Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2706

जिल्ह्यातील 10 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंड, रोमानिया सीमेवर

औरंगाबाद – जिल्ह्यातुन वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांनी युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाची सीमा गाठली असून त्यातील काही जण विमानतळावर पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसात ते आपल्या घरी पोहोचतील अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्य फुलं जवळील एक गावात थांबण्याची प्रशासनाने कळविले आहे. तसेच पैठण व औरंगाबादचे आणखी दोन विद्यार्थी असून ते सध्या सुरक्षितस्थळी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आठवड्यापासून रशिया युक्रेन मध्ये युद्धाची ठिणगी पडली असून, शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. नोकरीनिमित्त गेलेले 4 आणि शिक्षणासाठी गेले 12 असे 16 जण युक्रेन मधून नजीकच्या देशांकडून सीमेवर पोहोचले आहेत. भूमिका शार्दुल, श्रुतिका चव्हाण, प्रतिक ठाकरे सोमवारपासून रोमानिया विमानतळावर आहेत. तसेच आकाश खैरनार आणि सचिन सिंग हे दोघे मंगळवारी रोमानिया दाखल झाले. निशा इंदुरे, अजिंक्य जाधव हेदेखील मंगळवारीच हंगेरी पोहोचले. पैठणची साक्षी चौधरी, औरंगाबादची अनुष्का शिंदे यांची नावे रात्री परराष्ट्र मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला कळवली.

जिल्ह्यातून 12 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी आहे. तसेच एक सॉफ्टवेअर इंजिनियर पत्नी व दोन मुलांसह काही वर्षांपासून नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहे. पैठण व औरंगाबाद येथील दोघे असल्याचे सायंकाळी परराष्ट्र खात्याने कळवले. मिशन गंगा मध्ये दहा जण होणार आहे. दोन दिवसात ते सर्वजण औरंगाबादला पोहोचतील. एका कुटुंबातील चार्ज नही सुरक्षित असल्याचे समजले आहे, असे जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितले.

धक्कादायक! गोदावरी नदीत महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू

water

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात महाशिवरात्री निमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शिरोमणी हणमंत होनशेट्टे असे मृत मुलीचे नाव आहे. मृत मुलगी बेलदरा येथील रहिवासी आहे. ती आज आपल्या वडिलांसोबत महाशिवरात्रीनिमित्त बळेगाव येथील गोदावरी नदीत स्नानासाठी केली होती. मात्र नदीच्या काठावर पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलगी पाण्यात पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महाशिवरात्री निमित्त गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी अनेक भाविक जमले होते. हि मुलगी बुडत असताना भाविकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला त्यामध्ये अपयश आले.

महाशिवरात्रीनिमित्त वडिलांसोबत स्नानासाठी गेली होती मुलगी
महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी नदीवर लांबवरून भाविक स्नान करण्यासाठी येत असतात. मृत मुलगीसुद्धा तिच्या वडिलांसोबत स्नान करण्यासाठी आली होती. यानंतर मृत मुलगी नदीत अंघोळीसाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. यादरम्यान हि मुलगी बुडत असताना तेथे उपस्थित इतर भाविकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या आणि तिला बाहेर काढले. मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी बेलदरा या गावी आणण्यात आले.

बीडमध्ये नदीपात्रात बुडून चार मुलांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी बीडमधील गेवराई तालुक्यातील शहजनापूर चकला या ठिकाणी पोहण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. आकाश सोनवणे, गणेश इनकर, बबलू वक्ते, अमोल कोळेकर अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या मुलांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

संतापजनक! चाॅकलेट खायला देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार; ‘या’ प्रकारे झाला घटनेचा खुलासा

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – मुळशी तालुक्यातील माण या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला चाॅकलेट खायला दिले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर जेव्हा ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हि संतापजनक घटना उघडकीस आली.

ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित 16 वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी आरोपी ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी चाॅकलेट घेऊन आला होता.

यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आईवडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यादरम्यान आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चाॅकलेट खायला दिले. चाॅकलेट खाल्ल्यावर पीडित मुलीला झोप आली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलगी झोपल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. हि गोष्ट पीडित मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

परभणी हादरलं ! रुग्णालयाच्या गेटसमोरच कामगाराची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीच्या सेलु उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयाच्या गेटवर एका कामगाराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयाच्या गेटवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांना आढळून आले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हि घटना उघडकीस येताच डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणचा पंचनामा केला. रुग्णालयाच्या गेटवरच हि हत्या झाल्याने रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

विशाल सदाफळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणचे रहिवाशी होते. मृत विशाल सदाफळे हे सेलू येथील एका हॉटेलात काम करत होते. घटनेच्या दिवशी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी त्यांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी सेलु उपजिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर ड्युटीवर येत असताना सेलु रुग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे डॉक्टरांना आढळले.

यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती तातडीने सेलु पोलिसांना दिली. यानंतर सेलु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी मृतांची ओळख पटवून विशाल सदाफळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत विशाल सदाफळे यांची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. हि हत्या पूर्ववैमनस्यातून केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजुंनी तपास करत आहेत.

पुण्याला हादरवणाऱ्या ‘त्या’ घटनेचा कोर्टाने दिला निकाल, नराधम आरोपीला दिली फाशीची शिक्षा

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मागच्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील पाणशेत परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घटना घडली होती. यामध्ये आरोपी नराधमाने अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. या आरोपीने पीडित मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घरातून पळवून नेले होते. यानंतर या नराधम आरोपीने त्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात नराधम आरोपीला अटक केली. यानंतर काल 28 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयाने या प्रकरणातील नराधम आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर एक वर्षांनी या चिमुकलीला न्याय मिळाला आहे. संजय बबन काटकर असे या आरोपी नराधमाचे नाव आहे.

त्यादिवशी नेमकं काय घडलं?
15 फेब्रुवारी 2021 रोजी अडीच वर्षीय पीडित मुलीचे आई वडील पुण्यानजीक असणाऱ्या पाणशेत याठिकाणी रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान या दाम्पत्याची अडीच वर्षांची मुलगी घराच्या आसपास खेळत होती. यादरम्यान आरोपी नराधम संजय काटकर याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला पैसे आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर तिचे अपहरण केले. यानंतर हा आरोपी नराधम पीडितेला मालखेड ते थोपटेंवाडी परिसरात निर्जनस्थळी घेऊन गेला.

त्यानंतर आरोपी नराधमाने क्रूरतेचा कळस गाठत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्या ठिकाणीच एका मोरीत चिमुकलीचा मृतदेह टाकून नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला होता. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर वेल्हा पोलिसांनी आरोपी नराधमाला अवघ्या 48 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. यानंतर न्यायालयाने आरोपी नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विमानाच्या इंधनाच्या किंमतीत 3.3% वाढ, जाणून घ्या आता पेट्रोल आणि डिझेलचे काय होणार?

Flight Booking

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने मंगळवारी देशातील विमान इंधनाच्या किंमती 3.3 टक्क्यांनी वाढल्या. त्यांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती सतत वाढत असल्याने विमान इंधन किंवा एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किंमतीत यंदा पाचव्यांदा वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 116 व्या दिवशी स्थिर राहिले. राष्ट्रीय राजधानीत, सरकारी मालकीच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या किंमत सूचनेनुसार ATF ची किंमत 3,010.87 रुपये प्रति किलो किंवा 3.22 टक्क्यांनी वाढून 93,530.66 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.

एअरलाईनचा वाढता परिचालन खर्च
भारतीय विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात ATF किंवा जेट इंधनाचा वाटा 45 ते 55 टक्के आहे. भारतातील ATF ची किंमत जगात सर्वाधिक आहे. आता पुन्हा एकदा त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा हवाई प्रवास महाग होऊ शकतो. ATF ला GST च्या कक्षेत आणण्याची इंडस्ट्री अनेक दिवसांपासून मागणी करत आहे.

कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ 102.14 आणि WTI ने $ 96.15 प्रति बॅरल पार केली आहे. वाढत्या किंमतीचा सर्वांगीण परिणाम दिसून येत आहे.

