Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2693

आता पॅकेट पाहिल्यावर समजेल तुमचे खाद्य किती Healthy आहे, सरकारने केली मोठी तयारी

नवी दिल्ली । पॅकेज्ड फूडच्या दर्जाबाबत सर्वसामान्यांनाच नव्हे, तर सरकारलाही चिंता आहे. यावर उपाय म्हणून पॅकेजिंग केलेल्या वस्तूंसाठी हेल्थ स्टार रेटिंग लवकरच सुरू केली जाणार आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) सर्व पॅकेज केलेल्या उत्पादनांची हेल्थ रेटिंग करेल, जेणेकरुन ग्राहकाला त्याचे खरेदी केलेले उत्पादन आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे समजू शकेल. एका उच्च FSSAI अधिकाऱ्याने सांगितले की,” हेल्थ स्टार रेटिंग (HSR) चे उद्दिष्ट ग्राहकांना निरोगी खाण्याकडे आणणे आहे, जेणेकरून भारतीयांना खराब जीवनशैलीमुळे आजारी पडण्यापासून वाचवता येईल.”

‘या’ पॅरामीटर्सवर रेटिंग ठरवले जाईल
FSSAI च्या अधिकाऱ्याने सांगितले की,”उत्पादनांचे हेल्थ रेटिंग त्यात असलेले मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणाच्या आधारावर ठरवले जाईल. त्याची माहिती पॅकेटच्या पहिल्या पानावर दिली जाईल.” ही तयारी IIM अहमदाबादच्या रिसर्च रिपोर्टनंतर केली जात आहे, ज्यामध्ये पॅकेटच्या पहिल्या पानावर माहिती दिल्यास ग्राहकांवर अधिक परिणाम होईल, असे सांगण्यात आले आहे.

20 हजार लोकांवर सर्वेक्षण करण्यात आले
FSSAI चे सीईओ अरुण सिंघल यांनी सांगितले की,”IIM अहमदाबादने देशभरातील सुमारे 20 हजार लोकांचे सर्वेक्षण केले आणि समाजाला निरोगी खाण्याकडे कसे वळवले जाऊ शकते हे शोधून काढले. या बदलाद्वारे मधुमेह, बीपी इत्यादी असंसर्गजन्य आजारांना (एनसीडी) प्रतिबंध केला जाईल.”

पॅकेटवर माहिती अजूनही मागे आहे
FSSAI ने उत्पादनांमध्ये उपस्थित असलेल्या पोषक तत्वांची माहिती देण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत, मात्र तरीही कंपन्या ते पॅकेटच्या मागील बाजूस देतात. IIM अहमदाबाद (IIM-A) ने सुचवले की, पहिल्या पानावर माहिती दिल्यास जास्त प्रभाव दिसून येईल. हे मानक ब्रिटन, चिली, मेक्सिको, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये पाळले जाते.

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता रस्ते अपघातातील नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागणार नाही

Accident

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातानंतर मिळणाऱ्या भरपाईबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. रस्ते अपघातानंतरच्या सर्व प्रक्रियेसाठी मंत्रालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे जी संबंधित एजन्सीला त्याच कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हा नवा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नुकसान भरपाईसाठी न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणाऱ्या पीडित कुटुंबांना फायदा होणार आहे. यासोबतच आता वाहनाच्या इन्शुरन्समध्ये वाहन मालकाचा मोबाईल नंबरही अनिवार्य करण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार नुकसान भरपाईची सर्व प्रक्रिया 120 दिवसांत पूर्ण करावी. यामध्ये अपघाताचा सविस्तर रिपोर्ट 90 दिवसांत तयार करावा लागणार आहे. यानंतर, इन्शुरन्स कंपनीला आपली प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करावी लागेल. अशाप्रकारे ही प्रक्रिया 120 दिवसांत पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या DM ने रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. अपघातानंतर 48 तासांच्या आत पोलिसांना FAR म्हणजेच फर्स्‍ट एक्‍सीडेंट रिपोर्ट लिहावी लागेल.

