Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2692

युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या अनेक भारतीय नागरिक, विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहरेत. युद्धावेळी दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनहून मातृभूमीकडे निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आले, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी दिली.

दरम्यान व्हीके सिंग यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या 80 भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका विध्यार्थ्याला गोळी लागली असल्याची माहिती दिली.

भारत सरकारने मिशन गंगा मोहिमे अंतर्गत युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनमध्ये पाठवले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग यांचा समावेश आहे.

चचेगाव येथे शाॅर्टसर्किटमुळे तासाभरात 13 एकर ऊस जळून खाक

कराड | तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा शिवारात शाॅर्टसर्किटमुळे 13 एकर ऊस जळाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 12 शेतकऱ्यांच्या ऊस जळाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले. जळालेल्या शेतातील ऊसाचा पंचनामा तलाठी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चचेगाव गावातील कोळे पाणंद रस्त्यावरील देशपांडा शिवारात  शाॅर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग लागली. आग लागल्यानंतर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊस वाळलेला असल्याने आगीने काही क्षणातच राैद्ररूप धारण केले. केवळ तासाभरातच 13 एकरातील ऊस जळाला. त्यामुळे कोणतीही अग्नीशामक बंब येण्याच्या अगोदर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

चचेगाव येथील विनोद गायकवाड, सुभाष पवार, सहदेव पवार, लालासो पवार, विक्रम पवार, मोहन पवार, दिलीप पवार, अनिल कांबळे, महादेव पवार, साहेबराव पवार, बाजीराव पवार, लक्ष्मण पवार या शेतकऱ्यांचा ऊस जळाला. महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अकरावीतील तरूणीला व्हायचं होत पोलिस… मात्र पैसे नसल्याने उचलले टोकाचं पाऊल

sucide

सातारा | जिल्ह्यातील वडूथ याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस बनण्यासाठी पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने युवतीने टोकाचे पाऊल उचलले. सारिका ज्ञानेश्वर सकटे (वय-17) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे.

सारिका हिने पोलीस बनण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. पण पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून तिने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सातारा शहरातील एका महाविद्यालयात ती अकरावीच्या वर्गात शिकत होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे पोलीस व्हायचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं.

पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेऊन स्वप्न साकरता येईल, असं तिला वाटत होतं. तिच्या काही मैत्रिणींनी देखील पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेतला होता. त्यामुळे तिनेही आपल्या घरी अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे मागितले होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीय पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे तिला नैराश्य आलं होतं. पैसे नसल्यानं पोलीस व्हायचं स्वप्न धुसर होऊ लागलं होतं. याच विवंचनेतून अखेर 17 वर्षीय सारिकानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्याचं समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

“प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल”; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सभागृहातून एकदम निघून जाणे हे राज्यपाल यांच्या पदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात ‘भाजपाल”, असे आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

कालपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली यावेळी भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून राज्यपालांच्या आक्षेपार्ह्य विधान व सभागृहातून निघून जाण्याच्या मुद्यांवरून अंदोलन करण्यात आले. राज्यपालांच्या आक्षेपार्ह्य विधान व सभागृहातून निघून जाण्याच्या मुद्यांवरून आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्विट मधून राज्यपाल व भाजपवर टीका केली आहे. प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल असे असल्याचे पटोले यांनी म्हंटले आहे.

दरम्यान पटोले यांनी काल माध्यमांशी संवाद साधत राज्यपालांवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले की, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भाजपला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो,असे पटोले म्हणाले होते.

…तर घाटीतील रुग्णसेवा बंद

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू ठेवले असून काल काळ्या फिती लावून काम केले. आगामी दहा दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर रुग्णसेवेचे सहित सर्व कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक संघटनांनी असहकार आंदोलन सुरू केलेले आहेत. आज सायंकाळी घाटी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालय क्रांतीचौक असा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. 7 मार्च रोजी अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन, 8 मार्च रोजी अधिष्ठाता यांना घेराव, 9 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल तर 10 आणि 11 मार्चला अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर 14 मार्च पासून रुग्णसेवेसहित काम बंद आंदोलन करण्यात येईल.

या काळात अत्यावश्यक व कोविल सेवा चालू राहतील असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. मिर्झा सिराज बेग, सचिव डॉ. राधेय खेत्रे आदींनी कळवले आहे.

जिल्ह्यातील 440 केंद्रांवर आज बारावी इंग्रजीचा पेपर

औरंगाबाद – शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालय शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्र अशा 440 परीक्षा केंद्रांवर 58 हजार 347 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत. इंग्रजीची परीक्षा असल्याने सर्वाधिक विद्यार्थी आज पेपरला असतात. निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्याची खरी परीक्षा मुख्याध्यापकांची असणार आहे.

