्यात पुन्हा सत्तेत येऊ असे भाजपला वाटत असेल तर …; संजय राऊतांचा टोला

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मलिक कुटुंबियांना धीर देत विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत आहे असा धीर संजय राऊतांनी मलिक कुटुंबियांना दिला

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारांना बदनाम करायचे, कामात अडथळे आणायचे, राज्यपालांच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या असे प्रकार केल्यावर राज्यात आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असं त्यांना वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ झाली असून कोर्टाने ७ मार्च पर्यंत वाढ केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप सातत्याने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे.

“ओवेसी को फ्लॉवर समझा है क्या, फ्लॉवर नही. फायर है फायर…”; वारीस पठाण यांचा ‘पुष्पा’ डायलॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका चांगलाच वाढला आहे. या ठिकाणी प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून मतदारांसमोर भाषण करताना डायलॉगबाजी केली जात आहे. मुबारखपुर येथे ‘एमआयएम’ चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रचार सभेतील भाषणा बोलताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींचे वर्णन केले. “ओवेसी को फ्लावर समझे क्‍या, फ्लॉवर नहीं. फायर हैं फायर”, असे पठाण यांनी म्हंटले आहे.

‘एमआयएम’ पक्षाच्यावतीने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार उभा करण्यात आलेला आहे. येथील मुबारखपुर येथे नुकतीच ‘एमआयएम’ ची प्रचार सभा पार पडली. यावेळी ‘एमआयएम’ चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पुष्पा चित्रपटातील नायक अल्लु अर्जुन प्रमाणे अॅक्टींग केली.

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ओवेसींच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा देखील उल्लेख केला आणि आम्ही कुणाला घाबरणार नाही आणि कुणापुढे झुकणारही नाही. आपल्या हक्कासाठी लढत राहू. हा लढा आम्ही संविधानाच्या कक्षेत राहून लढू, असे म्हंटले. तसेच पठाण यांनी सरकारवरही हल्लाबोल केला. राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. आता हक्कासाठी कुणासमोर आपण झुकणार नाही, असे पठाण यांनी यावेळी म्हंटले.

आगामी निवडणुकात काॅंग्रेसकडून ओबीसींना 27 टक्के आरक्षण : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपने आरक्षण घालवले तर आमच्याच सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. आगामी निवडणुकांसाठी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. अशा परिस्थितीत काही दिवसात पालिकाच्या निवडणुका होत आहेत, अशावेळी पालिका, स्थानिका स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आमच्या काॅंग्रेस पक्षाने पक्षाअंतर्गत 27 टक्के जागा ओबीसींना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ओबीसी सेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितले.

कराड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणी धैर्यशील सुपले, प्रदेश सचिव बबनराव पुजारी, जग्गनात कुंभार, आनंदा सावंत, शिवाजीराव गावडे, भिमराव काळोख, बाबूराव मोटे, दत्तात्रय काशिद, सचिन जगताप, शिवराम शिंदे, रतन बाड, सागर कुंभार, सुनिल उबाळे आदी उपस्थित होते.

भानुदास माळी म्हणाले, ओबीसी समाजाचे आता राजकीय आरक्षण रद्द केले आहे. यापुढील काळात भाजप पक्ष हा ओबीसीचे नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण घालविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशावेळी राज्य सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हेही ओबीसी समाजासाठी काहीही करत नाहीत. केवळ राष्ट्रीय काॅंग्रेस आंदोलने, मोर्चे काढून प्रयत्न करत आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ‘या’ काँग्रेस नगरसेवकावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला

chandrapur crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपुरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञातांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली. या हल्ल्यात नगरसेवक नंदू नागरकर हे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके ?
नंदू नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांच्यावर तीन युवकांनी हल्ला करत भरचौकात क्रिकेट बॅटने मारहाण केली. तोंडावर मास्क घातलेल्या या आरोपी युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना मारहाण केली.

या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. नंदू नागरकर हे काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चांगली बातमी, यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण

Crude Oil

नवी दिल्ली । अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराच्या आशेने, गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली. गुरुवारी, ब्रेंट क्रूड सुमारे $112 प्रति बॅरल ट्रेड करत होते, 2013 नंतरची सर्वोच्च पातळी $119.84 प्रति बॅरल होती. नंतर तो प्रति बॅरल $110.46 वर बंद झाला. मात्र, शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, गुरुवारी तेलाच्या किंमती त्यांच्या क्लोजिंग लेव्हलपासून किंचित वाढल्या.

शुक्रवारी सकाळी 11:05 वाजता इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE) वर ब्रेंट फ्युचर्सचा मे कॉन्ट्रॅक्ट $112.16 वर ट्रेड करत होता, जो मागील क्लोजिंग पेक्षा 1.54% जास्त होता. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) एप्रिल कॉन्ट्रॅक्ट NYMEX वर 2% वाढून $109.82 प्रति बॅरल झाला.

युद्ध थांबले नाही तर ?
मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री म्हणाले, “युनायटेड स्टेट्सचा इराणशी अणु करार होऊ शकतो असे संकेत मिळाल्यानंतर कच्च्या तेलात नफा बुकिंग उच्च पातळीवर दिसून आले. जर हा करार झाला, तर इराणचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात परत येऊ शकेल आणि नफा मर्यादित करू शकेल.”