या संदर्भात एक्सपर्ट अँड सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या करुणा रैना यांनी सांगितले की,”आता हिट अँड रनच्या बाबतीत होणाऱ्या मृत्यूवर सरकारने निश्चित केलेली जास्तीत जास्त 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींसाठी 50,000 रुपयांची भरपाई न्यायालयात न जाताही निकाली काढता येईल. या भरपाईसाठी उत्पन्नाचा कोणताही पुरावा लागणार नाही. सरकारने ठरवून दिलेली भरपाई घेतल्यानंतरही पीडित न्यायालयात जाऊ शकतो.”

बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (CMVR) चे अध्यक्ष गुरमीत सिंग तनेजा म्हणाले की,”सरकारच्या या निर्णयामुळे पीडितांना मोठा फायदा होईल. यामुळे नुकसान भरपाई मिळवण्यात मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल. याशिवाय मोबाईल नंबर इन्शुरन्सशी लिंक केल्यास वाहन मालकाचा शोध घेणेही सोपे होणार आहे. लोकं वारंवार मोबाईल नंबर बदलत नाहीत.

भरपाईच्या रकमेत हा बदल
रस्ते वाहतूक मंत्रालयाने हिट अँड रन प्रकरणात भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे. आता गंभीर जखमी व्यक्तीला 12500 ते 50000 रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय, हिट अँड रनमुळे मृत्यू झाल्यास, 25000 ते 200000 लाख रुपयांपर्यंत पेमेंट केले जाऊ शकते.

YouTubers ने भरपूर कमाई करून GDP मध्ये दिले 6800 कोटींचे योगदान

नवी दिल्ली । भारतात YouTube क्रिएटर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. जास्तीत जास्त क्रिएटर्स YouTube वर आपल्या कलेला करिअरमध्ये बदलण्यासाठी संधी शोधत आहेत. YouTube ने एक इंडिपेंडेंट कंसल्टिंग फर्म, ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्स (Oxford Economics) ची एक रिपोर्ट रिलीज केली आहे, ज्यामध्ये हे दिसून येते की, YouTube ची क्रिएटर इकोसिस्टम प्रचंड फायनान्शिअल व्हॅल्यू निर्माण करत आहे आणि सुमारे 6.84 लाख लोकं फुल-टाइम काम (फूट टाइम जॉब्स) करत आहेत. 2020 मध्ये, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत 6,800 कोटी रुपयांहून जास्तीचे योगदान दिले.

सध्या, 1 लाखांहून जास्त सदस्यांसह भारतातील चॅनेल्सची संख्या 40,000 पेक्षा जास्त झाली आहे आणि त्यामध्ये दरवर्षी 45 टक्के वाढ होते आहे. यासह, YouTube क्रिएटर्स या प्लॅटफॉर्मवर उत्पन्न मिळविण्यासाठी नवीन संधी आणि प्रेक्षक तसेच नवीन मार्ग उघडत आहेत. प्लॅटफॉर्मवर चॅनेलची कमाई करण्याचे 8 वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, 6 अंकांमध्ये कमाई करणाऱ्या चॅनेल्सची संख्या वर्षानुवर्षे 60 टक्क्यांनी वाढत आहे. 6 अंकांमधील कमाई म्हणजे किमान 1 लाख रुपये.

उत्पन्नाचे नवीन दरवाजे उघडतील
YouTube पार्टनर APAC चे प्रादेशिक संचालक अजय विद्यासागर, यांच्या मते, इंडियन क्रिएटर इकोसिस्टममध्ये आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमधील एका रिपोर्ट नुसार, ते म्हणाले- “जसे आमचे क्रिएटर्स आणि कलाकार जागतिक प्रेक्षकांना जोडणाऱ्या मीडिया कंपन्यांची पुढची पिढी तयार करतात, अर्थव्यवस्थेच्या वाढीवर त्यांचा इन्फ्लुएन्स वाढतच जाईल. नवीन कौशल्ये निर्माण करण्यासाठी, त्यांच्या आवडी शोधण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी YouTube कडे वळणाऱ्या लाखो भारतीयांसाठी खुले, सर्वसमावेशक आणि जबाबदार प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.”

कमाईच्या व्यतिरिक्त, YouTube क्रिएटर्सना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळवण्याची आणि जागतिक स्तरावर पोहोचण्याची अनुमती देते. हे ब्रँड कोलॅबोरेशन, लाइव्ह परफॉर्मेंस, स्पॉन्सरशिप इत्यादीद्वारे उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडत आहे.