जिल्ह्यातील 7 जिल्हास्तरीय, 9 तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके आज सकाळीच केंद्रांवर रवाना झाले आहेत. मुख्य केंद्रावर चार सदस्य आणि उपकेंद्रावर रनर हेच बैठ्या पथकाची भूमिका बजावणार आहेत. परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या जात असताना कॉपीमुक्त परीक्षेबद्दल मात्र कोणीच बोलत नसल्याने कॉपीमुक्त अभियान यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परीक्षा केंद्रांवर बॅंकेची सुटसुटीत व्यवस्था, स्वच्छता, परीक्षेचा बैठक क्रमांक बेंचवर लिहिणे त्यानुसार उत्तरपत्रिकांचे नियोजन केंद्राच्या आवारात इशारे व सूचना चिकटवणे याशिवाय प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी च्या नियोजनात केंद्र, उपकेंद्रावर काल दिवसभर लगबग होती. आज सकाळी साडेदहा वाजता पेपर सुरू होईल. केंद्रावर विद्यार्थ्यांना एका तास आधी उपस्थित राहायचे असून दहा वाजून वीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत.

बॅनरवर नाव टाकण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी आणि गोळीबार

Crime Gun

जालना – तालुक्यातील रामनगर येथे दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत गोळीबार होऊन एक जण गंभीर जखमी झाला. मौजपुरी ठाण्याच्या पोलिसांनी वेळीच बंदोबस्त मागून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

रामनगर येथून जाणाऱ्या जालना-नांदेड या राज्य महामार्गावर मुख्य चौकात बॅनर लावण्याच्या कारणावरून शिवसेना कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात बुधवारी रात्री वादावादी झाली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या तुफान हाणामारीत गोळीबार होऊन विजय ढेंगळे (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला.

दरम्यान मौजपुरी पोलिसांनी जास्तीचा पोलिस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पक्षीय राजकारणामुळे झालेल्या या तुफान हाणामारीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मौजपुरी पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

कोरोनाची लस न मिळालेल्यांसाठी 2022 हे वर्ष कसे ठरले, आरोग्य मंत्रालयाने दिली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतातील कोरोना लसीच्या परिणामकारकतेबाबत महत्त्वाचा डेटा शेअर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,”या वर्षी कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 92 टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता.”

इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की,”लस ट्रॅकर असलेला भारत हा दुसरा देश आहे.” त्यांनी सांगितले की, 2022 मध्ये 92 टक्के मृत्यू लस न घेतलेल्या लोकांचे होते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले,”हे स्पष्ट आहे की भारतातील लसीकरणाच्या व्यापक व्याप्तीने शेकडो लोकांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

कोविडच्या दोन्ही लसी मृत्यू रोखण्यासाठी 99.3% प्रभावी होत्या
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की,”भारतात लसीचा विकास, वेगवान काम, स्वीकृती, व्यापक व्याप्ती यामुळे 2022 मध्ये कोविड-19 मुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. अँटी-कोविड-19 लसीचा पहिला डोस मृत्यू रोखण्यासाठी 98.9 टक्के प्रभावी आहे तर दोन्ही डोस 99.3 टक्के प्रभावी आहेत.”

देशातील 15-18 वयोगटातील 74 टक्के किशोरांना अँटी-कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 39 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लस अग्रवाल म्हणाले की,”व्हॅक्सिनेशन कव्हरेजसह हेल्थ वर्कर्स, फ्रंट लाइन वर्कर्सच्या प्रयत्नांमुळे कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत संसर्ग रोखण्यात प्रभावीपणे मदत झाली.”

कोरोनाचे भयंकर संकट टाळण्यात भारताला यश आले
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की,”भारत सरकारसह संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांमुळे कोविड-19 चे संभाव्य विनाशकारी संकट टाळण्यात देश सक्षम झाला आहे. सध्या देशातील 29 जिल्ह्यांमध्ये कोविड-19 च्या संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांहून जास्त आहे, तर 34 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 5-10 टक्क्यांच्या दरम्यान आहे.” दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजही जगात दररोज सुमारे 15,00,000 कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात आहेत.

कोरोनाच्या एकूण जागतिक रुग्णांपैकी केवळ 0.7% रुग्ण हे भारतातील आहेत.
असे सांगण्यात आले की, भारतात दर आठवड्याला सरासरी 11,000 कोविड प्रकरणे नोंदवली जातात. कोरोनाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जागतिक प्रकरणांपैकी फक्त 0.7% भारतात नोंदवले जात आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांच्या संख्येत सकारात्मक स्थिती आहे. भारतात 2-8 फेब्रुवारी दरम्यान सरासरी 615 मृत्यू झाले आहेत. गेल्या आठवड्यात कोविडमुळे 144 मृत्यू झाले आहेत.

भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 77,000 आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की,” फक्त एका राज्यात 10,000 हून जास्त सक्रिय प्रकरणे आहेत आणि 2 राज्यांमध्ये 5,000 ते 10,000 सक्रिय प्रकरणे आहेत आणि उर्वरित राज्यांमध्ये 5,000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. केरळ, महाराष्ट्र, मिझोराममध्ये देशातील 50% सक्रिय प्रकरणे आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 77,000 आहे. गेल्या 24 तासांत भारतात केवळ 6,561 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

भारतात कोरोनाचा धोका टळला आहे का? आरोग्य मंत्रालयाने सांगितले कि…

Corona

नवी दिल्ली । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,”जगातील अनेक देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजही जगात दररोज सुमारे 15,00,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत.” ते म्हणाले की,”भारतात कोरोनाचे प्रमाण कमी होण्याची ही वेळ असू शकते, मात्र ही वेळ आळशीपणाची नाही. जगातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटी 18 लाख आहे. गेल्या एका आठवड्यात दररोज 15 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. हे दिवसेंदिवस वाढणारी प्रकरणे दर्शविते.”

गुरुवारी, गेल्या 24 तासांत भारतात 6,561 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर साप्ताहिक आधारावर सरासरी 11,000 कोविड प्रकरणे नोंदवली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात कोविडच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. जागतिक प्रकरणांपैकी फक्त 0.7% भारतात नोंदवली जात आहेत. लव अग्रवाल म्हणाले की,”आता अनेक देशांमध्ये कोविडची मोठी प्रकरणे समोर येत आहेत. काही देशांमध्ये, प्रकरणांची गती सतत वाढत आहे.”

मंत्रालयाने म्हटले आहे की, जानेवारीमध्ये भारतात दररोज 3 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात होती, आता हीच प्रकरणे आठवड्यातून सरासरी 96.4% ते 11,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीतही भारतातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. 2 ते 8 फेब्रुवारीपर्यंत भारतात सरासरी 615 मृत्यू झाले. गेल्या आठवड्यात कोविडमुळे 144 मृत्यू झाले आहेत. या प्रकरणात देखील, सुमारे 76.6% ची तीव्र घट झाली आहे. देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,29,45,160 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 77,152 वर आली आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सलग 25 दिवसांपासून देशात संसर्गाच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या एक लाखांपेक्षा कमी आहे. भारतातील सरासरी साप्ताहिक कोविड संसर्ग दर 0.99% आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 77,000 आहे. देशामध्ये एकच राज्य असे आहे की, जिथे कोरोनाचे 10,000 हून अधिक रुग्ण येत आहेत. 5,000-10,000 प्रकरणांसह राज्यातील प्रकरणांची संख्या 2 आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये 5,000 पेक्षा कमी प्रकरणे आहेत.

पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून रिटायरमेंटनंतर मिळू शकेल करोडोंचा फंड

Share Market

नवी दिल्ली । प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक आणि बचत करतो. काही मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करतात तर काही घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी बचत करतात, तर काही रिटायरमेंटनंतर सहज जीवन जगण्यासाठी गुंतवणूक प्लॅन करतात.

जर तुम्हालाही भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही हे पाऊल शहाणपणाने उचलले पाहिजे. विशेषत: रिटायरमेंटच्या बाबतीत. जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर सोपे जीवन जगायचे असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. रिटायरमेंटनंतर तुम्हाला करोडोंचा फंड मिळू शकेल.

महागाईनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडा
रिटायरमेंटनंतरची चिंता सर्वांनाच सतावत असल्याचे इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टचे म्हणणे आहे. मात्र त्याहूनही अवघड म्हणजे त्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडणे. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता, अशा गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, ज्यामध्ये महागाई वाढीबरोबर रिटर्नही वाढत जातो. म्युच्युअल फंडात गेल्या काही वर्षांत चांगला रिटर्न मिळाल्याने भरपूर रस निर्माण झाला आहे.

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची योजना करू शकता. जर तुम्ही उच्च उत्पन्न असलेल्या गटातून आला असाल आणि तुमचा पगार चांगला असेल तर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करू शकता जी तुम्हाला मॅच्युरिटीवर 2.45 कोटी इतकी मोठी रक्कम देऊ शकते.

दर महिन्याला SIP मध्ये 3500 रुपये गुंतवा
गेल्या 10 वर्षांत असे दिसून आले आहे की, म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला सुमारे 15 टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. गुंतवणुकीच्या वेळी तुमची पत्नी 30 वर्षांची असेल तर तुम्ही एकूण 30 वर्षांसाठी 12.60 लाख रुपये गुंतवू शकता. 15% रिटर्नसह, तुमच्याकडे 30 वर्षांनंतर सुमारे 2.45 कोटी रुपयांचा फंड असेल. म्युच्युअल फंड योजनांमधील व्याजदर चक्रवाढीवर असतो.

इतका स्कीममध्ये इतका रिटर्न मिळतो
स्कीम                                                             रिटर्न
SBI स्मॉल कॅप म्युच्युअल फंड                          20.04 टक्के
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड           18.14 टक्के
इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड            16.54 टक्के
डीएसपी मिडकॅप म्युच्युअल फंड                     15.27 टक्के
कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड              15.95 टक्के