इराण हा जगातील नवव्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे, मात्र देशावर आर्थिक निर्बंधांमुळे त्याच्या क्षमतेपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि संघर्षामुळे आगामी काळात तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. “आजच्या सत्रात कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर राहण्याची अपेक्षा करतो आणि जर रशिया-युक्रेन युद्ध तीव्र झाले तर तेलाच्या किंमती वाढू शकतात,” असे ते म्हणाले.

तज्ञांचे मत वेगळे असते
कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव यांचा विश्वास आहे की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीने गुरुवारी अत्यंत अस्थिर तेल बाजार शांत केला आहे. युक्रेनच्या अणु प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन तणाव वाढल्याने शुक्रवारी किंमती पुन्हा वाढल्याचे त्यांनी सांगितले.

राव म्हणाले, “एका आठवड्यात कच्च्या तेलात 25% पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि मार्केटमधील प्लेअर्स आता रॅली सुरू ठेवण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करत आहेत. जोपर्यंत तणाव कमी करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत किंमती वाढतच राहण्याची शक्यता आहे.”

….. अन् आमिरच्या आग्रहावर अमिताभ बच्चन यांनी झुंडला दिला होकार; पहा नेमकं काय घडलं

मुंबई । बॉलीवूडमध्ये, आमिर खानला परफेक्शनिस्ट खान या नावानेही ओळखले जाते, कारण तो एक असा अभिनेता आहे जो त्याच्या असामान्य निवडी आणि चांगल्या कन्टेन्टसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत जर त्याने कोणाला काही सूचना दिल्यास त्याचे म्हणणे नक्कीच गांभीर्याने घेतले जाते. नुकतेच असेच काहीसे घडले. काही काळापूर्वी त्याने महानायक अमिताभ बच्चन यांना देखील काही सूचना दिल्या आणि ज्या ते टाळू शकले नाहीत.

आमीर खानने ‘झुंड’ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची शिफारस तर केलीच, मात्र त्यांना या चित्रपटात काम करण्यास तयारही केले. होय,’झुंड’ फ्लोअरवर येण्याच्या खूप आधीच आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली होती आणि त्यानंतर तो इतका प्रभावित झाला की, त्याने थेट बॉलीवूडच्या शहेनशहाला या चित्रपटात काम करण्याविषयी सांगितले.

वास्तविक या चित्रपटासाठी बिग बींपेक्षा चांगला दुसरा कोणीच असू शकत नाही, असे आमिर खानला वाटत होते. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही याला दुजोरा दिला आहे. बिग बी म्हणाले, “मला आठवतंय जेव्हा मी आमिरशी याबाबत चर्चा केली होती, तेव्हा त्याने मला हा चित्रपट करायला हवा असं सांगितलं होतं आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीला मान्यता देतो तेव्हा काय होतं ते तुम्हाला माहितीच आहे.”

आमिर खानने पाहिला ‘झुंड’
अलीकडेच आमिर खानने ‘झुंड’ चे स्पेशल स्क्रीनिंग पाहिले. चित्रपटाचे स्क्रिनिंग पाहून आमिर खूप भावूक झाला. इतकेच नाही तर त्याच्या डोळ्यातून पाणीही वाहू लागले. अशा परिस्थितीत एका प्रसिद्ध पोर्टलवर या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले.

आमिर खानने केले ‘झुंड’चे कौतुक
आमिर खान म्हणाला, “हा एक अद्भुत चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आहे. हे खूप वेगळे आहे आणि ते कसे बनवले गेले हे मला माहित नाही. मी आवेशाने जागा झालो आणि हा चित्रपट मला सोडणार नाही. माझ्याकडे शब्दच नाहीत कारण हा एक अप्रतिम चित्रपट आहे. 20-30 वर्षांच्या इंडस्ट्रीमध्ये राहून आम्ही जे काही शिकलो ते सर्व हे तोडून टाकते.”

आमिर खानने अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले
आमिर खान पुढे म्हणाला, “अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत, मात्र हा त्यांच्या त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.”

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आणि काॅंग्रेस प्रयत्नशील तर राष्ट्रवादी, शिवसेना अप्रयत्नशील : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा न दिल्याने आरक्षण गेले आहे. आमच्यावर परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून राज्य सरकारने दिलेला अहवाल हा संतापजनक आहे. ज्यांनी आरक्षण घालवले तो भाजप आणि आमचा राष्ट्रीय काॅंग्रेस पक्ष ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आमच्याच सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याचा आरोप ओबीसी सेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला आहे.

कराड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणी धैर्यशील सुपले, प्रदेश सचिव बबनराव पुजारी, जग्गनात कुंभार, आनंदा सावंत, शिवाजीराव गावडे, भिमराव काळोख, बाबूराव मोटे, दत्तात्रय काशिद, सचिन जगताप, शिवराम शिंदे, रतन बाड, सागर कुंभार, सुनिल उबाळे आदी उपस्थित होते.

भानुदास माळी म्हणाले, आम्ही रत्नागिरी, पुणे येथे रस्त्यावर उतरून आंदोलने केली. आम्ही नाशिक, विदर्भात आम्ही मोर्चे काढणार आहोत. राष्ट्रपतींना भेटणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे एवढाच पर्याय आमच्यापुढे आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. यापुढील लढाई रस्त्यावर असणार आहे. पुण्यातील मोर्चाला राहूल गांधी यांच्या उपस्थित 1 लाख लोकांच्या साक्षीने काढला जाईल.