लहान व्यवसायासाठी देखील फायदेशीर
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील 80 टक्क्यांहून जास्त क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर्सनी सांगितले की, YouTube चा त्यांच्या प्रोफेशनल गोल्सवर सकारात्मक परिणाम झाला आहे. प्लॅटफॉर्म लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी (SMBs) एक सकारात्मक साधन असल्याचा दावा करतो. रिपोर्ट नुसार, YouTube चॅनेल्ससह 92 टक्क्यांहून जास्त SMB मान्य करतात की, YouTube त्यांना त्यांच्या चॅनेलद्वारे, लक्ष्यित जाहिरातींद्वारे किंवा फक्त YouTube कन्टेन्ट पाहण्याद्वारे जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.

रेल्वेचा विक्रम!! FY22 मध्ये फेब्रुवारीपर्यंत झाली 127.28 कोटी टन मालवाहतूक

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या बाबतीत विक्रम केला आहे. खरेतर, चालू आर्थिक वर्षात (FY22) फेब्रुवारीपर्यंत रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 17.6 कोटी टनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 28 फेब्रुवारीपर्यंत रेल्वेने एकूण 127.8 कोटी टन मालाची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस रेल्वेने 14 कोटी टन वाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

फेब्रुवारीमध्ये 11.97 कोटी टन मालाची वाहतूक झाली
भारतीय रेल्वेने 2017-18 च्या 116.26 कोटी टनांच्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षात 122.53 कोटी टन वाहतूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात, रेल्वेने जानेवारी 2022 मध्ये सर्वाधिक 12.91 कोटी टन वाहतूक केली. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये, 11.97 कोटी टन मालाची वाहतूक झाली, तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात ती 11.23 कोटी टन होती.

आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक वाढ
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वे झोन हा या आर्थिक वर्षात 20 कोटी टनांचा टप्पा गाठणारा पहिला झोन बनला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 11 महिन्यांत त्याने 20.05 कोटी टनांचा टप्पा ओलांडला आहे आणि एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत 2.66 कोटी टनांची वाढ झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही कोळशाची सर्वाधिक वाहतूक केली जात आहे. त्यापाठोपाठ सिमेंट, अन्नधान्य, पेट्रोलियम आणि कंटेनरचा नंबर लागतो.

आत्ताच खरेदी करा एसी, फ्रीज आणि पंखे; लवकरच दर वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली । उन्हाळ्यात एसी, रेफ्रिजरेटर आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तरलवरच खरेदी करा.. याचे कारण म्हणजे वाढत्या खर्चामुळे कंपन्या येत्या काही दिवसांत त्यांच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. खरे तर रशिया-युक्रेन युद्धामुळे तांबे, अ‍ॅल्युमिनिअमच्या किंमती जागतिक बाजारपेठेत विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा भर एसी, फ्रीज आणि पंखे बनवणाऱ्या कंपन्यांवरही पडत असून, वाढीव किंमत वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांत त्यांच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. गेल्या दोन वर्षांत कंपन्यांनी तीनदा किंमती वाढवल्या आहेत.

वर्षभरात दीडपट खर्च वाढला
जागतिक बाजारपेठेत अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याच्या किंमती गेल्या वर्षभरात दीड पटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अ‍ॅल्युमिनियमची किंमत 1.61 लाख रुपये प्रति टन होती, ती आता 2.80 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे तांब्याचे भावही प्रति टन 5.93 लाख रुपयांवरून 7.72 लाख रुपये प्रति टन झाले.

कंपन्या घटत्या मार्जिनचा हवाला देत आहेत
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत ते त्यांचे मार्जिन कमी करून काम करत होते, मात्र वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे आता ते शक्य नाही. गेल्या दोन वर्षांत उत्पादनांच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता दिसून येते. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये 10 टक्के तफावत आहे, ती भरून काढण्यासाठी किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे.

महामारी आणि महागाईचा दबाव
कंपन्यांना अजूनही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आहे ज्यामुळे ते पुरेसे उत्पादन करू शकत नाहीत. याशिवाय क्रुडच्या वाढत्या किंमतींमुळे पेंट आणि प्लॅस्टिकसारखी उत्पादने डायरेक्ट महाग होत आहेत. त्याचा परिणाम ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनावरही दिसून येत आहे. इंधनाच्या महागाईमुळे मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे एकूणच कंपन्यांवर उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा बोझा ग्राहकांवर पडणार हे नक्की.