पेट्रोल डिझेलचे काय होईल ?
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होतो. मात्र, कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीत चढ-उतार झाल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. गेल्या वर्षी दिवाळीपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी झेप घेतली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

नोव्हेंबर 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करून जनतेला दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पाच राज्यांतील निवडणुका संपण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे, तर निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होतील. अशा परिस्थितीत 10 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रेयसीला 1 कोटी देऊ शकला नाही म्हणून 31 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

ahmadabad crime

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रेयसीला 1 कोटी रुपये देऊ न शकल्याने एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण ?
मृत व्यक्तीचे नाव लखन मखिजा असे असून तो अहमदाबाद येथील नाना चिलोदा या ठिकाणचा रहिवाशी होता. मृत लखनच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, लखनच्या प्रेयसीने त्याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. लखनच्या कुटुंबाचा चांगला व्यवसाय असला तरी ते इतकी मोठी रक्कम तिला देऊ शकत नव्हता. यानंतर लखनने आपल्या प्रेयसीला आपण एवढी रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगितले. यानंतर लखनच्या प्रेयसीने त्याच्याशी बोलणे थांबवले. या सगळ्यांचा लखनवर गंभीर परिणाम झाला. यानंतर लखनने टोकाचा निर्णय घेत आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र लखनच्या आत्महत्येला सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याच्या प्रेयसीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कुठे झाली तरुणीसोबत भेट
मॉर्निंग वॉकदरम्यान लखनची त्या तरुणीसोबत ओळख झाली. यानंतर दोघे एकमेकांना रोज भेटू लागले. यानंतर हळू हळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्या प्रेयसीच्या मनात वेगळेच सुरु होते. तिला कॅनडाला शिफ्ट व्हायचं होते. यासाठी तिला इन्व्हेस्टमेंट व्हिसा पाहिजे होता. मात्र तिच्याकडे इतके पैसे नव्हते म्हणून तिने लखनकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र लखनने पैसे देण्यास नकार दिला तर तिने लग्न करणार नसल्याचे लखनला सांगितले. तसेच तिने लखनशी बोलणेसुद्धा बंद केले. यानंतर लखनने घटनेच्या आदल्या दिवशी पैशांबाबत त्याच्या बाबांशी बोलणे केले. त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपण उद्या सकाळी बोलू असे सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी लखनच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर लखनच्या आईने आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली.

केंद्राला सलग पाचव्या महिन्यात मिळाले ₹ 1.30 लाख कोटींहून अधिकचे GST कलेक्शन

GST

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, GST कलेक्शन 133026 कोटी रुपये झाले. GST कलेक्शनचा हा आकडा फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के जास्त आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 26 टक्के कलेक्शन वाढले आहे. सलग पाचव्या महिन्यात GST कलेक्शन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

फेब्रुवारीमध्ये CGST कलेक्शन 24435 कोटी रुपये, SGST कलेक्शन 30779 कोटी, IGST कलेक्शन 67471 कोटी तर सेस 10340 कोटी रुपये झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात रेग्युलर सेटलमेंटनंतर केंद्र सरकारचा महसूल 50782 कोटी रुपये झाला आहे. या दरम्यान राज्यांचा एकूण महसूल 52688 कोटी रुपये झाला आहे.

तिसऱ्यांदा सर्वात जास्त कलेक्शन
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, GST च्या इतिहासातील हा तिसरा उच्चांक आहे. या वर्षीच्या जानेवारीमध्ये सरकारने GST मधून 140986 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. यापूर्वी, एप्रिल 2021 मध्ये, GST कलेक्शन 139708 कोटी रुपये होते, जे दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वसुली आहे. यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये, सरकारने तिसऱ्यांदा सर्वाधिक 133026 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चालू आर्थिक वर्षात 9व्यांदा ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा

महिना            कलेक्शन
एप्रिल            139708 कोटी
जुलै               116393 कोटी
ऑगस्ट          112020 कोटी
सप्टेंबर           117010 कोटी
ऑक्टोबर       130127 कोटी
नोव्हेंबर         132526 कोटी
डिसेंबर          129780 कोटी
जानेवारी        140986 कोटी
फेब्रुवारी        133026 कोटी

महामारीचे निर्बंध असूनही GST कलेक्शन वाढले
GST कलेक्शनमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोनामुळे जानेवारीमध्ये काही राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा फारसा परिणाम झालेला नाही आणि चौथी तिमाहीही चांगली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सोमवारी आलेल्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीवर नक्कीच परिणाम झाला. तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 5.4 टक्के होती, जी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 3 टक्के कमी होती.

ITR भरताना द्यावी लागेल ‘ही’ माहिती, अन्यथा मिळू शकेल नोटीस

Income Tax Department

नवी दिल्ली । रिटर्न भरताना काही माहिती उघड करणे आवश्यक आहे. काही करदाते चुकून काही माहिती देऊ शकत नाहीत. मात्र, इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार खुलासा न केल्यास, करदात्याचे ITR योग्य मानले जात नाही आणि त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस मिळू शकते.
अशा परिस्थितीत, ITR बाबत अशा कोणत्याही सूचना टाळण्यासाठी, कोणत्याही प्रकारे बँक खात्यांपासून परदेशातील मालमत्ता किंवा होल्डिंग्सची माहिती ITR मध्ये देणे आवश्यक आहे.

समजा तुमचा मुलगा अनिवासी भारतीय असला तरी तो त्याच्या राहत्या देशात मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्याला त्याच्या ITR मध्ये ते दाखवणे आवश्यक आहे का?

भारतीय इन्कम टॅक्स (IT) कायद्यानुसार, आर्थिक वर्षात व्यक्ती भारताची “रहिवासी आणि सामान्यपणे निवासी” (ROR) असल्यास सर्व विदेशी मालमत्तांची ITR मध्ये नोंद करणे आवश्यक आहे. तसेच, ITR मध्ये टॅक्स साठी ऑफर केलेल्या अशा विदेशी मालमत्ता येथे ITR मध्ये दाखविणे आवश्यक आहे

जर करदात्यांनी कोणत्याही परदेशी मालमत्तेत एका दिवसासाठीही मालकी किंवा लाभार्थी हिस्सा ठेवला असेल तर त्यांना ITR मध्ये त्याचा उल्लेख करणे आवश्यक असेल. तुम्ही असे न केल्यास, तुम्हाला अघोषित उत्पन्न किंवा मालमत्तेवर सुमारे तिप्पट म्हणजे 30 टक्के दंडासह टॅक्स भरावा लागेल.

‘या’ मालमत्तांची द्यावी लागेल माहिती
नोंदवल्या जाणार्‍या परकीय मालमत्तेमध्ये परदेशी बँक खाती, आर्थिक हितसंबंध, स्थावर मालमत्ता, अशी खाती ज्यात एखाद्या व्यक्तीला स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे, ट्रस्ट, भारताबाहेरील व्यक्तीकडे असलेली कोणतीही अन्य भांडवली मालमत्ता सामील आहेत. ITR मध्ये परदेशी मालमत्ता/उत्पन्न नोंदवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कोणतीही चूक किंवा चुकीचे स्टेटमेंट हे काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि टॅक्स कायदा, 2015 अंतर्गत अतिरिक्त टॅक्स , व्याज आणि दंडात्मक परिणामांना आमंत्रित करू शकते.

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. किरीट सोमय्या यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून निल सोमय्या यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरिटी सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप करत, बाप बेटे दोनो जेल में जाएंगे असं वक्तव्य केलं होतं. तसंच नील सोमय्याचे पीएमसी बँक घोटाळ्याली प्रमुख आरोप राकेश वाधवान याच्याशी संबंध असल्याचा आरोपही केला होता. पीएमसी बँक घोटाळ्याली पैसा नील सोमय्यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोपही संजय राऊत यानी केला होता.

यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली आहे. अखेर आज न्यायालयाने निर्णय देत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सोमय्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का आहे.