Gold Price : सोने-चांदी महागले, आजचा दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सराफा बाजारात सोन्याची चमक झपाट्याने वाढत आहे तर चांदीही पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर जाताना दिसत आहे. या तेजीनंतर चांदी 70 हजार रुपये किलोवर पोहोचली आहे. आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.60 टक्क्यांनी जोरदार वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही तेजी आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.60 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 51,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरात 0.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 68,060 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,680 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,300 रुपये
पुणे – 47,350 रुपये
नागपूर – 47,380 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,600 रुपये
पुणे – 51,650 रुपये
नागपूर – 51,680 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4778.00 Rs 4682.00 -2.05 %⌄
8 GRAM Rs 38224 Rs 37456 -2.05 %⌄
10 GRAM Rs 47780 Rs 46820 -2.05 %⌄
100 GRAM Rs 477800 Rs 468200 -2.05 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5209.00 Rs 5113.00 -1.878 %⌄
8 GRAM Rs 41672 Rs 40904 -1.878 %⌄
10 GRAM Rs 52090 Rs 51130 -1.878 %⌄
100 GRAM Rs 520900 Rs 511300 -1.878 %⌄

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे.

देशभरातील रेल्वे स्थानकांवर तिकीट वेंडिंग मशिन्स (ATVM) बसवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत आता रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या ATVM वर पेटीएम QR कोड स्कॅन करून UPI द्वारे पेमेंट करून तिकीट खरेदी करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ATVM हे टच स्क्रीन बेस्ड टिकटिंग कियोस्क आहेत जे प्रवाशांना स्मार्ट कार्डशिवाय डिजिटल पेमेंट करू देतात.

‘या’ सुविधा मिळतील
स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करून प्रवासी अनारक्षित रेल्वे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या सीज़नल तिकिटांचे रिन्यूअल करू शकता आणि स्मार्ट कार्ड रिचार्ज करू शकता. पेटीएम प्रवाशांना पेटीएम UPI, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (आधी खरेदी करा, नंतर पैसे द्या), नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसह विविध पेमेंट ऑप्शनद्वारे पेमेंट करू देते.

ATVM द्वारे तिकीट कसे बुक करावे ?
>> जवळच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या AVTM मध्ये तिकीट बुक करण्यासाठी मार्ग निवडा.
>> रिचार्जसाठी स्मार्ट कार्ड क्रमांक टाका.
>> पेमेंट ऑप्शन म्हणून पेटीएम निवडा.
>> स्क्रीनवर उपलब्ध QR कोड स्कॅन करा.
>> यानंतर फिजिकल तिकीट तयार होईल.
>> जर तुम्ही स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याचा पर्याय निवडला असेल तर रिचार्ज होईल.

“सरकारने मंत्री नवाब मलिकांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप राज्यभर आंदोलन करणार” : नीताताई केळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. याबाबतचा गंभीर विचार करून राज्य सरकारने मालिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासह अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य केळकर म्हणाल्या,”अल्पसंख्यांक मंत्री मलिक यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात जणू काही मंत्र्यांच्या मध्ये चढाओढच लागली आहे. हे सरकार काय दाऊद च्या पाठिंब्यावर चालले आहे काय?” असा प्रश्नही निर्माण होत आहे. 2017 पासून चालू असलेल्या ईडीच्या चौकशीमध्ये संयुक्त चौकशी ANI द्वारे तपासात कुरल्याची दाऊदची जमीन बेकायदेशीर रित्या बळकावली.

“गेले वीस वर्ष त्याचा वापर करणे हे देश भक्तीचे लक्षण आहे का? या सगळ्या प्रकरणात नवाब मलिकांनी थोडी तरी लाज शिल्लक असेल तर तातडीने राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याप्रमाणेच न्याय या मंत्र्याला दिला पाहिजे. आघाडीच्या मंत्री यांचा कारभार तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाईल,”असा इशाराही केळकर यांनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्षांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. देवेंद्र फडवणीस आणि इतर भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करू नये,” अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले नसून कोणत्या आधारावर देताय त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे. अशात भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करु नये, असा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबतही महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी आपण युती करायला तयार आहे, असे आंबेडकर यांनी म्हंटले.